Literature

दासनवमीचे महत्त्व

ॐ ॐ ॐ गणेश: शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा ॥ आराध्य दैवतं गृह्यं सर्व मे रघुनंदनः || 

गणेच शारदा सद्गुरू । संत सज्जन कुलेश्वरू सर्व हि माझा रघुवीर । सद्गुरुरूपे ।। १ ।। 

आह्मां तुह्मासि भववाविधिमाजी तारूं । जें वाचिता परिसितां मय होय तारू ॥ से दासबोध पचना घडली जय ला |

वंदू निरंतर तया गुरुराजवाला ॥ ॥ १ ॥

रघुनाथ पंडितांनी केलेले हे श्रीसमर्थ रामदास गणवर्णन आहे. दासनवमीचे महत्त्वही यातच आहे. ते सांगून कळणार नाही.श्रीसमर्थांनी देह सोडला, तो बार शनिवार, माघ वद्य नवमी, दिवसा दोन प्रहरी अवतार समाप्तीच्या शेवटच्या क्षणी श्री समर्थांनी आम्हाला आशीर्वाद दिला तसेच त्या राष्ट्रद्गुरुनी राष्ट्राला दिला.

माझी काया याणि वाणी । गेली म्हणाल अंतःकरणी । परि मी आहे जगज्जीवनी । निरंतर ॥ १ ॥ आत्माराम दासबोध | माझे स्वरूप स्वतः सिद्ध । असता न करावा हो खेद । भक्तजनीं ॥ २ ॥

श्रीसमर्थांनी सांगितले ‘माझी छाया गेली म्हणून माझा नाश झाला असे मानू नका. असो ऐसे सकलहि गेले । परंतु एकचि पाहिले । जे स्वरूपाकार झाले । आत्मज्ञानी ॥’ यांनी आत्मज्ञान मिळविले त्यांनी मृत्यूला जिवंतपणीच जिंकलेले बसते. अनेक महान, विद्वान, दानशूर व पराक्रमी लोक ह्या जय तून जातात परंतु आत्मज्ञानी राहतात. मी देह नसून चैतन्य – धन आहे, असे ज्ञान ज्यांना झाले तेच आत्मज्ञानी. आत्मपास जन्ममरण नाही त्या ब्रह्मस्वरूपाचे ज्यांना ज्ञान झाले ते ब्रह्मरूपच होऊन राहिले. त्यात कोणतीही उपाधी रहात नाही. हेच तत्व

श्रीसमचौनी अंतकालीही उकलून दाखविले. ‘श्री ह्या शरीराने जरी तुम्हास दिसलो नाही तरी मो सर्वांच्या हृदयात बाहे. चिरानद रूपाने कोठे जात नाही व येवही नाही.

‘आत्माराम दासबोध | माझे स्वरूप स्वतः सिद्ध’ असे ह्या ग्रंथाबद्दल श्रीसमर्थांनी आपल्या महाप्रयाणाच्या वेळी शिष्य मंडळींना सांगून नका करू खटपट | पहा माझा ग्रंथ नीट ।’ अशी सर्वांना आज्ञा केली आहे. मोक्षासाठी काही खटपट नको, माझे स्वरूपच असलेले दासबोध, आत्माराम हे ग्रंथ नीट पहा. कारण ‘तेणे सायुज्यतेची दाट । ठायी पडे ॥’ खात्रीने दिसेल, असा निश्चय बाणून घेतला पाहिजे. त्यात आम्हाला कोणतीच शंका असता कामा नये.

श्रीसमर्थांनी आपल्याला हे सांगितले असल्यामुळे लाभेल किवा नाही अशी शंकापुद्धा मनात नको.

भक्तिचेन योगे देव । निश्चये पावती मानव ऐसा आहे अभिप्राव । इपे ग्रंथी || ‘मुख्य भक्तीचा निश्चयो । शुदज्ञानाचा निश्चयो आत्मस्थितीचा निश्चयो । बोलिल असे || “

दासबोध हा ग्रंथ गुरुशिष्य संवादाच्या स्वरूपात लिहिला असून त्यातील मुख्य प्रतिशद्य विषय भक्ती हा आहे. ईश्वरप्राप्ती होते. शुद्ध ज्ञान म्हणजे काय ? आत्मस्थिती कशी असते? इत्यादी इतर सबंधित विषयाबद्दल माहिती यात आहे.

