Literature

फाल्गुन वद्य नवमी

ज्ञानार्जन करीत असतांना, शिकत असतांना, आपण शिकत असलेल्या सर्व विषयांत सत्याचा विचार प्रगट केलेला आहे हे लक्षांत ठेवले पाहिजे व त्याप्रमाणे आचरणही केले पाहिजे. त्यायोगाने आपल्या जीवनाचे सार्थकच होईल. आपण शिकत असलेल्या विद्येमुळेच आपली योग्यता सर्वत्र ठरविली जाते. मनुष्याचे आचार, विचार, चालचलवणूक, स्वभाव, प्रकृती ही सर्व लक्षांत आणून देणारी दिव्यशक्ती म्हणजे विद्याच होय.

विद्या नसलेला पशूच होय. आपले संस्कार व आपली योग्यता समजण्यासाठी विद्येची आवश्यकता आहे. मनुष्यामध्ये तेज निर्माण होण्यासाठी आणि त्या तेजास तीव्रता येण्यासाठी त्याची योग्यताच कारणीभूत असते. देहसौंदर्याने किंवा वेषभूषणांनी मनुष्य विद्वान ठरत नाही. विद्याविहीन मनुष्य कितीही आकर्षक असला तरी विद्यावंतांच्ये तेजस्वितेची तो बरोबरी करू शकत नाही. प्रपंचामध्ये विद्याविहीनाचे आकर्षण जन्मसार्थकतेस सहाय्यभूत होऊच शकत नाही. तेथे विद्येचीच आवश्यकता आहे. एखादा कुरूप मनुष्य विद्यावंत असल्यास तो विद्येच्या प्रभावाने आकर्षण मिळवू शकतो.

*श्री.प.प.सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img