Literature

पौष वद्य एकादशी

 परमात्माच भिन्न भिन्न वर्णाश्रम निर्माण करून त्या सर्वांचा सांभाळ करतो. हे सर्व नाटक चालू असता किंवा संपल्यावरही तत्त्वतः शिल्लक रहाणारे एकमेव सच्चिदानंत स्वरूपच होय.

     जगाप्रमाणे मानवदेहातही मनोबुध्दादि व प्राणेंद्रियादि यामुळे अनेकत्व आहे. डोळे पहातात, कान ऐकतात, नाक वास घेते याप्रमाणे त्यांची कामेही भिन्नच आहेत. ती एकरूप असती तर  अशी निरनिराळी कामे होऊ शकली नसती व मग शरीर व्यवहारही होऊ शकले नसते. कारण एकत्वात भिन्नत्व असू शकत नाही. मन व देहातील इंद्रियांची रूपे भिन्न भिन्न असून त्याची कामेही निरनिराळी आहेत. कानासारखे डोळे नाहीत. डोळ्यासारखे नाक नाही. कानाचे काम डोळे करू शकत नाहीत त्याप्रमाणे डोळ्याचे काम कान करू शकणार नाहीत व या दोघांची कामे नाक करू शकत नाही. अशारितीने सर्व इंद्रिये एकमेकाहून भिन्न असून त्यांची कामेही भिन्न आहेत. पण या सर्व अवयवांचे त्यांच्या कार्याचे व देहाचे मूळ कोण ? या सर्वात काय व्यापून राहिले आहे ? असे प्रश्न केल्यास त्याला मुलभूत कारण ‘ मी ‘ म्हणजे चैतन्य हेच एकमेव होय. म्हणून सर्व इंद्रियांचा प्रेरकही चैतन्यच नाही का ? अशाप्रकारे निरनिराळी कामे चालली नाहीत तर शरीरकार्य कसे होणार ? मानवदेहरूपी अंशिक सृष्टिकार्याच्या विवेचनावरून अखंड सृष्टिकार्य विवेचन आपोआपच होते.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img