Literature

परवर्णाचे धर्माचरण त्याज्य

नाही म्हणावयाला कोण्या एका शूद्राच्या तपामुळे ब्राह्मणाचा एक मुलगा निवर्तल्याची कथा रामायणांत दिसून येते. आपल्या मुलाचे शव पुढे ठेऊन ब्राह्मण राजवाड्यापुढेंच आक्रोश करूं लागला. आपल्या राज्यांत असें अनिष्ट होण्यास कारण काय म्हणून रामानें चौकशी सुरू केली. वसिष्ठा आपल्या मंत्रिमंडळापुढे हा प्रश्न ठेवला. त्यांतून नारदांनी बोलण्यास सुरवात केली.

हीनवर्णो नृपश्रेष्ठ तप्यते सुमहत्तपः । 

अद्य तपति दुर्बुद्धिस्तेन बालवधो ह्ययम् ॥ 

सत्वं पुरुषशार्दूल मार्गस्व विषयं स्वकं ।

दुष्कृतं यत्र पश्येथाः तत्र यत्नं समाचर ॥ 

एवं चेद्धर्मवृद्धिश्च नृणां चायुर्विवर्धनं । भविष्यति नृपश्रेष्ठ बालस्यास्य च जीवितम् ॥

( आपला सेवाधर्म टाकून ) ब्राह्मणांनी करावयाचे तप शूद्र करीत असल्यामुळे या ब्राह्मण बालकाला हा अपमृत्यु संभवला आहे. त्याचें निवारण झाल्यास हा मुलगा आपोआप जीवन्त होईल, असें श्री रामाच्या पृच्छेवरून नारदांनी कळविलें. आपल्या वर्णाचा धर्म सोडून परवर्णाच्या धर्माचे आचरण करणाऱ्या त्या वादाला शोधून श्रीरामानें त्या कर्मापासून त्याला परावृत्त केलें न केलें तोंच इकडे तो ब्राह्मण बालक जीवंत झाला. 

यस्मिन्मुहूर्ते काकुत्स्थ शूद्रोऽयं विनिपातितः । तस्मिन्मुहूर्ते बालोऽसौ जीवेन समयुज्यत । ( वा. रा. उ. सग ७६-१५) या शूद्राचे नांव ‘शत्रक असें होतें. स्ववर्णधर्म सोडून बागल्याचे, अकाली मरणाचे व पुत्रशोक सबंध रामराज्यांत हे एकच उदाहरण आहे. या ब्राह्मणपुत्राच्या निधनाची वार्ता पसरते न पसरते तोंच त्याचे निवारणहि झाले. त्या ब्राह्मणाला पुत्रशोक जाणवतो न जाणवतो इतक्यांतच पुत्रशोकाची निवृत्ति झाली. ब्राह्मण संततीच्या अकालीं मृत्यूचे कारण म्हणजे इतरांकडून केले जाणारें ब्राह्मण धर्माचें अनुष्ठान हें अर्से सिद्ध झाल्यास सांप्रत याबद्दल फार खोलवरच विचार करणे आवश्यक आहे. विधवाविवाहविषयक कायद्यापेक्षां वैधव्यच मुळी न येण्याचा मार्ग यांत कांहीं सांपडतो काय याचा या कथासंदर्भानें विचार कराबा. इतर जातींकडून आचरल्या जाणाऱ्या ब्राह्मणधर्माचें अनुष्ठान जसें बंद करावें लागेल तसेंच ब्राह्मण जातीकडून आचरल्या जाणाऱ्या वर्णेतराच्या धर्माचें वर्तनहि त्याच्या हिताच्या दृष्टीनें बंद करावें लागणार. हें असें झाल्यास सर्व वर्णांतूनच बालविधवांची संख्या निःसंशय नष्ट होईल. हा वरील कथाभाग वाल्मीकि रामायणाच्या उत्तरकांडांतर्गत ७३ व ७४ व्या सगांतून आला आहे. ७४ व्या सर्गाचा प्रारंभ प्रस्थाप्य तु स शत्रुघ्नं भ्रातृभ्यां सह राघवः । प्रमुमोद सुखी राज्यं धर्मेण परिपालयन् ॥ ततः कतिपयाहःसु वृद्धो जानपदो द्विजः । मृतं बालमुपादाय राजद्वारमुपागमत् ॥ या दोन श्लोकां पासून आहे. पुढच्या ३ पासून १८ व्या श्लोकापर्यंत ब्राह्मणाच्या पुत्रशोकाचे बर्णन त्याच्याच शब्दांत दिलें आहे. एवं बहुविचैर्वाक्यैरुपरुज्य मुहुर्मुहुः । असा १८ व्या श्लोकाचा प्रारंभ होऊन येथे १८ वा सर्ग पूर्ण झाला आहे.

