Literature

परमात्मतत्त्व व उपनिषद रहस्य

ह्या आणि बाकीच्या वेदोपनिषदांचा परिचय अज्ञातवादाचे निरसन करतो. उपनिषदाच्या हृदयाचा परिचय करून घेण्यास अजून कांही उपनिषद् मंत्रांचे परिशीलन करूं या.

य आत्माऽपहतपाप्मा विजरो विमृत्युर्विशोको विजिधत्सोऽपिपासः सत्यकामः सत्यसंकल्पः सोऽन्वेष्टव्यः स विजिज्ञासितव्यः स सर्वा श्र्च लोकानाप्नोति सर्वा श्र्च कामान्यस्तमात्मानमनुविद्य विज्ञानातीति ह प्रजापतिरुवाच ।। (छां. ८-७-१) जो नेहमी निष्पाप, जरामृत्युरहित, शोकशून्य, क्षुधातृषाविरहित, सत्यकाम, सत्यसंकल्प आहे त्या परमात्मरूपाचा तूं शोध कर, त्याला तूं जाण. जो त्या आत्मरूपाला जाणतो तो सर्व लोकसुखाची व सर्व कामनातृप्तीची प्राप्ति एकदम करून घेतो. एक परमात्माच सर्व जगाला व्यापून असल्यामुळे व तें त्याहून वेगळे नसल्यामुळे, तोच हे अखिल विश्वरूप असल्यामुळे, इच्छेनें प्राप्त करून घेणाऱ्या सर्व सुखांत एकच एक परमात्म्याचे सुख व्यापून असल्यामुळे, या सर्व सुखांना हाच एक परमात्मा कारण असल्यामुळे तें परमात्मस्वरूपच मी म्हणून जो जाणतो तो परमात्म क्यानें, या आपल्या तात्विक व्यापकतेनें सर्व लोकसुखाची व केवल आनंद रूपतेनें सर्व कामनापूर्तीची एकदम प्राप्ति करून घेतो. जो हें परमात्मस्वरूप वेदशास्त्रसद्गुरुमुखानें प्रथम श्रवण करून नंतर त्याचे युक्तीनें मनन करून शेवटीं निजध्यासानें तेंच मी म्हणून निश्चय करतो व त्याचा पूर्णपणें साक्षात्कार करून घेतो, तो या परमात्म्याशी एकरूप होऊन आपल्या सर्वव्यापित्वानें, सर्वरूपतेने व आपल्या केवळ आनंदरूपतेनें सर्वलोकसुखाची सर्व कामनातृतीची एकदम प्राप्ति करून घेतो. 

