Literature

पौष शुद्ध एकादशी

परमात्म्याच्या संकल्पामुळे सृष्टोत्पत्ती झाली. संकल्प हा मनाचा स्वभावच , ही सृष्टी सुरवातीस परमात्म्स्वरूप होती. मीपणाची जाणीव सुरवातीस उद्भभवली. तिच्यामधून इच्छा उत्पन्न झाली. इच्छेच्या स्वरूपाचे संकल्पात रूपांतर होऊन सृष्टोत्पत्ती झाली. प्रथम मीपणाची जाणीव, तिच्यामधून मन, मनातून इच्छा, इच्छेतून संकल्प व संकल्पातून उत्पत्ती या क्रमाने पिंडब्रह्मांडदिकांनाही संकल्पच कारणीभूत आहेत. एकंदरीत पाहू गेले तर जगतोत्पत्तिस इच्छाच कारणीभूत आहे. 

     पदार्थाच्या उपभोगासाठी इंद्रियांची आवश्यकता आहे. इंद्रियोत्पत्तीस इच्छाच कारण आहे. इंद्रियशक्तीतून मन व प्राण यांचा प्रादुर्भाव होऊन जगोत्पत्ती होते. म्हणजेच इच्छा शक्ती म्हणजे जग. मात्र जगाच्या सामर्थ्यापेक्षा इच्छाशक्तीचे सामर्थ्य श्रेष्ठ आहे. संकल्प व इच्छा यांना सृष्टिकर्ताच कारणीभूतआहे व तो सर्वशक्तिमान आहे. 

     परमात्म्याने आपल्या इच्छेने सृष्टीने निर्माण करून तिच्यातच प्रवेश केला. *’अभवत् यदिदं किञ्च !’* सृष्टिनिर्मात्या परमात्म्याने आपल्या एकांशाने या सृष्टीचे रूप धारण केले आहे. मानवदेहातही परमात्मा नखशिखांत व्यापला आहे. 

 *श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img