Literature

पौष शुद्ध सप्तमी

 कारण असल्याखेरीज कार्याची आवश्यकता भासत नसते. कारण कार्य हे कारणांवर अवलंबून असते. पदार्थाची आवश्यकता त्याला कारणरूप म्हणजेच त्याचा उपयोग घेणाऱ्यांवर अवलंबून असते. उपभोग घेणारा नसल्यास उपभोग्य वस्तूंचा काहीही उपयोग नाही. सर्व पदार्थ उपभोग्य असून ते परमेश्वराने निर्माण केले आहेत.तो परमेश्वर ,परमात्मा पदार्थाहून वेगळा असून त्याच्यामध्ये पदार्थनिर्मितीची महान शक्ती आहे. आपण आपणास लागणारी उपभोग्य वस्तू आपल्या इच्छेनुसार तयार करून घेतो. त्यावेळी आपणांस निर्माणशक्ती असते. प्रथम आपण निर्मितीची साधने तयार करून घेऊन त्याच्याद्वारे आपणांस आवश्यक वाटणारी अथवा असणारी वस्तु तयार करून घेतो. कर्मा हा चैतन्यरूप असून कार्य मात्र जडस्वरूपी आहे.

     आपल्याला घर बांधावयाचे आहे असे ठरले म्हणजे प्रथम त्याचे ‘मानचित्र’ ( PLAN) तयार केले जाते. त्या मानचित्राच्या अनुरोधाने मूर्त स्वरूपात येणारे कार्य म्हणजेच घर या दृष्टीने विचार केल्यास कारणरूप इच्छाशक्ती व क्रिताशक्तीचे बाह्यस्वरूप म्हणजेच दृश्य पदार्थ असाच याचा अर्थ होतो. 

 

 *श्री.प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी* 

home-last-sec-img