यदा पश्यः पश्यते रुक्मवर्ण कर्तारमीशं पुरुषं ब्रह्मयोनिम् । तदा विद्वान्पुण्यपापे विधूय निरंजनः परमं साम्यमुपैति ।। (मुंडक ३-३)—सवाँचें मूळरूप असणारे आनंदमात्र ब्रह्मतत्त्व ‘एकमेवाद्वितीय ब्रह्म’ व ‘न तु तद्वितीयमस्ति’ या बचनाधारेंहि अखंड एक अद्वितीय जगत्कारण ईशाचेंहि स्वयंज्योतिस्वरूप असल्यामुळे तें आपले मूलस्वरूप आहे असे जो जाणतो व अवलोकन करतो, सत्याचा साक्षात्कार करून घेतो तो सर्व पापपुण्यास व आगंतुक बंधमोक्षास कारण असणारी अखिल शुभाशुभ कर्मे संपूर्ण नष्ट करून टाकतो व स्वतः सर्वक्लेशशून्य, निर्लेप, स्वयंप्रकाश असा निरतिशय एकरस आनंदरूप होतो. यथोदकं शुद्धे शुद्धमासिक्तं ताहगेव भवति । एवं मुनर्विजानत आत्मा भवति गौतम ॥ (कठ. २-४-१५) शुद्ध पाण्यांत शुद्ध पाणी मिसळले असतां जसे तें एकरूप होतें त्याप्रमाणे आत्मज्ञ मुनी ब्रह्मतत्त्वांत मिळून एकरूप होतो. स यथेमा नद्यः स्यन्दमानाः समुद्रायणाः समुद्रं प्राप्यास्तं गच्छन्ति भिद्येते तासां नामरूपे समुद्र इत्येवं प्रोच्यते एवमेवास्य परिद्रष्टुरिमाः षोडशकलाः पुरुषायणाः पुरुषं प्राप्यास्तं गच्छन्ति भिद्येते चाऽऽसां नामरूपे पुरुष इत्येवं प्रोच्यते स एषोऽकलोऽमृतो भवति ॥ (प्रश्नोप. ६-५) वाहणाऱ्या नद्या ज्याप्रमाणे समुद्राकडे धाव घेऊन समुद्रास मिळतात व आपलें नामरूप नष्ट करून त्या जशा आपले अंतिमस्थान असणाऱ्या समुद्राशी एक. होऊन जातात व नंतर समुद्रच म्हणून ओळखल्या जातात त्याप्रमाणें मोक्षाची इच्छा करणारे जीव परमात्मस्वरूपाकडे धांव घेऊन त्या आनंदधन परमात्म्यांस जाऊन मिळतात व आपलें नामरूप नष्ट करून, अंतिम लयस्थान असणाऱ्या आनंदघन परमात्म्याशीं एक होऊन जातात. भूमि, इंद्रिय, मन, अन्न, वीर्य, तप, मंत्र, कर्म, लोक, नामाभिधान, प्राण, श्रद्धा, आकाश, वायु, अग्नि, जल या घोडशकला राहात नाहीत. त्यांचे परमात्म्याशी भिन्नत्व उरत नाही. परमात्म्याच्या ठिकाणी एकरूप होऊन राहिल्यामुळे ते जीव परमात्मस्वरूपाचे म्हणून ओळखले जातात. हे सर्व जीव निर्मल, निष्कलंक, अविनाशी परमात्म तत्त्वच होऊन असतात. त्या परमात्मतत्त्वाखेरीज त्यांचा नामनिर्देश पृथक् होत नाही. या मंत्रांतला ‘पुरुष’ शब्द परमात्मवाचक आहे.

गताः कलाः पंचदश प्रतिष्ठा देवाश्च सर्वे प्रतिदेवतासु । कर्माणि विज्ञानमयश्च आत्मा परेऽव्यये सर्व एकीभवन्ति । यथा नद्यः स्यन्दमानाः समुद्रेऽस्तं गच्छन्ति नामरूपे विहाय । तथा विद्वान्नामरूपाद्विमुक्तः परात्परं पुरुषमुपैति दिव्यम् || ( मुंडक. ३-२-७-८) या मुंडकोपनिषदांतील मंत्रांचेंहि हेंच तात्पर्य आहे.

इमाः सोम्य नद्यः पुरस्तात्माच्यः स्यन्दन्ते पश्चात्प्रतीच्यस्ताः समुद्रात्समुद्रमेवापियन्ति । समुद्र एव भवति ता यथा तत्र न विदुरिय मद्दमस्मीति । एवमेव खलु सोम्येमाः सर्वाः प्रजाः सत आगत्य न विदुः सत आगच्छामहमिति त इह व्याघ्रो वा सिँ हो वा वृको वा वराहो वा कीटको वा पतंगो वाद शो वा मशको वा यद्भवन्ति तदा भवन्ति 

