Literature

पौष वद्य अष्टमी

स्त्री, पुरुष हे दोन्ही भिन्न असले तरी दोघांचा निर्माता भिन्न नाही. एकापासून दोन दिसत असले तरी विचारांती ते एकच आहेत. असेच ध्यानी येईल. भिन्नत्वास प्राधान्य दिले तर देहाला महत्त्व दिल्यासारखे होईल, अशारितीने देहाला महत्त्व दिल्यानंतर त्या देहातील ‘ मी ‘ निघुन गेल्यावर त्या शवास महत्त्व असावयास हवे. म्हणजेच शवाला वाचा असणे अशक्य आहे. त्यास हाक मारताच त्याने ‘ ओ ‘ दिली पाहिजे. पण तसे होत नाही. यावरून भिन्न असलेल्या स्त्री-पुरूषांच्या शरीरास महत्त्व नसून शरीर स्थित ‘ मी ‘ लाच म्हणजे आत्म्यालाच महत्त्व आहे ते स्पष्ट होते. आत्मा हा अभिन्नच होय. ते अनेक असले तरी अभिन्नच असते. अनेक शरीरात दृग्गोचर होणारे चैतन्य एकच आहे. 

     शरीरापासून शरीरोत्पत्ती. उत्पन्न झालेले शरीर अन्नामुळे पोसले जाते. अन्न नसल्यास शरीर टिकणार नाही. अन्नाचे परिणामस्वरूप असलेल्या रज-रेतापासूनच शरीरोत्पत्ति होत असते. शरीरास अन्नच कारणीभूत आहे. पण अन्नामध्ये स्त्री, पुरुष असा भेद नाही. अशाप्रकारे विचार केल्यास दृश्य शरीरांची भेदबुध्दी ही निव्वळ स्वप्नसृष्टी होय.

 *श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img