‘देहेबुद्धिचा निश्चयो दृढ झाला । देह तोत तो हीत सांडीत गेला | देहेबुद्धी ते आत्मबुद्धि करावो । सदा संगती सज्जनाची धरावी ॥ देहेबुद्धि ते आमबुद्धि करावी हे श्रीसमर्थांच्या उपदेशाचे सार आहे. हित आहे देहातीत |

म्हणोनि निरोपती संत ॥’ देह तोच मी असा निश्चय झाला, की देहापलीकडे काही सुख असेल असे वाटत नाही. ह्यासाठी देह तोच मी अशी जी अज्ञान किंवा अशुद्ध बुद्धी ती ‘अहं आत्मा ज्ञान किंवा शुद्ध बुद्धीने नष्ट करावी व शेवटो’ अहं आत्मा ह्या बुद्धीचाही विसर पडावा. अभिमानाचा त्याग आत्मा कल्याणप्रद आाहे. कोणत्याही कर्माचा अभिमान नको. सर्व कर्मे ब्रह्मार्पण करा. देहाच्याकडून काही तरी कर्म होतच असते. सहज जाता येता कित्येक सूक्ष्म जंतु मरतात. त्यामुळे काहीच पाप होत नाही असे म्हणता येणार नाही. पापणीची नुसती उघडझाप केली तरी किती तरी सूक्ष्म जंतू मरतात. काहीच कर्म केले नाही तर कर्माचे फळ कोठून मिळणार ? कर्म कोणीही करीत नाही. ते मन, इंद्रिये, संस्कार, वासना, सृष्टीक्रम ह्यामुळेच होते.

कारखान्यात अनेक यंत्र मुख्य यंत्राच्या सहाय्याने कामे करतात. अमुक एकानेच ते केले बसे होत नाही. वस्त्राचे उदा हरण घतले तर शेतकऱ्याने कापूस पिकविण्यापासून तो यंत्रातून वस्त्र बाहेर पडेपर्यंत सर्वांचेच ‘ मी केले’ हा अभिमान नको ! सहाय्य होत असते.

‘पहा देहाच्या विसरे। वर्त नका वाईट बरे | 

यात्मशुद्धिकरता कर्म असून तेही ईश्वरार्पण करावयाचे, कर्तृत्वाची भावना बाळगून असणारा ‘मूढ’ म्हणून सांगितले बाहे. श्रीसमर्थ ह्या शब्दात फार गंभीर अर्थ भरला असून ‘ समर्थ समर्थ करावे’ असे म्हटले जाते. अर्थात तो स्वतः समर्थ बनून परिपूर्णत्व प्राप्त करून इतरांनाही आपल्याप्रमाणेच

समर्थ करतो. ‘ यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥

गीतेतील श्री भगवंताच्या वचनानुसार तत्कालीन घोर अशी धर्मग्लानी नाहीशी करण्यासाठी श्रीसमर्थ रामदास स्वामी भारतात अवतीर्ण झाले. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सर्व प्रकारे सनातन हिंदु धर्माचे अभ्युत्थान करून  भगवा ध्वज फडकविला ही गोष्ट सर्व सर्वसामान्य जनतेलाही माहित आहे. ह्या भगव्या ध्वजात त्याग व ऐश्वयं यांचे ऐक्य असून तो श्रेय व प्रेय यांना जोडतो हे सांगण्याची आवश्यकता नाही. केला. समर्था नी संपूर्ण जीवनात काय केले ? वर जगदोद्धार जगदोद्धार कशाने होतो ? नासिक पंचवटीतील प्रेमी श्रीसमर्थांचे बारा ओव्यात पत्र आहे. त्यांनी उभारलेल्या समर्थ संप्रदायाची शुद्ध उपासना, विमलज्ञान, वैराग्य, ब्राह्मण्यरक्षण व गुरु परंपचापालन ही बीजरूप पंचसूत्री हे सर्व त्या बाबा ओव्यात सुव्यक्त केले आहेत.

