Literature

ज्येष्ठ वद्य नवमी

परमात्मा सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वसाक्षी, सर्वोत्तम आहे असे समजून जो भक्त त्यास शरण जातो त्यालाच परमात्मा सर्व प्रकारचे संरक्षण देतो. कोणीहि भक्त भक्तिभावानें व्रतादींचे आचरण करून परमात्म्याची आराधना करीत असल्यास परमात्मा त्याचें सदासर्वदा संरक्षण व पालन करण्याचे व्रत अंगिकारतो. परमात्मा किती दयाळू व भक्तवत्सल आहे हें ओळखून आपण त्याला प्रसन्न करून घेऊन त्याच्याकडून अतिमृत्युरूपी अभयवचन प्राप्त करून घेतले पाहिजे.

मानवाला सर्वात जास्त भीती मृत्युचीच असते, त्यापेक्षा मोठे भय कोणतेही नाही. सर्व दुःख घालविणारा मृत्यु त्याचीही अपेक्षा करणारी कांही मनुष्ये असूं शकतात. चोर चोरी करतील म्हणून भीती, स्त्रियां- मुले विभक्त होतील ही भीती, इष्टमित्रांचा वियोग होईल ही भीती. या सर्व भीती घालविणारा मृत्यूच होय. मृत्यु म्हणजेच सर्वनाश. मृत्युची आठवण झाल्यास आपला थरकाप होतो. कितीही पराक्रमी किंवा श्रीमंत असल्यास त्यालाही मरणाची नुसती आठवण झाली तरी त्यास ‘सर्व असार आहे’ असे वाटूं लागते. मरण कोणासही चुकत नाही ही वस्तुस्थिती आहे. मग पुढे काय ?

अनित्य अशा या जगतांत जन्म घेतल्यावर विवेकी होऊन सर्व प्रकारची दृश्य वैभवें असार आहेत असें समजून घेऊन सनातन, सारभूत असा माझा आश्रय घे असा उपदेश भगवंताने केला आहे.

श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img