॥ (छां. ६-१०-१-२). पूर्वपश्चिम दक्षिणोत्तरवाहिनी नद्या समुद्रापासूनच निघून पुन्हां समुद्रासच जाऊन मिळतात आणि समुद्रच होतात. नंतर एक समुद्रच असतो. समुद्र झाल्यावर आपण अमकी अमकी नदी म्हणून त्यांना जसे समजून येत नाही, त्याप्रमाणेच या सर्व जीवरूपी नद्या परमात्मसमुद्रा पासून निवून त्यालाच जाऊन मिळतात आणि परमात्मरूपच होतात. नंतर एक परमात्माच असतो. परमात्मरूपच झाल्यानंतर ‘मी अमुक ‘ मी अमुक’ म्हणून त्यांना भान राहात नाही. सन्मूलाः सोम्येमाः सर्वाः प्रजाः सदाय तनाः सत्प्रतिष्ठाः । (छां. ६-८-४) या सर्व जीवांचे मूळ तें अविनाशी परमात्मरूपच आहे. याचाच त्यांना आश्रय आहे व हाच त्यांचे जीवन आणि स्वरूप आहे. याच्यामुळेच त्यांची प्रतिष्ठा परमात्मस्वरूपच असतां सर्वांनाच त्याची जाणीव कां नाहीं ? याला यापूर्वी मधाचे उदाहरण देऊन वर दिलेल्या मंत्रांत पुन्हां समुद्राचे उदाहरण दिले आहे. विविध झाडाझुडपांच्या फुलापासून रस गोळा करून मधमाशा मध तयार करतात. मध तयार झाल्यानंतर अमुक अमुक झाडाचा हा रस म्हणून त्या त्या रसाच्या मुळाची आठवण जशी त्या मधांत समरसून गेलेल्या रसांतून आढळून येत नाही त्याप्रमाणे ब्रह्मरूप झालेल्यांना पूर्वील औपार्थिक रूपाची जाणीव राहात नाहीं. तुर्यस्थितांचा अयंत्रा समाधीचा, जीव परमात्मैक्याचा अनुभव प्रत्येकाला नसला तरी सुषुप्तीचा अनुभव सर्वांना आहे. स्वापिति नाम समा सोम्य तदा संपन्नो भवति । स्वमपीतो भवति । तस्मादेन स्वपितीत्याचक्षते स्व. ह्यपीतो भवति ॥ सुर्तीत सर्वहि कार्य / तमांत, अज्ञानांत विलीन झाल्यानंतर हा जीव आपल्या सन्मात्र परमात्मरूपाशी |

अभिन्न होतो, सत्संपन्न होतो. सुर्तीत आत्मरूपालाच तो प्राप्त झालेला असतो. तेथे त्याला कसलीहि भावना राहात नाही. त्यामुळेच त्याला ‘स्वपिति’झोपला आहे. असे म्हणतात. त्या गाढ झोपेत तो स्वतःलाच म्हणजे स्वतःच्या मूळ परमात्मस्वरूपालाच प्राप्त झालेला असता. सुषुप्तिकाले सकले विलीने तमोऽभिभूतः सुखरूपमेति । (कै. उ.) काच्या काचेतून आलेला प्रकाश जसा काळा दिसतो त्याप्रमाणे सुषुतिस्य अज्ञानांतून आलेला जीव खरोखरीच परमात्मस्वरूप असला तरी त्या अज्ञानांतून आल्यामुळे त्याला आत्मस्वरूपाची विस्मृति भासते. काजळाचे हात लागल्यामुळे जसे तोंड काळे होते. त्याप्रमाणे अज्ञानाचा परिणाम यावर झाल्यामुळे स्वरूपाची आठवण याला नसते तें काजळ धुऊन काढले म्हणजे तोंड स्वच्छ झाल्याप्रमाणे हे अज्ञान गुरुशा आत्मप्रचितीनें कां एकदां धुवून काढले की मग तो परमात्मप्रकाशानें प्रका लागतो. जाग्रतुस्वमसुषुप्त्यादिप्रपंचं यत्प्रकाशते । तद्ब्रह्माहामेति ज्ञात्वा सर्वबंधैः प्रमुच्यते ॥–जागृत, स्वप्म, सुषुप्ति आदि प्रपंच ज्यामुळे प्रकाशित होतो तें ब्रह्म मी म्हणून आवरणविक्षेपरहित निश्चयाने जाणल्यानें, त्या ब्रह्म स्वरूपाचा साक्षात्कार झाल्याने सर्व दुःखरूप कर्मबंधापासून व सर्ववासना जालापासून तो मुक्त होतो. त्याची देहात्मबुद्धि नष्ट होते. जागृदादि अवस्थाशून्य अशी एक तुर्यअवस्था आहे, जींत या तीन्ही अवस्थांचा अनुभव न येतां आनंदघन आत्मानुभवच एक शिल्लक असतो. अशी स्थिति जोपर्यंत बाणत नाहीं तोपर्यंत सुषुप्तीच्या त्या ऐक्यस्थितीतून बाहेर येण्याचा अवकाश की त्याला काळ्या कांचंतून आलेल्या प्रकाशाप्रमाणे होऊन स्वज्ञानानें, पशुपक्षी, मनुष्यादि स्वस्त्रदेहाचा अभिमान येऊन, त्या त्या देहवर्माप्रमाणें तो बागूं लागतो, मोह पात्रतो. याला त्याच्या यथार्थरूपाचे अज्ञानच एक कारण आहे. हे श्वेतकेतो, तला खरेंच कळवावयाचे झाल्यास “स य एषोणिमैतदात्म्यमिद सर्व तत्सत्य स आत्मा तत्त्वमसि श्वेतकेतो।” या सर्वांचें— जीवांचें यथार्थरूप असणारा जो अतिसूक्ष्म चिदानंद परमात्मा आहे, तद्रूपच हे सर्व कांही आहे, त्यालाच ब्रह्मतत्त्व म्हणतात. तेच सत्य आहे. तूंहि पण तेंच निष्प्रपंच आनंदधन ब्रह्म आहेस.

