Literature

फाल्गुन वद्य अमावस्या

सर्वसमर्थ अशा भगवंताला भारताने केलेली वैदिक प्रार्थना अशी आहे.

*पश्येम शरदः शतं | जीवेम शरदः शतं | नन्दाम शरदः शतं |*
*मोदाम शरदः शतं |* *भवाम शरदः शतं |* *शृणयाम शरदः शतं |*
*प्रब्रवाम शरदः शतं | अधीतास्याम शरदः शतम् |*

शंभर वर्षे म्हणजेच जोपर्यंत पूर्ण आयुष्यमर्यादा आहे तोपर्यंत आम्हास सर्वप्रकारे सर्वांचे उन्नत तसेच सर्वमंगलरूपी आनंदरूप जीवन पाहू दे ! आम्ही सर्वांनी सर्वोत्कृष्ट इहपर सुखयुक्त मंगलमय जीवन जगावे. आमचे जीवन दिव्य व आत्मानंदयुक्त होवो ! आम्ही सर्व प्रकारच्या ऐहिक सुख सौकर्याने संपन्न होऊन कृतकृत्यायुक्त शांतिपूर्ण जीवन भोगावे. आम्ही सर्वाधिक सामर्थ्यवान होऊन अखंड संपन्न असावे. आत्मविचार तसेच सर्वांचे सच्चरित्रयुक्त जीवन एकमेव आम्हांस अहर्निश ऐकण्यास मिळो. आम्ही सदैव एकमेकाबरोबर आत्मविचार करावा. सदैव सत्य तशीच सर्वश्रेष्ठ अशी हितकर मृदू व मंजुळ भाषा बोलावी. आमचे जीवन दैन्य, शून्य, जयसंपन्न, सर्वश्रेष्ठ असे दिव्य आध्यात्मिक असावे.
स्वतः सिद्ध, निरतिशय, सुखरूप, स्वसंवेद्य, आत्मप्रकाशांतच रममाण होणाऱ्या देवभूमींचे नांवच ‘भारत’ होय. येथील सिद्धांत एकात्मता आहे. अखिल स्त्री-पुरुषातहि आनंदघन चैतन्य पहाण्याचा, परस्त्रीशी मातेप्रमाणे व्यवहार करण्याचा, परद्रव्यास लाकूड किंवा मातीच्या ढेकळासारखे मानण्याचा या देशाचा बद्धमूल अभ्यास आहे.

*श्री.प.प.सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img