Literature

पितृभक्त व एकवचनी श्रीराम

पूज्य पितृचरणांना संतोष न देतां त्यांची आज्ञा पालन न करता त्यांचा कोप संपादन करून एक क्षणहि मी जीवंत राहाण्याची इच्छा करीत नाही. ज्याच्यामुळे देहाची उत्पत्ति त्या प्रत्यक्ष परमेश्वराची कोण अवज्ञा करील ! त्या प्रत्यक्ष दैवताच्या आधीन कोण बरें राहाणार नाहीं !

अहं हि वचनाद्राज्ञः पतेयमपि पावके ॥ २८ ॥ 

भक्षयेयं विषं तीक्ष्णं पतेयमपि चार्णवे ।

नियुक्तो गुरुणा पित्रा नृपेण च हितेन च २९

तद्ब्रूहि वचनं देवि राज्ञो यद्भिकांक्षितम् ॥

करिष्ये प्रतिजाने च रामो द्विर्नाभिभाषते ३०( वा. रा. अ. स. १८)

-हे कैकेयी माते ! पित्याच्या आज्ञेने मी धगधगत्या अग्नीतहि उडी घेईन हलाहल विषाचेंहि पान करीन समुद्रांतहि शरीर झोकून देईन. हितेच्छु पिता व गुरु असणाऱ्या या महाराजांची कोणती आज्ञा आहे तें कळव. मी पालन करीन की नाही असा संदेह धरूं नकोस. मी पितृइच्छेप्रमाणे वागण्याचे पाहिजे तर वचन देतो. माझी प्रतिज्ञा कधीहि खोटी होत नाहीं. राम कधींहि दोनदां बोलत नाही. या श्लोकावरून श्रीरामाची उत्कट पितृभक्ति दिसून येते व श्रीराम हा एकवचनी कसा होता हेंहि कळून येतें.

home-last-sec-img