Literature

तत्त्वज्ञानी

एवमेवैष संप्रसादोऽस्माच्छरीरात्समुत्थाय परं ज्योतिरुपसंपथ स्वेन रूपेणाभिनिष्पद्यते स उत्तमः पुरुषः स तत्र पर्योति जक्षन क्रीडिन रममाणः स्त्रीभिर्वा यानैर्वा ज्ञातिभिर्वा नोपजनं स्मरन्निद शरीरं (छां. उ. ८-१२-३).

-देहरहित असणारें आनंदधन चैतन्यच तुझें आणि या सर्वांचेहि एक शुद्ध व सत्य स्वरूप आहे. या आनंदमात्र स्वरूपाखेरीज अन्य असे कांहीं नाहींच. अशा या गुरूपविष्ट तत्त्वाचा साक्षात्कार होऊन स्वसंवैध स्वप्रकाश, ज्ञानानंदरूप आपण एक या आपल्या रूपानेच स्वमात्र आहो अशा अविचलित निश्चयाचा निर्विकल्प मनुष्य ‘ उत्तम पुरुष’ महात्मा होय. हा स्त्रीपुरुषांच्या समाजांत असतांना, यांच्याबरोबर एका बाहनादियांतून प्रवास करतांना, पायीं मार्गाने जातांना अथवा भोजनादि व्यापारांत असतांना, सरस – सल्लापानें हास्य विनोदादि करीत असतांना, क्रीडादिकांत रमून गेला असतांना अथवा एकांतांत असतांना कोणत्याहि स्थितींत सर्वात्मभावाने राहणारा हा समीप असणारी शरीरे पाहत नाही, याच्या ठिकाणी निराकार रूपाची अशीच कांही दिव्य दृष्टि खिळून असते, तो नित्य निर्विकार असतो. अत्यंत विशुद्ध अशा अद्वितीय आनंदमात्र स्वरूपस्थितीनेच हा असतो. हें ज्ञान्यांचे लक्षण. ही आर्याची ज्ञाननिष्ठा. हिलाच जीवन्मुक्ति असे म्हणतात.

यस्त्वात्मव्यतिरेकेण द्विर्तायं नैव पश्यति । ब्रह्मभूतः स विज्ञेयो दक्षपक्ष उदाहृतः ॥ (दक्ष. स्मृ. ७१११)

आपल्याव्यतिरिक्त असे दुसरे म्हणून तो पहातच नाही. तोच एक ब्रह्मरूप झाला असे दक्ष प्रजापतीचे हे मत आहे. असा या श्लोकाचा अर्थ. इतकी उन्नत भूमिका जोपर्यंत साधत नाही, तोपर्यंत मातृवत्परदारेषु परद्रव्येषु लोष्टवत् । परस्त्रीच्या ठिकाणी मातेप्रमाणे, परद्रव्याच्या ठिकाणी मातीप्रमाणे भावना कर, म्हणून महात्म्यांचा उपदेश असतो. परदारेश्वसंसगों धर्मस्त्री परिरक्षणम् । अहिंसा सत्यवचनं सर्वभूतानुकंपनम् ॥ शमो दानं यथा शक्ति गार्हस्थो धर्म उच्यते ॥ स्त्रियांच्या ठिकाणी मातृबुद्धि, विवाहित स्वस्त्रीचें धर्मानुरूप रक्षण, अहिंसा, सत्यवचन, भूतदया, सर्वभूतहित दृष्टि, मनोनिग्रह, बालेंद्रियनिग्रह, यथाशक्ति दानधर्म, नातिन्याय हा गृहस्थधर्म आहे. मातृवत् स्वसृवच्चैव नित्यं दुहितृवच्च ये । परदारेषु वर्तन्ते ते नरा स्वर्गगामिनः । —मातेप्रमाणे, भगिनीप्रमाणे, मुलीप्रमाणे, परस्त्रीशीं वागणारा उत्तम गति प्राप्त करून घेतो. आर्यसंस्कृतीचें असें हें उदात्त रूप आहे.