 जन स्थान गोदातटी । परम पावन पंचवटी । तेथे पडली कृपादृष्टी । रघुनाथ शयाची ॥ १ ॥ शुद्ध उपासना आणि ज्ञान | वीतराग ब्राह्मण्य रक्षण | गुरुपरंपरेचे लक्षण | शुद्धमार्ग ॥ २ ॥ ऐसे पंचधा बोलिले । इतुकें पाहिजे यत्ने केलें । म्हणजे सकळहि पावलें । म्हणें दासानुदास || ३ ।। ‘

शेवटच्या दोन ओव्यात सांगितलेलो पंचसूत्री श्रीमद्दास बोधातही चवथ्या दशकाच्या दुसन्या समासात सांगितली आहे.

ब्राह्मण्य रक्षावे आदरे । उपासनेची भजन द्वारे ॥ गुरुपरंपरा निर्धारे ! चलोच नेदावी || करावे वैराग्य रक्षण | रक्षावे ज्ञानांचे लक्षण ॥ परम विचक्षण | सर्व ही सांभाळी ॥

श्रीसमर्थांनी देव, धर्म, गो-ब्राह्मण यांचे संरक्षण केले. ते त्यांनी आपल्या डोक्यानेच केले की प्रेरणा झाली ?  देव, धर्म, गो-ब्राह्मण | यांचे करावया रक्षण | हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली ॥’ तर नारायणाची प्रेरणा झाली म्हणून केले. देवधर्मं, गो-ब्राह्मण ह्यात प्रथम देव आहे. ज्याने सर्व निमणि केले तो देव, त्याची जाणीव आम्ही करून घेतली पाहिजे. गर्भात जीव प्रार्थना करतो, मी कुटुंबावर विश्वास ठेवून इतराच्या सुखासाठी करू नये ते केले. पण आज त्याचे कोणीही भागीदार नाहीत. ज्यांच्या सुखासाठी केले ते सर्व गेले, त्या सर्वांचे कर्म मी एकटाच भोगीत आहे. यातून मुक्त झालो तर गर्मी म्हणे सोऽहं सोऽहं । बाहेर पडता म्हणे कोऽहं । ऐसा कष्टो झाला बहू । गर्भवासी ॥’ म्हणून देवाची शक्ती करणे, वाहून घेणे व आपले, जीवन देवाकरताच आहे असे समजावे. यासाठी

उपासनेचा मोठा आश्रयो उपासनेंविण निराश्रयो उदंड केले तरी तो जयो । प्राप्त नाही ॥ सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे | परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ||

उपासनेचा फार मोठा आधार आहे. तेव्हा उपासना, पर मात्मदर्शन यांचा आधार जीवाला मिळाला म्हणजे काही कमी मी ‘ हे मान त्या आनंदस्वरूपात जेव्हा मिळून जाते तेव्हाच धर्मस्थापनेसाठी त्याच्या अंगी सामथ्र्यं वाणते. धर्म स्थापनेचे नर । ते ईश्वराचे अवतार ।’ आपले संपूर्ण जीवन धर्मस्थापनेसाठीच समर्पण करणारा मानवरूपात दिसत असला तरी तो साक्षात् भगवंताचा अवतार असतो.

‘ समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे । जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षीं कदा राम दासाभिमानी || ‘ अच्छा पूर्ण तयारीने धर्म व कर्म करावयाचे. ‘ धर्मो विश्वस्थ जगत प्रतिष्ठा ।’ असे श्रुतीचे सांगणे आहे. आमचा हा सनातन आर्य वैदिक धर्म, वेद त्यांचेच. वेद ही परमात्म्याची वाणी परमेश्वराने वेदांच्या मुखाने सांगितला तो धर्म व त्याप्रमाणे वागणे म्हणजेच परमात्म्याच्या आज्ञेत राहणे. त्याविरुद्ध वागणे म्हणजे समजून उमजून यापला नाश करणेच होय. हा धर्म कोणी मनुष्याने लिहिला नाही. सनातन वैदिक धर्मच अखिल विश्वाची एकमेव आधारशिला आहे. पण हा धर्म म्हणजे काय ?

