Literature

निषिद्ध कर्मापासून होणारे दुष्परिणाम

अविधिकृन्नरकमश्नुते । अविधिप्रमाणे वागणाऱ्यास नरकप्राप्ति होते, म्हणून श्रुतीचें सांगणे आहे. नरकप्राय असलेल्या निषिद्ध भोगांत अधिकाधिक आसक्ति निर्माण होते, ती अविधीच्या वर्तनानेंच निषिद्ध कर्मानीं अत्याधिक वाढलेला विषयोपभोगाचा दाह गवताच्या राशीला (गंजीला) लागलेल्या धगधगायमान अग्निप्रमाणेच कर्त्याचें हृदय जाळीत असतो. इंद्रियनिग्रहाची पकड शिथिल झाली की मस्त घोडे लगाम सैल झाल्यामुळे जसे मनसोक्त रथ ओढून खड्यांत घालतात त्याप्रमाणे अनिर्बंध ओढाळ इंद्रिये मन मानेल त्याप्रमाणें अवश करून देहाला विषयाकडे ओढीत शेवटी शोचनीय दुःखाच्या खड्यांत पाडतात. अविधि विषयोपभोग आरोग्याचा नाश करतो, विषयवासनेचा दाह अधिक करतो, मनाची शांति नष्ट करतो, समाधान अजिबात नाहींसें करतो. आचरलेले पापकृत्य तुषाग्नीप्रमाणे आंतल्या आंतच पापकर्त्याला भाजून काढीत असतें. खग्रास ग्रहणांतील चंद्रबिंबाप्रमाणे त्या जीवित निस्तेज होतें. निराशा आणि दुःख यांच्या आवरणाखाली तो संपूर्ण झांकला जातो. निषिद्ध कर्माच्या अनुष्ठानामुळे निषिद्ध वासना वाढू लागतात. निषिद्ध कामोपभोगाची वात्रटळच उठून परमार्थमार्गाची दिशाच दिसत नाही. बुडत्याचा पाय अधिक खोलांत, या म्हणीप्रमाणें तो अधिकाधिक निषिद्ध कर्मे आचरूं लागतो. नीतिभ्रष्ट पहिल्या पहिल्यानें पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे मोठ्या आवेशानें बाटेल त्याच्या अंगावर जाऊन मार खातो. त्यानंतर हळू हळू बलहीन होऊन महारोगाच्या माणसाप्रमाणें तो सर्वत्र तिरस्कृत होतो. कृतकर्माची फळे अनुभविण्यास लावण्याकरितां त्याच्या देहांत अनेक रोगांनी ठाण दिलेलें असतें. तळमळून तळमळून अशा नाना तऱ्हेच्या अनेक नरक यातना इथे भोगून मरणानंतर यमधर्माच्या शासनानें घोर घोर नरकांत त्याचा वास होतो व तिथे तो नीतिभ्रष्ट अनंत दुःखें भोगतो.

श्रीराम वनवासाची प्रतिज्ञा मोडून अयोध्येच्या सिंहासनावर बसला तर तो नष्टप्रतिज्ञ होणार नाही का ? त्या अप्रत्यक्ष केवळ सुखाची आशा सोडून यातनेच्या राज्यभोगादिकांचें प्रत्यक्ष सुख अनुभविण्याकरितां नुसत्या तुमच्या वचनावर भार ठेवून का एकदां सिद्ध झालो, तर, हे ( जाबालि ) ऋषि महाराज ! कुत्राहि खाणार नाही इतके माझे हाल होतील. दुर्वृत्त दुराचारी राजा दुसऱ्यांना कसला धडा घालून देईल ? प्रजा कोणत्या मार्गानें जाईल ? त्या राजाप्रजेचें पुढे काय होईल ? कोणत्या कर्मानें त्यांना इथे राहीपर्यंत तरी, सुखासमाधानाची आशा राहील ?

home-last-sec-img