स यो ह वै तत्परमं ब्रह्म वेद ब्रह्मैव भवति । तरति पाप्मानं गुहाग्रंथिभ्यो विमुक्तोऽमृतो भवति ॥ (मुंड. ३-२-९)

‘याचि जन्मीं येणोंच काळे’ जो तें परब्रह्मच मी म्हणून , जाणतो तो निःसंशय ब्रह्मच होतो. अखिल अज्ञान ओलांडून सर्व प्रपंचा पलीकडे तो जातो. सर्व पापांपासून मुक्त होतो. देहात्मबुदीपासून कायमचा सुटतो. तो अमर होतो.

तद्धेदं तर्ह्यच्याकृतभासीत्तन्नामरूपाभ्यामेव व्याक्रियतासौ नामाsयमि दरूप इति तदिदमप्येतर्हि नामरूपाभ्यामेव व्याक्रियते s सौ नामाय मिद रूप इति। (बृ. १४) स एप इह प्रविष्टः आनखात्रेभ्यः । (बृ. अ. १ प्रा. ४) जग उत्पत्तीपूर्वी अव्यक्त होते. ब्रह्मांडांत अव्यक्त व पिंडांत सुप्ति अवस्था सुपृप्ति अवस्थेत जसे हे सर्व अव्यक्त असते तसेच हें समग्र ज्या वेळी त्या आवरणशक्तीत अव्यक्त होते, तेव्हां त्याला अव्याकृत अथवा अव्यक्त असे नाव आहे. हेच जगाचे कारणशरीर होय. हैं अज्ञानरूप अथवा आवरणरूप असते. या ब्रह्मांडकारणशरीराचा अंशच जीवाचा कारणदेह, सुपृप्ति अवस्था. ब्रह्मांडाच्या या कारणदेहाचा अभिमानी ईश्वर, पिंडाच्या कारणदेहाचा ‘प्राज्ञ.’ है सुतीच्या अभिमानी जीवाचे नांव होय. अव्यक्ता न्महत् ।—या अव्यक्तापासूनच महत्त्व निर्माण झाले. हे महत्त्व म्हणजे ब्रह्मांडाचा सूक्ष्म देह. ब्रह्मांडोत्पत्तीचा संकल्प इथेच झाला. या महत्त्वाचा अंशच म्हणजे स्थूलदेहोत्पत्तीच्या वासनेचा व्यक्तिगत सूक्ष्म देह. या महत्त्वाचा -ब्रह्मांडाच्या सूक्ष्म देहाचा अभिमानी ‘हिरण्यगर्भ’ होय. व्यक्तिगत सूक्ष्म देहाचा अभिमानी ‘तैजस’ होय. हा हिरण्यगर्भाचा अंश. या अवस्थेला ‘स्वप्न’ असे नाव आहे. या व्यक्तिगत सूक्ष्म देहाला ‘लिंगदेह’ अथवा ‘अतिवाहिक देह’ असे म्हणतात. हिरण्यर्मानेंच “ एकोऽहं बहु स्यां । ” आपण बहु व्हावे, असा संकल्प केला. त्यानंतर बहुत्वाला कारण होणारे अनेक देह निर्माण करून त्या त्या देहांत त्याने प्रवेश केला. आनग्वाम प्रतिदेहांत तोच आहे. बहुत्व सुजण्याकरितां तारतम्य निर्माण केलें, अज्ञान पांघरलें, मित्र भिन्न कर्मफळ निर्माण केलें. चौन्यांशी लक्ष योनी निर्माण झाल्या. अनेक देव, दानव, मानव, पशु, पक्षी, कृमीकीटदिकांची उत्पत्ति झाली. यांत जीव-भावास प्रात होऊन “ नाना देहीं देव एक विराजे । नाना नाटकलीला सुंदररूप साजे ” || हें झालेले जग पूर्वी अव्यक्त असून तेच नंतर नामरूपद्वारा व्यक्त झाले. या व्यक्त जगाचा अभिमानी असणाऱ्या परमात्म्याला • बिराट’ हे नांव आहे. हा परमात्म्याचा स्थूल देह होय.