यतोऽभ्युदयनिःश्रेयस सिद्धोः स धर्मः’ असे महर्षी कणाद म्हणतात, मखिल मानव जातीचे ऐहिक प्रेय व पारलौकिक श्रेय यांना जो असाधारणपणे एकमेव कारण मसतो, ज्याच्यामुळे मानवाला अभ्युदयाची व निःश्रेयसाची प्राप्ती होते तोच धर्म. ‘धर्मादर्थश्च कामश्च । ‘ सनातन विश्वधर्माच्या आचरणामुळेच धर्म अर्थ, काम व मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थाचा लाभ होतो. श्रीसमर्थांनी ह्या धृतिवचनातील गूढ अर्थ ध्यानात घेऊन गोब्राह्मणाची पूजा करण्यावर जास्त भर दिला होता.

यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः । न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम् ॥ ह्या गीतेतील वचनानुसार जी व्यक्ती शास्त्रोक्त धर्माचरणाचा त्याग करून आपल्या मनाप्रमाणे आचरण करते, तिला लौकिक सुख मिळत नाही, उत्तम गतीही प्राप्त होत नाही व मोक्षही मिळत नाही. श्रीकृष्ण भगवानांची गीतेत ‘शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यै कान्तिकस्य च ।’ असे म्हटले बाहे. धर्माच्या योगे सर्व पापाचा क्षय होतो. धर्म हे जीवनाचे मुख्य कारण आहे. परमात्मस्वरुपाचे ज्ञान करून घेऊन जगणे हेच खरे जगणे. बाकी मृतवत् | ज्याने परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतला त्याचे जीवन शोमायमान. नाही तर श्वान वगैरे जगतातच. लेकरे-वाळेही असतात. त्याव काही विशेष नाही. धर्म म्हणजे रक्षण.  धर्मो रक्षति रक्षितः । ‘धर्म म्हणजे संरक्षण, धर्म म्हणजे जीवन. धर्म म्हणजे रक्षण, पालन, जीवन. त्याचा त्याग म्हणजे मरण.हा वैदिक धर्म परमात्मप्रणित आहे. त्यात पायरी पायरीने उपदेश केला आहे. एकदमच एम्. ए. च्या परीक्षेस बसता येत नाही. त्याची पात्रता वाढवत वाढवत पुढे न्यावी लागते.

शव पडलेले असते. त्याच्याबरोबर काय जाते ? घरातच राहते. पशु गोठ्यात असतात. मुले-बाळेही घरीच असतात. लोक स्मशानापर्यंत येतात. त्याने जे बरे वाईट कर्म केले असेल ते त्याच्या बरोबर जाते. शव जाळून सर्व परततात. धर्म मात्र त्याच्याबरोबर जातो. पण आज देशात व जगात इतको अशांती, वैमनस्य, जीवनोपयोगी वस्तूंची चणचण आणि अव्यवस्था का बरे आलो ? सर्व प्राणीमात्र दुःखाने, काळजीने का बरे होरपळून निघाले आहेत ? ‘ धर्माविरुद्ध आचरण’ हेच याचे एकमेव कारण आहे. धर्माचार, सदाचार हे सुखाचे मूळ होत. सदाचारविहीन प्राण्याला वेदसुद्धा शुद्ध करू शकत नाहीत.

आचारहीनं न पुनन्ति वेदाः । श्रुतिस्मृती ममैवाज्ञे यस्त उल्लङ:घ्य वर्तते । आज्ञाछेदी मम द्रोही नासौ भक्तो न मे प्रियः ॥’। १३३ !

श्रुतिस्मृती माझ्या आज्ञा असून त्यांच्या आज्ञांचे जे उल्लंघन करतात, त्याचा त्याग करतात ते माझे भक्त नव्हेत. ते मला आवडत नाहीत. ते माझे द्रोहीच होत. भगवंत सत्-चित आनंद आहे ही गोष्ट ध्यानात ठेवावी. जगाचे संपूर्ण अस्तित्व, सर्वज्ञान व संपूर्ण आनंद त्याचे स्वरूप होय. भगवंताशी द्रोह करणे, त्याची आज्ञा म्हणजेच श्रुतिस्मृतींची आज्ञा न पाळणे हे प्रत्यक्षपणे सुखाशीच द्रोह करण्यासारखे नाही का ? सुखाशी द्रोह करणारास दुःखाशिवाय दुसरे काय प्राप्त होणार ?

