Literature

पितृलोक व पितृयज्ञ

अधामृताः पितृषु संभवन्तु ।। (अथर्व. १८-४-४८) 

पितॄणां लोकमपि गच्छन्तु ये मृताः ॥ (अथर्व. १२-२-४५)

या वेदाच्या आधारानें मृत पितर पितृलोकीं अर्यमादि पितृदेवतांच्या सान्निध्यांत वास करतात हे स्पष्ट होतें. या पितृलोकांतील अथवा स्वर्गलोकांतील पितरांना वेदमंत्रांनी आमंत्रण करून, सत्संतति, चिरसंपत्ति व धर्मप्रवृत्ति यांकरितां जलतर्पण, पिंड आणि ब्राह्मणभोजन याद्वारां तृप्ति देणाऱ्या कर्मविशेषाला पितृयज्ञ, पितृकार्य अथवा श्राद्ध असे म्हणतात.

home-last-sec-img