Literature

पौष वद्य प्रतिपदा

सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी परमात्मा हिरण्यरूप होता व त्याचे मुळरूप ब्रह्म, आत्मा, परमात्मा असेच होते, असे श्रुती सांगते. *’ अव्यक्तात्पुरूषः परः पुरूषान्नपरं किञ्चित्साकाष्ठा सा परागतिः | ‘* अव्यक्तापेक्षाही परमात्मा श्रेष्ठ असून त्यापेक्षा श्रेष्ठ असे काहीही नाही अशा तारतम्यभावाने विचार करून श्रुती म्हणते करी, *’ पुरूष एवेदं सर्व यद्भूतं यच्च भव्यम् | ‘* हे सर्व विश्व पुरूषरूपच होय, त्रिकालांच उद्भवणारे सर्व परमात्मरूपच होय. यावरून परमात्म्यापासून काहीही वेगळे नसल्यामुळे सर्वकाही तोच आहे हे निःसंदिग्धपणे सिध्द होते.

     परमात्म्याचे स्वरूप प्रथम कसे होते ? या प्रश्नाचे श्रुतींनी पुढीलप्रमाणे उत्तर दिले आहे. ‘ सुरवातीस परमात्मा स्वयंप्रकाशित होता. त्यामुळे सुरवातीस तो केवळ ज्योतीस्वरूप, केवळ आनंदस्वरूप व निर्गुण, निराकार असा होता. त्याने आपल्या मायेने हिरण्यगर्भ होऊन कार्य करण्याच्या इच्छेने व अनेकत्वाच्या आकांक्षेने पंचमहाभुते निर्मिली व त्यापासून विविधरूपी विराट-स्वरूप धारण केले.

      या जगतातील पंचमहाभूतांनी निर्मिलेल्या सर्व वस्तु सृष्टिनिर्मितीच्या पूर्वी परमात्मस्वरूपच होत्या व त्याच आता विभिन्न स्वरूपात दृग्गोचर होत आहेत.

*श्री प.प स भ श्रीधर स्वामी महाराज*

home-last-sec-img