हल्ली गोवध, गोमांसभक्षण हे महापाप दिवसेंदिवस वाढत आहे. व तेही ह्या पवित्र भारतभूमीवर. भारत याचा अर्थ भासि – विद्यायां रतः भारतः ‘ब्रह्मविद्येव किंवा शाश्वतरूपी सुख प्राप्तीचे साधनरूप असलेल्या धर्माचरणात रत असलेल्या ह्या भारतभूमीवर हे पाप होत आहे. अहाहा 1 ह्या भारत देशाचे महत्त्व किती महान आहे !! ज्याप्रमाणे घरात अत्यंत पवित्र, सात्विक अशी देवाची खोली असते त्या प्रमाणे ह्या सृष्टीचे भारत हे देवघर आहे. विश्वाचे हे देवघर आपण किती पवित्र ठेविले पाहिजे ?

गाय, गायीला आत्मा नाही असे गोमांस खाणारे म्हणतात. प्राण असल्यामुळेच ती वावरते. गाय सामान्य प्राणी नव्हे. गायीचे महत्व फार मोठे आहे, ‘ मातरः सर्वभूतांनां गावः सर्व सुखप्रदा।’ गाय सर्व प्राण्यांची माता आहे. सामान्य माता आपल्या मुलांना आपल्या स्तनातील दूध पाजतात पण हो गोमाता आबालवृद्ध शत्रु मित्र ह्या सर्वांना आपपर भाव न दाखवता त्याने केलेल्या उपकार – अपकाराचा विचार न करता आपले दूध पाजीत असते. अशावेळी सामान्य मातेपेक्षा गोमातेचे स्थान किती उच्च आहे हे स्पष्ट दिसते. गोवध करणे म्हणजे सर्वोच्च मातेचाच वध करणे हे कोणाला समजणार नाही ?

श्री कृष्ण हा परमात्मा! त्यांनी गायीचे रक्षण केले गृहस्थाने गोसेवा केली पाहिजे. केले. ‘ गवां सेवा तु कर्तव्या गृहस्थैः पुण्यलिप्सुभिः । गवां सेवापरो यस्तु तस्य श्रीः वर्धते चिरात् ॥ ‘ देवाच्या कृपेस पात्र व्हावेसे वाटते त्याने गोसेवा करावी. गोसेवा करणाराची संपत्ती कायम वाढते. उत्तम पवित्र खत गायीचेच. कोणताही प्राणी असो पण ज्याचे मल, प्राशन केले जाते तो प्राणी किती पवित्र आहे ? कर्ज फेडण्यासाठी गोमांसाचा देवनारला कारखाना काढला आहे म्हणे ! परदेशात गोमांसाचे सिलबंद डबे पाठवून भरपूर परकीय चलन प्राप्त होईल असे म्हणतात. पण ही सबब अत्यंत तोकडी आहे हे समजूतदारांना सांगायची गरज नाही.

एक सर्प एका गरीबास त्याच्या योगक्षेमाकरता रोज एक मोहोर देत असे. एके दिवशी त्या गरिबास, ह्या सर्पाजवळ मोहराचा मोठा संग्रह बसावा, त्याला मारून आपण धनराशी का प्राप्त करू नये ? अशी दुर्बुद्धी सुचून त्याने सर्पाला ठाय केले. पण त्यामुळे धनराशी तर दूरच चाहिलो पण रोज खर्चासाठी मिळणारी मोहोरही मिळणे बंद झाले. अशीच ही गोष्ट नाही काय ? हा भारतवर्ष वैदिक धर्माचा आहे. कुठे चालला आहात तुम्ही ?

