Literature

फाल्गुन वद्य तृतीया

*’अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः |’ (भ.गी.५|५)*

‘अज्ञानाच्या आवरणाने ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान आच्छादित झाल्यामुळेच जीव भिन्नत्व, विविधत्व यांनी युक्त असलेल्या जगांत मोहित झाले आहेत.’ असे श्रीकृष्ण भगवानांनी गीतेत सांगितले आहे.

*’अज्ञानादेव संसारो ज्ञानादेव विमुच्यते |’ (योगतत्वी १६ )*

आपल्या अज्ञानामुळेच मानव संसाराला चिटकून रहातो. सूर्यप्रकाशाने धुके व अंधःकार नाहिसा होतो त्याप्रमाणे स्वस्वरूपज्ञानाने संसारापासून सुटका होते.

*’ज्ञानेन तु तज्ज्ञानं येषान्नाशितमात्मनः |*

*तेषामादित्यवज्ज्ञानं प्रकाशयति तत्परम् |’* (भ.गी.५/१६)

‘आत्मरूपासंबंधीचे अज्ञान ज्ञानाने जे नाहिसे करू शकतात, त्यांचे आत्मज्ञान सुर्याप्रमाणे प्रकाशित होते,’ असे भगवद्गीतेत सांगितले आहे. आत्मज्ञान होत असतांना अज्ञानरूपी रात्र घालवून मानव अद्वितीय सूर्याप्रमाणे असलेला ब्रह्मभाव प्राप्त करू शकतो.

*’एकमेवाद्वितीयं ब्रह्म |’ ‘एकमेवाद्वयं ब्रह्म नेहं नानस्ति किञ्च न |’* ब्रह्म स्वतःच अद्वितीय आहे. त्याच्या अज्ञानामुळेच भिन्नत्व, विविधत्व दिसून येते. ब्रह्माच्या ज्ञानानेच अज्ञान रज्जूसर्पाप्रमाणे आपोआपच नाहिसे होणे सहज शक्य आहे.

*श्री.प.प.सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img