Literature

ज्येष्ठ शुद्ध दशमी

आपले आई-वडील मृत्यु पावल्यावर त्यांचा सुखप्रवास व्हावा, त्यांना सत्त्यलोकाची प्राप्ती व्हावी म्हणून लोक दानधर्म करीत असतात. तर मग जीवंत असतांनाच दानधर्म करून आपल्या स्वतःच्या भावी सुखप्रवासांत उपयोगी पडणारी शिधासामुग्री अगोदरच पाठविणे जास्त योग्य ठरेल. ‘ दिलेले तुझें, शिल्लक राहिलेले दुसऱ्याचे ‘ ही म्हण फारच अर्थपूर्ण आहे.

या जगांत सुख कोणते व दुःख कोणते ह्याचा उलगडा करून घेण्याची शक्ती मानव जन्मामध्येच आहे. बाकी प्राण्यांना ही शक्ती असूं शकत नाही. आपण कोठे चुकतो ? कसे वागले पाहिजे ? शाश्वत सुखाचे साधन कोणते ? ही जाणीव ज्यांना आहे ते खरे मानव होत असे म्हटले पाहिजे. परंतु हा विवेकाचा मार्ग अवलंबणारा मनुष्य विरळाच केवळ विषयासक्ततेंत काळ घालविणारे महाभाग पुष्कळ आहेत. या कलिकालामध्ये तर ही दुर्वृत्ती वाढतच आहे. खोटे, अन्याय, अपप्रचार, परस्त्रीगमन, परस्वअपहार, मद्यपान, मांसभक्षण, द्यूतकर्म, दूराचार हे सर्वत्र दिसून येतात. जशी जशी कोर्टकचेऱ्यांची संख्या देशांत वाढत आहे. तशी तशी हीं दुष्कर्मे जास्त जास्त होतांना आढळतात. परवांच एक गृहस्थ म्हणाला की ‘ जशी जशी डाॅक्टर-वैद्यांची संख्या वाढते तसे तसे रोगांचे प्रकारहि वाढले आहेत.’ अर्थात कदाचित त्याने हे गमतीखातरही म्हटले असावे.

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img