‘यद्गृहे दुःखिता गावः स याति नरकं नरः । ज्या घरात, ज्या देशात गाई दुःखी असतात तेथे शांति नसते व ती प्राप्तद्दि होत नाही. ज्याच्या येथे गाई दुःखाने अश्रू ढाळतात त्याला नरकाचीच प्राप्ती होते. पिठामध्ये जो सत्वे आहेत

त्यापेक्षा आठपट जास्त सत्वे दुधात असतात. मानव देह वीर्यामुळे चाळतो व दुधाने ते लवकर तयार होते. गाईचे तूप आयुष्य वाढविते. गोरक्षण करण्यात तुमचे काय जाते ? गोरक्षणाने सुखाचीच प्राप्ती होते. गाय साधासुधा कोणता प्राणी नाही. धेनुसेवा करणारे ऋष बी. ए. झाले नव्हते. पण ते द्रष्टे होते. जसा हा धर्म कोणी मनुष्याने लिहिलेला नाही तशी गोसेवाही सामान्य नव्हे. तपांत जे पुण्य पाहे, पृथ्वी प्रदक्षिणेत जे पुण्य आहे ते केवळ गोसेवेनेच प्राप्त होते.

तीर्थस्नानेषु यत्पुण्यं यत्पुण्यविप्रभोजने । यत्पुण्यं च महादाने यत्पुण्यं हरिसेवने ॥ सर्व व्रतोपवासेषु सर्वेष्वेव तपस्तु च । भूमिपर्यटने यस्तु सत्यवाक्येषु यद्भवेत् ॥ तत्पुण्यं प्राप्यते सद्य: केवला धेनुसेवया ॥

आज आर्याचे वंशज गोवधाच्या बाजूने मत प्रदर्शित करीत आहेत. व तेही मंत्रीपदावरून ! पाव किती पवित्र माहे म्हणून

‘त्वं माता सर्व देवानां त्वं च यज्ञस्य कारणम् । त्वं तीर्थ सर्व तीर्थानां नमोऽस्तु सदाऽनघे ॥

गाय सर्व देवांची माता आहे. यज्ञशुद्धीसाठी यज्ञ मंडपात प्रथम गाईला नेतात. सर्वं तीर्थांचे पुण्यतीर्थ ती आहे. निष्पापमूर्ती असलेल्या गाईस माझा नमस्कार असो केवळ गायच नव्हे तर तिचे पंच गव्यही पापदहन करते. वस्तुस्थितीच तशी आहे.

‘ यत्वगस्थिगतं पापं देहे तिष्ठति मामके | प्राशनात पंचगव्यस्य वह्त्याग्निरिवेन्धनम् ॥

इंधनास अग्नि जाळून घस्म करतो त्याप्रमाणे शरीरातल्या अस्थीत असलेले सर्व पाप पंचगव्य प्राशनाने नष्ट होते. पंचगव्यात गाईचे दूध, दही, तूप, मुत्र व शेण असते हे कोण जाणत नाही. गाईच्या गोठयात क्षयरोगी राहिला तर तो शेण गोमुत्राच्या वासानेच बरा होतो. सर्व तीर्थाचे तीर्थ गाय आहे. गाई इतके श्रेष्ठ काहीच नाही. बध करण्यास योग्य नसलेला प्राणी म्हणजे गाय ?

अघ्न्या इति गवां क एनां हंतुमर्हसि ।’ संस्कृतीत गाईचे अध्या- हन्तुं अयोग्या इति अध्न्या । हे नाव बाहे. वाघ्न्याचा पर्याय शब्द ‘ अवध्या ‘ होय. अशा पवित्र गाईचा वध करणारा कोणत्या प्रतीचा हे सांगणे कठीण आहे. कोणीही गाय मारू शकत नाही. कारण

पृष्ठे ब्रह्मा गले विष्णुर्मुखे रुद्रः प्रतिष्ठितः । मध्ये देवगण: सर्वे रोमकूपे महर्षयः । नागा पुच्छे खुराग्रेषुये चाष्टौकुलपर्वतः । सुत्रे गंगादमो नद्यो नेत्रयोः शशि भास्करौ || येन तस्या स्तनें वेदा: साधेनुर्वरदोऽस्तु मे ॥