—प्रकृत विषयावर प्रकाश पाडणारे व अधिक माहिती देणारे कांहीं कांहीं बेंचक श्लोक आपण येथें मुद्दाम बधूं. अप्राप्तयौवनं बालं पञ्चवर्षसहस्रकम् । अकाले कालमापन्नं पश्यामि निधनं गतम् । केवळ पांच हजार वर्षांच्या, अजून तारुण्यहिं प्राप्त न झालेल्या, त्यांतच अकाली मृत्युमुखी पडलेल्या मुलाला जे मी हे माझ्यापुढें बधतों आहे, तें माझ्या कोणत्या पूर्वदुष्कृताचें फळ कोणास ठाऊक? असा हा ४ व ५ दोन्ही लोकांचा मिळून भावार्य होतो. पांच हजार वर्षांचा हा मुलगा अजून 4 अप्राप्तयौवन’ होता. यावरून त्या वेळच्या आयुर्मानाची कल्पना करता येते. कृतयुगांत मानवांना ‘एक लक्ष वर्ष’ आयुर्मान होते व पुढे ते ९०११० हिश्श्यानें कमी कमी होत कलियुगांत शंभर वर्षांचिंच मात्र राहिलें, असें जें इतर ग्रंथांतून दिसून येतें, त्याची येथे आठवण होते. पुढच्या ७ व्या लोकांत आपल्याकडून असे कोणतेहि पातक घडले नाही अशा अर्थाचा ब्राह्मणाचा विलाप आहे. तो लोक असा : न स्मराम्यनृतं युक्तं न च हिंसां स्मराम्यहम् । सर्वेषां प्राणिनां पापं कृतं नैव स्मराम्यहम् ॥ संबंध आयुष्यांत मी खोटें बोलल्याचे उदाहरण नाही. माझ्या हातन हिंसा म्हणून कसली ती आजपर्यंत झाली नाही, अखिल प्राण्यासंबंधीहि कोठे कांहीं पातक झालेलें मला आठवत नाहीं. तर मग हा मला पुत्रशोक कां ? कोणाच्या पातकामुळे हा घडून आला? हा या श्लोकाचा भावार्थ, त्या वेळच्या माणसांचें कसें निर्दृष्ट जीवन होतें हैं या श्लोकांतून स्पष्ट होऊन या उलट असणारें जीवनच पुत्रशोकाला कारणीभूत होते, हें यांतून ध्वनित होते. केनाद्य दुष्कृतेनायं बाल एव ममात्मजः । अकृत्वा पितृकार्याणि गतो वैवस्वतक्षयम् । या श्लोकांत आपले उत्तरकार्य व श्राद्धपक्षादि आपल्या मुलाच्या हातून व्हावीत ही इच्छा त्या वेळच्या माणसांतूनहि किती प्राबल्याने बसत होती हैं यावरून कळून येतें. नेदृशं दृष्टपूर्व मे श्रुतं वा घोरदर्शनम् । मृत्युरप्राप्तकालानां रामस्य विषये यथा ।। रामराज्यांत अकाली मृत्यु आलेला या ब्राह्मणालाहि आतां पर्यंत अश्रुत आणि अदृटपूर्व होता, हें या श्लोकावरून व्यक्त होतें. न ह्यन्य विषयस्थानां बालानां मृत्युतो भयम् । स राजञ्जीवयस्यैनं बालं मृत्युवशं गतम् ॥ या व याच्या मागच्या दहाव्या श्लोकावरून राजा कोठें कांहीं चुकला तरच असा प्रजेला अकाली मृत्यु येतो असे कळविण्याचा उद्देश ब्राह्मणाच्या वचना स्पष्ट होतो. या श्लोकांत राजा प्रजाजनांत पितृ-पुत्राप्रमाणे संबंध असतो हें ‘ जीवयस्वैनं बालं‘ या पदावरून व्यक्त होते. येथे आपल्या मृत मुलाला उठविण्याची प्रार्थनाहि दिसून येते. राजदौषैर्विपद्यन्ते प्रजा ह्यविधिपालिताः । असद्वृ त्ते हि नृपतावकाले म्रियते जनः । राजाच्या कसल्याहि दोषामुळे अविधीनें प्रजेचें पालन होत असल्यास म्हणजे वर्णाश्रमोक्त प्रकारें प्रजेचें पालन होत नसल्यास प्रजा विपद्ग्रस्त होते, राजाच्या दुर्वृत्तामुळेच प्रजेला अकाली मृत्यु येतो हा सिद्धांत या श्लोकांत तर अगदी उठून दिसतो. पुरेषु जनपदेषु । पुरे जनपदे चापि । या पुढील श्लोकांच्या पदावरून राजांत व राज्यांत म्हणजे कोठेंहि कांही दोष किंवा प्रमाद संभवला तर असा अकाली

