Literature

दांपत्यजीवनाचे तात्विक रहस्य

भगवद्गीते

त जीवालाच प्रकृति म्हणून अंश म्हणून दोन्ही रूपांनी संबोधिलेलें खालील श्लोकावरून दिसून येते. अंश म्हणा या प्रकृति म्हणा परमात्म्याचीच ही संकल्पाने घरलेली रूपे आहेत असे निश्चित केले म्हणजे दोन्हींचा अर्थ एकच होतो. नित्यः सर्वगतो ह्यात्मा कूटस्थो दोषवर्जितः । एकः सन्भिद्यते भ्रांत्या मायया न स्वरूपतः ॥ (श्रीजाबालोपानिपतदर्शन १०-२) ( निकायः पुंजराशीतूत्करः कूटमस्त्रियाम् ) देह, इंद्रियें, मन आदिकांच्या राशीत-समूहांत असणारा ‘क्रूटे स्थितः कूटस्थः । कूटस्थ म्हणवून घेतो. यंत्राप्रमाणे असणाऱ्या देहादिकांत विजेप्रमाणे चैतन्यरूपानें सदा एकरूप व निश्चल असणारा कूटस्थ, कूट म्हणजे माया या अर्थी मायेंत राहून तिला असंग असलेला अथवा फसविणाऱ्या खोट्या अशा मायाकायांत त्याला असंग असा राहून नित्य आपल्या रूपानें जशाचा तसा राहणारा, शैल श्रृंगाप्रमाणे असणाऱ्या देहशिरोभागाच्या ब्रह्मरंभ्रांत असणारा असे कूटस्थ या शब्दाचे अर्थ होतात. ‘कूट इव स्थितः कूटस्थः ।’ सोनाराच्या ऐरणीवर किती दागिने घडले जातात तरी पण ती ऐरण जशीच्या तशचि असल्याप्रमाणे मायेकडून किती जगाचे आकार घडले गेले तरी ज्यांत कांही विकार होत नाहीं तो कूटस्थ, नांगराच्या फाळाप्रमाणे आपल्या विचारानें माया कार्य भेदून जाणारा. असे हे सर्व अर्थहि आत्मदृष्टीनें लागू पडतात. माया निश्चलयंत्रेषु कैतवानृतराशिषु । अयोधने शैलगे सीरांगे कूटमस्त्रि याम् । ( अमर ) वरील सर्व अर्थ या श्लोकांत आले आहेत. कालव्यापी स कूटस्थः स्थावरो जंगमेतरः । स्थावर जंगमाहून वेगळा, कालव्यापी म्हणजे त्रिकालाबाधित, नित्य निश्चल असणारा कूटस्थ असाहि अर्थ होतो. ‘कूटस्थः कूटे निश्चलः सन् तिष्ठतीति कूटस्थः । ‘ असा हा कूटस्थ आत्मा. ‘ अंचत इति आत्मा’ स्वप्रकाशरूप सर्वव्यापी असून अविनाशी आहे. तो सर्वांच्या रूपाने एकच आहे. एक असून देखील मायेनेंच केवळ वेगळा मानला जातो. ही भ्रांति मायेमुळेच होते. अन्यथाकार दर्शनं माया । वस्तुस्थितीहून वेगळ्या प्रकारें दाखविणारी माया अथवा भ्रांति म्हणून म्हटली जाते. यदा पश्यति चात्मानं केवलं परमार्थतः । मायामात्रं जगत्कृत्स्नं तदा भवति निर्वृतिः । (१०-१२) पारमार्थिक दृष्टीने केवळ आपणच एक आहों असे जेव्हां वधूं लागतो आणि हें मायेमुळेच केवळ स्वरूपाचें अन्यथा दर्शन या जगदूपानें होत असतें असें जाणतो तेव्हां या जीवभावाची निवृत्ति होते. स्वशरीरे स्वयंज्योतिः स्वरूपं पारमार्थिकं । क्षीणदोषाः प्रपश्यन्ति नेतरे माययावृताः ।। ( पाशु. ब्र. उ. ) आत्म साधनांनी निर्दोष झालेल्यांनाच फक्त आपल्या देहांत असणाऱ्या स्वयंज्योति अशा पारमार्थिक स्वरूपाचे दर्शन होतें; मायावृतांना तें होत नाहीं. एकरूपा पराविद्या सत्येन तपसापि च । ब्रह्मचर्यादिभिर्धर्मेर्लभ्या वेदांतवर्त्मना ॥ ३२॥ ही श्रेष्ठ अध्यात्मविद्या ( अध्यात्मविद्या विद्यानाम् ‘ ) सत्य शास्त्रीय असे नियमित आचरण, व्रतोपवास, ब्रह्मचर्यादि साधनें यांनीं व मुख्यतः बेदांताच्या मार्गानें आत्मान्वेषण केल्यास संप्राप्त होते. ज्ञानस्वरूपमेवाहुर्जगदे तद्विलक्षणम्। अर्थस्वरूपमज्ञानात्पश्यन्त्यन्ये कुदृष्टयः ॥—हें अखिल जग केवळ एक ज्ञानस्वरूपच असतां मायामोहित अशा कुदृष्टीला भोग्यरूप बाटतें असे उपनिषदांचे सांगणे आहे. ज्ञानस्वरूपाची दृष्टि त्यांना जगांत स्थिर करावयाची आहे यामुळे विवाहगर्भादानादि संस्कारांची तत्त्वनिष्ठा उद्दीपित करणाऱ्या मंत्रांसहित परिष्कृत व नियमबद्ध अशी आंखणी त्यांनी केली आहे. प्रकृतिपुरुषांचें ऐक्य विवाहांतहि स्थूलमानानें प्रगट करून लक्षणेनें अद्वितीय ब्रह्मतत्त्वाचा वधूवरांना श्रुति बोध करते, दांपत्यजीवनाचे असे हैं तात्त्विक रहस्य उकलून दाखविते, सतीपतींच्या यथार्थ मूळ रूपाची जाणीव देते, अभ्युदयनिःश्रेयसाचा राजमार्ग दाखविते. अपौरुषेय वेदाची ही परिशुद दृष्टि ! हे वैदिक धर्माचें तात्त्विक दर्शन ! हे दांपत्तिक विश्वधर्माचें सारसर्वस्व | प्रकृति ही पुरुषाच्या प्राप्तीनेच कार्यक्षम होते, हें तत्त्व देहरूपाच्या स्थूलमानानें वधूवरांच्या लग्नांत प्रगट होते.

अर्धार्ध भाग मिळून जशी एक पूर्ण वस्तु होते त्याप्रमाणे प्रकृति पुरुषांचे एकीकरण म्हणजे एक अखंड परमात्मस्वरूप कार्य हें पूर्ण रूपानेंच व्हात्र याला लागतें म्हणून स्त्रीपुरुष लग्नानें एकरूप होतात आणि मग सृष्टीचे प्रो त्पादन, श्रौतस्मार्तादि सर्व कार्ये करतात.

home-last-sec-img