तिच्या पाठीवर ब्रह्मदेव गळ्यात विष्णु, तोंडात रुद्र, मध्य भागात देवगण, शरीरावरील केसात महर्षी, शेपटीत नागदेवता, सुरात आठ पर्वत, मुत्रामध्ये गंगादि पवित्र नद्या, डोळयात चंद्र सूर्य माणि स्तनामध्ये चारी वेद करतात अशी सर्व वेदमी गोमाता आम्हाला वरदायिवी होवो !! अशा गोमातेचा वध केल्याने काय दुष्परिणाम होतील ही एक विचार करण्याची गोष्ट माहे. आजच काही थोड्या प्रमाणात त्याचे दुष्परिणाम दिसतात, हया मातेच्या वत्सलतेमुळेच गोमातेस मारण्यास जे झाले आहेत, त्यांना उद्देशूनच मी हे सांगत आहे.

देशाचे नेतृत्व करणारी मंडळी आज अनेक धर्मविरोधी कार्य करीत आहेत. ‘ हिंदु कोड बिलासारखे कायदे करून फक्त हिंदु जनतेवरच लादून त्यांच्या धर्म स्वातंत्र्यावर ते घालीत आहेत. ह्या सर्व गोष्टी करून त्यांना हिंदु वंश बिच्छेद’ करावयाचा आहे हेच स्पष्ट दिसून येते. ठिकठिकाणी मदिरागृहे उघडली जात आहेत, गोमांस भक्षणासाठी निरनिराळ्या प्रकारे प्रचार करून त्यास प्रोत्साहन दिले जाते. ब्राह्मण तत्वाकडे दुर्लक्ष्यच केले जाते. खरे पाहिले तर सनातन वर्णाश्रम व्यवस्थाच समूळ उखडून टाकण्याचा प्रयत्न जोराने चालू आहे. उच्च वर्णीय पुरुषाने नीच वर्णातील मुलीशी विवाह करण्याचे ठरविल्यास त्याला सर्व प्रकारची मदत व प्रोत्साहन दिले जाते. अशाच लोकांचे आचरण व सल्ला प्रमाणभूत मानला जातो. अशा नेत्यांनी केलेले नियम प्रजेला पाळणे भाग पडते. राष्ट्राच्या सुदृढतेसाठी हा अत्यंत मोठा अभिशाप आहे. सर्वांना सुबुद्धी प्राप्त होवो !!

आज एखादा महात्मा उपदेश किंवा धार्मिक प्रवचन करू लागताच बहुतेक श्रोते उठून जातात. या उलट क सिनेनट, नटी, स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणविणारा नामधारी नेता त्यांना पाहण्यासाठी, त्यांची भाषणे ऐकण्यास गर्दी जमते.  

सर्वं महात्म्याचा उद्देश एक असतो. ‘ साधु दिसती वेगवेगळे । परी ते स्वरूपी मिळाले ॥ महात्म्यांना कोणाकडून काही मिळवायचे नसते. त्यांचे वांच्छित त्याना प्राप्त झालेलेच असते. जनतेचे भीषण दुःख व बुद्धीभ्रम पाहून तो नष्ट करण्या साठी ते प्रयत्नशील असतात. धर्म प्रवचनेही त्याच दृष्टीने केली जातात. पण त्याचा आज उपयोग होतो काय ?

ऊर्ध्वबहुवरोम्येष न च कश्चित् शृणोति मे। धर्मादर्थश्च कामश्च स किमर्थं न सेव्यते

धर्मापासून वयं व काम याची प्राप्ती होते म्हणून तुम्ही धर्माप्रमाणे आचरण का करीत नाही ? असे दोन्ही हात उभारून ओरडून सांगितले तरी कोणीही ऐकत नाही, असे श्री वैशंपायन व्यासांचे म्हणणे बाहे.

