Literature

प्रौढविवाहाची अनिष्टता

अति प्रौढ विवाहाची पद्धतहि फार घातक आहे. गर्भाधानं द्विजः कुर्यादृतौ प्रथम एव हि । चतुर्थदिवसादूर्ध्वं पुत्रार्थी दिवसे समे ॥ लघु आश्वलायन स्मृतीचा हा श्लोक आहे. हा गर्भाधान प्रकरणांत आलेला आहे. या प्रकरणांतल्या ह्या पहिल्याच इलोकांत प्रथम ऋतुमती स्त्री झाली की अर्थात् त्याच्या नियमानुसार चतुर्भिरितरैः सार्धं निंदितैकादशी त्रयोदशी च ।। पहिल्या चार, अकरावी व तेरावी रात्र सोडून सोळा रात्रीतून उरलेल्या दहा रात्रींत, अमावास्या, पौर्णिमा, एकादशी, शिवरात्र इत्यादि पर्वकाळ व कुमुहूर्त सोडून ( पायसादि सात्विक आहार घेऊन ) योग्य दिनीं गर्भाधान करावें म्हणून सांगितलें आहे. यांत काय वरें तथ्य असावें? ऋतुमती झाली की तिच्या ठिकाणी कामोत्पत्ति झाली असा अर्थ होतो. स्त्रीणामष्टगुणः कामः । पुरुषांपेक्षां स्त्रियांना आठपट अधिक काम असतो हैं या वाक्यांवरून स्पष्ट होते. पुरुषाचेनि अष्टगुणें । त्रियांस ईश्वरी देणें । ऐशा केल्या बहुत जेणें । तो एक मूर्ख || ( दा. २१११४२ ) श्रीसमर्थांच्या वाङ्मयांतूनहि अशा रीतीने याचा उल्लेख आला आहे. प्रथम ऋतुमती झाली की गर्भाधान करावें याच दृष्टीने सांगितले असावें. कामातिरेकानें कुठे आडमार्गी पाऊल पडेल या शंकेनेंच असे सांगितलें नसेल कशावरून? अशा देहल्वभावाच्यांना बीस-वीस वर्षांपर्यंत लग्न न करतां ठेवल्यास समाजांत त्या पवित्र राहतीलच असें निश्चयात्मक सांगतां येत नाही. आतां जें ऐकिवांत येत आहे त्यावरून मनुस्मृतीचे नेमके हे श्लोक आठवतात. पौश्चल्याञ्चलाचत्ताच नैस्नेह्याच्च स्वभावतः । रक्षिता यत्नतोऽपीह भर्तृष्वेता विकुर्वते ।। ९-४५ ।।

पुरुषांच्या निकट राहण्यानें व स्पर्शाने स्त्रियांच्या ठिकाणी कामोत्पत्ति होऊन परपुरुषावर मन जातें, स्वाभांत्रिकपणे निग्रहशात कमी असते, चित्त अधिक चंचल असते, स्वभावतः मनवांचल्यामुळे त्या निस्नेह असतात हे सर्व जाणून नवरा परोपरीने त्यांच्यावर देखरेख ठेवीत असतांहि, रक्षण करीत असतांहि अशा प्रसंगापूर्वीच वारीत असतां, कांही विवाहित स्त्रीया जर पतीशी प्रतारणा करतात, तर ज्या अलीकडच्या कामोदीपक वातावरणांत बीस बीस पंचवीस पंच बीस वर्षांपर्यंत अविवाहित असतात त्या सर्वांविषयींच कशी खात्री देता येईल? कामातुराणां न भयं न लज्जा कामातुरांना भयहि नसते आणि लज्जाहि पण नसते असे सुभाषित आहे. अशा प्रौढ स्थितीत मग मन अनावर झालें तर मनूनें सांगितल्याप्रमाणे होत असावे. ‘नैता रूपं परीक्षन्ते नासां वयसि संस्थितिः । सुरुपं चा विरूपं वा पुमानित्येव भुञ्जते ।। (मनु. ९११४) -विक्रांरवशतेनें मग हा सुन्दर आहे का कुरूप; तरुण आहे का उतार वयाचा या कशाचाच त्यांच्या मनाला विचार न येतां, सुरूप असो वा कुरूप असो, एका तो पुरुष आहे या दृष्टीनेच त्या त्याच्याशी रत होतात. मनुमुनी हे अतींद्रियदृष्टीचे त्रिकालज्ञ होते; त्यांनी हें जें असे लिहून ठेवले आहे, तसेच आतांच्या काळी कानांवर पडत आहे. अलीकडे याचा कांही निषेधच न मानण्याइतकी समाजाची स्थिति येऊन ठेपली आहे. ही स्थिति पुढच्या पिढीच्या व आतांच्या पिढीच्याहि इहपराच्या दृष्टीने अति धातुक व अधोगतिकारक आहे. परिस्थिति आंगवळणी पडत असल्यामुळे, दहाजण वागत असल्याप्रमाणेच एक वर्तनक्रम बनत असल्यामुळे त्या परिस्थितीतल्या लोकांना त्याची कल्पना येत नसली तरी, त्या परिस्थितीपासून दूर राहून तिचे निरीक्षण करणाऱ्या व ती ऐकणाऱ्या पवित्र ‘ हृदयाच्या सुसंस्कृत मनुष्याला त्याच्याविषयी फारच वाईट वाटते. अशा अधोगतीपासून समाज बांचावा म्हणूनच केवळ तो त्या स्थितीने पटेल अशा प्रमाणांनी दिग्दर्शन करून दाखवितो.

home-last-sec-img