परदाराभिमर्शेषु प्रवृत्तान् नृन्महीपतिः । उद्वेजनकरैर्दण्डैरिच्छन्नयित्वा प्रवासयेत् ॥ (मनु. ८-३५२)

-परस्त्रीला भ्रष्टविण्याची प्रवृत्ति असणाऱ्या लोकांना मरेपर्यंत आठवण राहील अशी शिक्षा द्यावी. पाहताक्षणीच हा अशा प्रकारचा म्हणून, अशा प्रकारें बागलें असतां अशी शिक्षा होतें हें माहीत व्हावे म्हणून व अशा प्रकारे पुन्हां कोणीहिं करूं नये म्हणून, चांगली खूण राहील असें नाक, कान यांपैकी कांहीं अथवा दुसरा कोणता तरी हातापायाचा भाग कापून हांकून द्याबें, असें या श्लोकांत मनूनें सांगितलें आहे. एवढी कडक शिक्षा कां ? म्हणून कुणालाहिं शंका येईल हें ताडून, त्याच्या आवश्यकतेचें तोच स्पष्टीकरण करतो.

तत्समुत्थो हि लोकस्य जायते वर्णसंकरः ।येन मूलहरोऽधर्मः सर्वनाशाय कल्पते ॥ ( मनु. ८-३५३)

—असल्या नीतिभ्रष्ट मनुष्यापासूनच समाजांत वर्णसंकर होतो. या वर्णसंकरामुळे अधर्मप्रवृत्ति, सत्कर्माचा व सज्जनांचा द्वेष वाढतो. यज्ञादिक करें चालत नाहीत. यामुळे धनधान्य-पर्जन्यादि बंद होते, दुष्काळ पडतो, नवीन नवीन रोगांची उत्पत्ति होते व असा राष्ट्राचा बराच नाश होतो. श्राद्धपक्षादि बंद पडल्यामुळे स्त्रिया भ्रष्ट झाल्यामुळे, वंशान्त्रय खुंटल्यामुळे पितर नरकास जातात. अशा रीतीने वर्णसंकर करणाऱ्याला म्हणजे कुलनाश करणाऱ्याला, त्या कुलाला व त्या कुलांच्या पितरांना नरकप्राप्ति होते. अशा दुष्टांची संख्या जास्त झाल्याने मूळ वैदिक धर्म लुप्त होतो, मन दृष्ट व अपवित्र होते. दुष्कृत्या कडेच ते अधिक बाहू लागते. भक्ति, ज्ञान, वैराग्य काही राहातच नाही. आम स्वरूपाची स्मृति यांना होत नाही. त्याला कारण असणारी विक्ति यांना लाभत नाही. मोक्षभागी होण्याऐवजी सर्वहि नरकभागी होतात. मनुमहाराजांनी नियुक्त केलेली ही शिक्षा इतकी घोर याकरितां आहे. नासका मनुष्य स्वतः नासतो तो नासतोच, दुसऱ्यालाहि तो आपल्याबरोबर नासवितो, म्हणून त्याला मनूनें इतकी शिक्षा सांगितली आहे हे स्पष्ट होते.

अकुर्वन विहितं कर्म निदितं च समाचरन् । प्रसजंश्चंद्रियार्थेषु नरः पतनमृच्छति ( याज्ञवल्क्य २३)

शास्त्रविधि उल्लंघन, विहित कर्माना फांटा देऊन जो मत मानेल तसा निषिद्ध कर्मास प्रवृत्त होतो, केवल इंद्रियलंपट होतो. त्याचे यश, कीर्ति, प्रताप, माईमा, आरोग्य यांचा नाश होऊन, इहकीर्ति व परत्रांची गति नष्ट होते. तो भ्रष्ट होतो. हाच पतित म्हणवून घेतो.

तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ । ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि ॥ २१ ।।

त्यामुळे कार्याकार्य विचारासंबंधी शास्त्रच एक प्रमाण आहे. शास्त्रांत सांगितलेले प्रमाण मानून, त्याचे महत्त्व चांगले जाणून घेऊन उभ्या जीवनां तली सर्व कार्य यथोक्त प्रकारे सुरळीत चालवावीत.

home-last-sec-img