Literature

दुर्जन सहवास

वाईटावर असलेले लोक किती दुर्बळ असले तरी त्यांच्यावरचें लक्ष कमी करूं नये. चांगली परीक्षा केल्याशिवाय कोणावरहि पूर्ण विश्वास ठेवू नये. तशा कोणावरहि महत्त्वाचे कार्य सोपवूं नये. बंडखोराबद्दल नेहमी जागरूक असले पाहिजे. थट्टामस्करी वा विनोद यांतहि नास्तिक मतांचा पुरस्कार करूं नये. नास्तिकांची संगत असू नये. दुर्जन, व्यसनी लोकांचा सहवास करूं नये. बहुसंख्य दुर्जनात असलेले मुष्टिभर सज्जनहि बिघडतात. दुःसंगः सर्वचैष त्याज्यः । सर्वचैव दुर्जनांचा त्याग केला पाहिजे. चांगल्या फळांच्या राशीत  एखादेच नासके फळ असले तरी पुरे. तो सबंध क्रमाक्रमानें नासून जातो. त्याप्रमाणे चांगल्याच्या समूहांत एखादा जरी वाईट असला तरी पुरे. सर्वहि क्रमाने बिघडतात. त्यामुळे राजाने व राष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी याकडे चांगले लक्ष दिले पाहिजे. नासके फळ काढून टाकून देणे म्हणजेच चांगल्याचे रक्षण करणे होय. बहिष्कार हा शब्द मुद्रां अशा अर्धीच रूढ झालेला आहे. अशासाठीच स्पृश्यास्पृश्यतेची भावना निर्माण झाली.

कच्चिन्न लोकायतिकान्ब्राह्मणांस्तात सेवसे । 

अनर्यकुशला होते बालाः पण्डितमानिनः ॥३८॥ 

धर्मशास्त्रेषु मुख्येषु विद्यमानेषु दुर्बुधाः । 

बुध्दिमान्वीक्षिकी प्राप्य निरर्थं प्रवदन्ति ते ॥३९॥

देहाभिमानी लोकांच्या भौतिकवादाला बळी पडला नाहीस ना ! हे स्वतःला पंडित मानणारे असे अत्यंत बालिश बुद्धीचे अप्रबुद्ध लोक आहेत. होईल तितका अनर्थ व अपाय करण्याच्या बाबतीत मात्र हे अतिकुशल असतात. सर्व दृष्टीने हि निर्दष्ट असे जगत्कल्याणकर, स्वतः सिद्ध वेदशास्त्राचे ‘दिव्य वाङमय इतके प्रगट असूनहि निरर्थक चिकित्सेची बुद्धिउगीच लढवत, व्यर्थ वितंडवाद हे निर्माण करतात. अवैदिक संप्रदायांवर कदापि विश्वास ठेवू नये.

home-last-sec-img