पाच्यांतच सर्व जीवांच्या स्थूळ देहांचा अंतर्भाव होतो. भिन्नभिन्न अशा देहांत प्रवेश करून जो स्थिरचर विश्वाकार झाला तो विराट या जागृतीत स्व देहाचा अभिमान वाहून त्या त्या देहाप्रमाणे देहनिर्वाहकार्यात व्यापत असणारा अंश जागृदभिमानी विश्व होय. जागृतींतला सर्व कारभार याचाच असतो. आनखान सर्व देहांत तो परमात्माच आहे याबद्दल हैं श्रुतिवाक्य ग्वाही देत आहे.

स इह प्रविष्टः आनखाग्रेभ्यः । ( बृ. उ. अ. १४-७)

आत्मैवेदमग्र आसीत् पुरुषविधः सोऽनुवीक्ष्य नान्यदात्मनोऽपश्य त्सोऽहमस्मीत्यग्रे व्याहरत्ततोऽहंनामाभवत्तस्मादप्येतह्यमंत्रितोऽहमयमित्ये वाग्र उक्त्वाऽथान्यन्नाम प्रभृते यदस्य भवति । (बृ. १-४-१) कोणत्याहि शरीराची उत्पत्ति होण्यापूर्वी या सर्व जगापूर्वी प्रथमशरीरी असा एक प्रजापतीच होता. शिर, करचरणादि अवयवयुक्त पुरुषाकार झालेल्या या विराटास प्रथम स्वतः खेरीज दुसरे असे कांहीं न दिसल्यामुळे मी कोण, कोणत्या लक्षणांनी युक्त असणारा मी आहे असा विचार त्याला पडला. स्वतः मूळ रूपाचा खोलवर विचार करून त्यानें आत्मनिरीक्षण केलें, तो सच्चिदानंदरूपी परमात्माच मी म्हणून जाणले व तोच मी म्हणून अगदी पहिल्यांदा त्याने उच्चारले. तेव्हांपासून तो ‘अहं” मी’ या नावाने प्रसिद्ध झाला. या आमय मानाने त्याने निर्माण केलेल्या सर्व देहांत तोच प्रविष्ट झाला. त्यामुळे आतांहि व्यवहारांत ‘तूं कोण’ म्हणून विचारले असतां आपल्या मूळ स्वरूपाची ओळख पटविण्याकरितां, तोच मी म्हणून सांगण्याकरितां ‘ मी ‘ च आहे, असें आपण म्हणतो. विचारणाऱ्याला पहिल्याने पारमार्थिक सत्यस्वरूपाची आपली जाणीव देतो. पुन्हां मी म्हणजे कोण म्हणून खडसून विचारले असतां व्यवहार दृष्टया आईवडिलांनी ठेवलेले देहाचे व्यावहारिक नांव सांगतों, मी अमुक म्हणून त्या देहाचे नांव कळवितों.

