Literature

फाल्गुन वद्य दशमी

आपण जगांत पूजनीय व्हावे वंदनीय व्हावे असे वाटत असल्यास सर्व जगांत आपल्यास मान्यता मिळवावयाची असल्यास खऱ्या विद्येच्या संपादनाकरता कष्टच केले पाहिजेत. अशा मनुष्याची विद्या किंवा अधिकार स्तुतीस पात्र ठरतात. तो जगाला मार्गदर्शकही ठरतो. पण विद्याविहीनास ते अशक्य आहे.

सर्वसाधारणपणे मनुष्यास योग्यता प्राप्त करून घ्यायची असल्यास विद्या हे एकच साधन होय. विद्वानांच्या चरणकमलांत सम्राटाचे तेज असते.

विद्या संपादनाव्यतिरिक्त त्यासाठी साधन ही मुख्य गोष्ट आहे असे म्हटले जाते. कोणती विद्या उत्कृष्ट आहे? या प्रश्नास ‘ज्यामुळे जीवनाचे अंतिम ध्येय किंवा जीवनाची सार्थकता प्राप्त होते तीच विद्या ‘ असेच उत्तर आहे. जी विद्या शिकल्याने पारमार्थिक यश प्राप्त होईल, जी मानवी आदर्शत्वाला कारणीभूत होईल तिलाच विद्या म्हणता येईल.

लोकपूज्यता, लोकहित जीवनसार्थकता, परमात्मकृपा या ज्यामुळे प्राप्त होतात तिला विद्या म्हणतात. पण आपल्या बाल्यावस्थेत हे कसे शक्य आहे? असे आपण विचाराल. समय हा आपल्याला आपल्या मर्जीनुरूप वापरता येतो त्याचप्रमाणे बालमतही सहज बदलू शकते.

*श्री.प.प.सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img