Literature

ज्येष्ठ वद्य षष्ठी

‘ न तत्र सूर्यो भाति | न चन्द्र तारकं | नेमा विद्युतो भाति | कुतोऽयमग्नि: | ‘ त्या परमात्म्यास सूर्य, चंद्र, नक्षत्रे, अग्नि, वीज हे कोणीही प्रकाश देऊ शकत नाहींत तर परमात्म्याच्या प्रकाशाच्या आश्रयानेंच सूर्यचंद्रादी सर्वच प्रकाशमान होण्यास समर्थ होतात.

जगनिर्मितीपूर्वी हे सर्व जग तमाने व्यापले होते. ‘ तमसो मा ज्योतिर्गमय | ‘ ही प्रार्थना असलेल्या ऋषिवाक्यांचे स्मरण करा. परमात्माच खरा प्रकाश होय. तोच आम्हाला प्रकाश दाखविण्यास समर्थ आहे. त्याच्या विस्मृतीमुळेंच आपले मन अज्ञानमय होते. ‘ त्या अज्ञानरूपी तमापासून प्रकाशमार्गात मार्गदर्शक व्हा ! ‘ अशी भगवंताची प्रार्थना केल्यास तो दयाळू परमात्मा आपणांस सहकार्य देईलच. या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवा. आपले आचरण बदला. सदाचारप्रवृत्त व्हा ! दुराचारी मार्गाला विसरा. धर्म-कर्मामध्ये आसक्त होऊन निषिध्द कर्मे करू नका. उसाच्या चरकात अडकलेल्या हाताप्रमाणे एकामागून एक अशा निषिध्द कर्माचा त्याग करा. दुःख निवृत्तीसाठी हीच महौषधी आहे तर सुखप्राप्तीसाठी हेंच अमृत होय.
तुम्ही सर्व या अमृतपानाने सर्व दुःखाचा नाश करून घेऊन अमर होऊन सुखाने जगा !

‘ सर्वस्तरतु दुर्गाणि सर्व भद्राणि पश्चतु | ‘

श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img