याच्या ज्ञानासाठी पूर्वपूर्वाधिकाऱ्याकरितां वेदांनी प्रथम कर्मउपासनापर असणाऱ्या कांडढयाचा उपदेश केला. एका अज्ञानानेच अथवा अविद्येनेंच केवळ, ज्या आनंदमात्र परमात्म्यांत कर्ता, भोक्ता, क्रिया, कर्मफळ, साधक, सिढ, बढ, मुक्त, देव, भक्त, इत्यादि भावनांचा केवळ अज्ञानानें अध्यारोप होतो ते परमात्मरूपच या चराचर विश्वाचे कल्याणमय शुद्ध रूप होय.

‘पाण्यापासून होणाऱ्या फेसाप्रमाणे ज्याच्यापासून नामरूप उत्पन्न जो त्या सर्व नामरूपांत प्रवेश करून असतो तो शुद्धबुद्ध सचिदानंद परमात्माच, जलाच्या अखिल विकारांतून एकजलच असल्याप्रमाणे अद्वितीय आहे. तं न पश्यति अकृत्स्नो हि सः । ( बृ. उ. अ. १ ब्रा. ४) अशा परम पवित्र अति मंगलमय आनंदधन परमात्म्याचें जो सर्वत्र दर्शन घेत नाही तो देहाएवढा परिमित होऊन अल्प व अपूर्ण असतो. त्याची वृत्ति बहिर्मुख होते. तो प्राणमनोवाक्चक्षुश्रोत्रादि अनेक अल्पाल्प विभागांनी विभागला जातो. त्याचे अनेक तुकडे पडतात. प्राणन्नेव प्राणो नाम भवति वदन्वाक्पश्य अक्षुः श्रृण्वन् श्रोत्रं मन्वानो मनस्तान्यस्यैतानि कर्मनामान्येव । स यो एकैकमुपास्ते न स वेदाकृत्स्नो ह्ये॑षोऽत एकैकेन भवत्यात्मेत्येवोपासी तात्र सर्व एकं भवति ।। —श्वासोश्वासाला प्रारंभ झाला की तो प्राण होतो. बोलू लागला कीं वाक् होतो, पाहूं लागला म्हणजे चक्षु होता, एकू लागला तेव्हां श्रोत्र होतो, संकल्प करूं लागला, इच्छा करूं लागला, असे तसे म्हणून मानूं लागला कीं मन होतो. कर्मवासनेनें भिन्नभिन्नपणें विभक्त झालेली अशी हीं जीवाची खंड खंड झालेली हीं नामरूपें होत. क्रिया-वासनेनें या देह, प्राण, मन, बुद्धि, दशइंद्रियादिकांत आत्मभावना जोपर्यंत हा जीव ठेवून असतो तोपर्यंत त्याचे रूप अखंड आणि पूर्ण असें न होतां त्याचे तुकडे तुकडे पडतात व अशा या अल्पाल्प शकलांतच त्याला आत्मभावना हो | लागते व तोहि याप्रमाणे अल्पाल्परूपी होऊं लागतो. तुच्छ व क्षणिक विषय सुखच, ते कितीहि गलिच्छ असले तरी त्यालाच, तो आत्मसुख मानूं लागतो | शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंचविषयांत गुरफटतो. तो ब्रह्मरूप जागत नाहीं व ब्रह्मानंद अनुभवीत नाही. देह, इंद्रिय, प्राण, मन आदिकांच्या अध्यासानें तो अपूर्ण होतो. भ्रांतीने ते तेच तो बनून असतो. यासाठी अखंड सच्चिदानंद स्वरूपाची ओळख करून घ्यावी. त्या संपूर्ण आनंदघन परमा रम्याची सोऽहं भावनेनं उपासना करावी. तद्रूपानें राहाण्याचे साधन अखंडे चालवावे. पाण्याच्याच दृष्टीने सर्व पाण्याचे विकार पाहिल्याप्रमाणे त्या परमात्म्याच्या त्या चिदानंदमय मंगल रूपानेंच व्यक्तिगत स्वपरदेहादिकांना बधले सुवर्णालंकारांत एक सुवर्णाची दृष्टि ठेवल्याप्रमाणें अखंड ब्रह्मानंदाचीच सर्वत्र असावी. असे झाले की सर्वांचा अंतर्भाव एकांत होऊन सर्वच एक होतें, पूर्णरूप होतें. साधक ब्रह्मरूपच होतो.