मृत्यु येतो हेंहि सुचविलें आहे. यावरून राज्यधुरंधरांची जबाबदारी व्यक्त होते. ततो द्विजा वसिष्ठेन सार्धमष्टौ प्रवेशिताः । राजानं देवसंकाशं वर्धस्वेति ततोऽब्रुवन् । मार्कंडेयोऽथ मौद्गल्यो वामदेवश्च काश्यपः । कात्यायनोऽथ जाबालिगौतमो नारदस्तथा । एते द्विजर्षभाः सर्वे आसनेषु पवेशिताः । मन्त्रिणस्तानुपाव्हयत् । इत्यादि अठराव्या अध्यायाच्या श्लोकावरून श्रीरामाच्या मंत्रिमंडळाचा परिचय होतो. अष्टप्रधानांची कल्पना येथें व्यक्त होते. हें मंत्रिमंडळ सर्व ऋषिमुनि म्हणून म्हणवून घेणाऱ्या ब्राह्मणांचेच होतें हेंहिं आढळून येते. ‘ वर्धस्वेति ‘ या शब्दावरून त्यावेळच्या राजाशीर्वादाची पद्धतिहिं कळून येते. यो ह्यधर्ममकार्य वा विषये पार्थिवस्य तु । करोति चाश्रीमूलं तत्पुरे वा दुर्मतिर्नरः । राज्यांत कोठेंहि अधर्म वा अकार्य झालें असतां तें राष्ट्राच्या संपत्तीचें नाशक होतें, हें या श्लोकावरून स्पष्ट होते. अधीतस्य च तप्तस्य कर्मणः सुकृतस्य च । षष्टं भजति भागं तु प्रजा धर्मेण पालयन् । प्रजेचें धर्मानें पालन केलें असतां प्रजेनें केलेल्या अध्ययनाचा, तपाचा, सत्कर्माचा एक भाग राजाला मिळतो. उत्पत्तीचाहि एकषष्टांश राजाला मिळतो हेंहि यांतून निघतें.

home-last-sec-img