Literature

पौष वद्य चतुर्थी

परमात्म्याने प्रत्येक जीवामध्ये मीपणा जागृत केला असून त्याच गतीने सर्व कार्य चालू आहे. परमात्मा ‘ मी ‘ या संज्ञेने सर्व चराचरांत स्वतः विलीन झाला आहे. मानवदेहांत मीपणाची जाणीव नसेल तर कोणतेही कार्य होणार नाही. मीपणाची जाणीव नसती तर तो एका जागीच पडून राहिला असता. अशाला हाक मारल्यावर तो ‘ ओ ‘ उत्तर देणे अशक्यच. कारण मग तो अचेतन पदार्थासारखाच असणार ! यावरून मीपणाची जाणीव नसलेला देह अचेतन, जड आहे हे उघड आहे. देहातील मीपणाची जाणीव हेच चैतन्याचे अस्तित्व होय. जी जाणीव नसल्यास सर्व व्यवहारात ‘ माझें, माझे ‘ हे शब्दच उत्पन्न होणार नाहीत. ‘ मी पहातो ‘ ‘ मी करतो या शब्दांचा कर्ता कोण ? जगामधील व्यवहारासाठी कोणत्यातरी कर्त्याची आवश्यकता असते. तो कर्ता म्हणजेच मीपणाची जाणीव व ही जाणीव म्हणजेच परमात्मस्वरूप होय.

     प्रत्येक देहामधून असलेला ‘ मी ‘ म्हणजे कोण ? याची जाणीव करून देणारा विचार हाच अध्यात्मिक विचार होय.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img