श्रीसमर्थांच्या जीवनाचे तत्व घमंरक्षण, ब्राह्मण्यरक्षण हेच आहे. आज देवताहि ! धर्मासाठी आम्हाला इतका का त्रास देता ? इतके दिवश का करता ? जय स्वतःच अध:पतित होऊ इच्छिते. त्याका खाम्ही काय करणार ? ‘ असे आम्हास सांगत आहेत. पण मी त्यांना म्हणालो

उत्पत्तिरेव विप्रस्य मूर्तिधर्मस्य शाश्वती । सहि धर्मार्थमुत्पन्नो ब्रह्मभूयाय कल्पते ॥ ,

ब्राह्मण जन्म धर्मरक्षणार्थंच आहे. तो स्वतःच धर्ममूर्ती असून धर्माचरण व धर्मरक्षण यासाठी वचनबद्ध आहे. स्वतः खडतर धर्माचरण करून ब्रह्मस्वरुप बनून सर्वांना धर्मोपदेश करून त्यांना धर्म मार्गावर पुन्हा प्रतिष्ठित करणे हेच ब्राह्मणांचे जीवनव्रत बाहे. यासाठीच ब्राह्मणाचे रक्षण केले पाहिजे.

उपदेश करण्याचा अधिकार ब्राह्मणाला. विषय सुखासाठी ब्राह्मण जन्म नाही. एक ब्राह्मणवर्ग ताळचावर असला तर इतर वर्णही आपापल्या कार्यात व आचरणात व्यवस्थित राहतील. ह्या म्हणण्यास श्रीमत् शंकराचार्यांचाही पाठिंबा आहे. श्रीमत् शंकराचार्य गीताभाष्याच्या प्रस्तावनेत मनुच्या वचनाचा अनुवाद करीत असता म्हणतात

ब्राह्मणत्वस्य हि रक्षणेन रक्षितः स्याद् वैदिको धर्मः । तवधीनत्वात् वर्णाश्रम भेदानाम् । ‘

ब्राह्मण्याच्या रक्षणानेच वैदिक धर्माचे संरक्षण होते व ब्राह्मण्यावरच इतर वर्ण अवलंबून आहेत. चतुर्वर्ण्य व्यवस्था आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.

‘ब्रह्मज्ञानाचा विचारूं । त्याचा ब्राह्मणासीच अधिकारू । वर्णमां ब्राह्मणो गुरुः । ऐसे वचन ।’ वर्णं समान करताच येत नाहीत. उच्चवीच भेद हा जीवनक्रमच आहे. आजही अधिकारी वगैरे चार श्रेणीत आहेतच की नाहीत ? अधिक पुण्याने ब्राह्मण जन्म मिळतो. पण बाज सर्व उलटे झाले बाहे व त्याचे दुष्परिणामही पहावयास मिळत आहेत. केलेल्या मरणोत्तर तुम्हाला कोणी विचारणारे आहेत की नाहीत ? तेथे मंत्री येतील काय साक्ष द्यायला ? 

मग 

अपूज्य यत्र पूज्यन्ते पूज्यानांच विमानता । तत्र त्रीणी प्रवर्तन्ते दुर्भिक्षं, मरणं भयम् ॥

जेथे अपूज्याची पूजा व पूज्य व्यक्तीचा अपमान केला जातो, तेथे दुर्भिक्ष म्हणजेच दुष्काळ, महान व्यक्तीचे मृत्यू व जनता आणि शासक ह्यात भोती उत्पन्न होणे ह्या गोष्टी होतात.

आज भारतात निधर्मी राज्य आहे. म्हणून भारतीय शासनास साग्रह उपदेश आहे की, मी सांगितलेल्या सर्व गोष्टींचा विचार करून स्वतः ब्रह्मनिष्ठ वनून, सर्व जनतेस व विश्वालाही ह्या विश्वधर्माच्या सुख छायेत आणावे आणि कल्पतरू प्रमाण निष्ट फळाची प्राप्ती करून घेऊन श्रेय व प्रेम याचे भागीदार व्हावे, अशी सुवर्णवेळा लवकरच प्राप्त होईल अशी आशा आहे.

सर्वांना माझे पूर्ण माशीर्वाद आहेत. सर्वेजन: सुखिनो भवन्तु ।

श्रीसद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय.

श्री क्षेत्र वरदपुर

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ माघ वद्य नवमी, दासनवमी शके १८९४

home-last-sec-img