ब्रह्म वा इदमग्न आसीत्तदात्मानमेवावेत् । अहं ब्रह्मास्मीति तस्मा तत्सर्वमभवत् । तद्यो यो देवानां प्रत्यबुध्यत स एव तद्भवत्तथर्षीणां तथा मनुष्याणाम् । तदिदमप्येतर्हि य एवं वेदाऽहं ब्रह्मास्मति स इदं सर्वे भवति तस्य ह न दवाश्च नाभूत्या ईशते । आत्मा ह्येषा स भवति । (बृ.१-४-१०) – पूर्वी हे सर्वाहि एक प्रमात्मतत्त्वच अथवा एक ब्रह्मच होते. त्यानेच स्वतः स्वतःला मी ब्रह्म म्हणून जाणले. त्या आत्मीय ज्ञानानेंच तें हे सर्व काहीं झालें, विश्वाकार बनले. त्यानेंच प्रतिदेहांत प्रवेश केला. देवामधून ज्यानें ज्यानें स्वतःला तें परमात्मरूप म्हणून जाणले तो तो तें परमात्मरूपच झाला, ब्रह्मच झाला. याचप्रमाणें ऋषिमधून, मनुष्यामधून ज्याने ज्याने स्वतःला तें परमात्मरूप म्हणून जाणलें व प्रत्ययाला आणले तो तो तें परमात्मतत्त्व, तें ब्रह्मच झाला. आतां सुद्धां हें चिदानंदमात्र ब्रह्मच मी म्हणून जो जाणतो तो ब्रह्मच होतो. ब्रह्माप्रमाणेंच ( मी ब्रह्म म्हणून जाणण्याच्या) या ज्ञानानें तो सर्वहि हें होतो. सर्वांचे आत्मरूपच तो बनतो. कोणीहि त्याच्याविरुद्ध जात नाही. देवसुद्धां त्याचे अनिष्ट करीत नाहीत. त्या ब्रह्मवेत्त्याच्या नाशाकरितां अथवा अनिष्टाकरितां देवतांनीहि प्रयत्न केले तरी त्यांना तें तसे घडवून आणणे शक्य होत नाही.

या उपनिषदांच्या वेंचक वाक्यांवरून आपल्याला तत्त्वज्ञानाचा थोडा फार परिचय झाला. या नामरूपात्मक जगाच्या जाळ्यांत न सांपडतां याच्या पलीकडे असणारे परमात्मतत्त्व जाणले पाहिजे. तेच आपले स्वरूप होय. त्याला जाणणारा मुक्त होतो. मुक्ति म्हणजे अज्ञान व त्याच्या सर्व कार्याचा अत्यंत अभाव होऊन, आनंदमात्र असणारें केवल ब्रह्मतत्त्वच होऊन असणे हे आपण जाणलें. श्रुतींत जिथे तिथे आत्मानंदाचे आलाप ऐकू येतात. आतां त्या परमात्म तत्त्वाचा साक्षात्कार करून घेतलेल्या आत्मनिष्ठांनी स्वस्फूर्तीनें गाइलेले आत्मगीत आपण थोडें श्रवण करूं या. याच्या योगानें जीवबौक्याबद्दल कोणास थोडासा संशय उरला असल्यास तो उन्हांतील धुक्याप्रमाणें पार वितळून नष्ट होईल आणि मंगलमय चिदानंदस्वरूप सर्वत्र प्रकाशुं लागेल.

home-last-sec-img