Literature

फाल्गुन शुद्ध त्रयोदशी

परमेश्वराच्या ठिकाणी श्रद्धा न ठेवता केलेले कोणतेही कार्य ‘भगवद् भक्ती’ या स्वरूपात येत नाही. श्रद्धा हेच शक्ति, भक्ति व मुक्ति यांचे मुर्तस्वरूप होय.
प्रापंचिक विषयामध्ये जशी अत्यासक्त भावना असते तशीच अत्यासक्त भावना परमेश्वराच्या ठिकाणी ठेवणारा मनुष्य अत्युत्कृष्ट भगवद् भक्त होतो. अत्यासक्ति हेच भक्तीचे लक्षण होय.

‘हे परमात्मा तूंच मला मार्ग दाखव. दुसरा कोणताही मार्ग मला सद्गति मिळवून देणारा नाही.’ अशा भावनेने भगवंतास शरण गेल्यास तो दर्याद्र परमात्मा आपल्याला विसरणार नाही.

खऱ्या भगवद् भक्ताला देहाभिमान मुळीच नसतो. त्याचे संरक्षण भगवंतच करतो आपले सर्वस्व विसरून भगवंताला अनन्यभावाने शरण गेल्यास तो निश्चितपणे आपला उद्धार करील एकंदरीत श्रद्धाभक्तीच मानवाच्या उद्धाराचे प्रबळ साधन होय.

तुम्ही सगळे

*त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव |*

*त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्व मम देव देव ||*

हे एका आवाजात म्हणा, ध्यान करा व तन्मय व्हा ! सच्चिदानंदस्वरूप, सर्वात्मा, सर्वशक्तिमान अशा परमात्म्याच्या कृपेने तुमचे सर्वांचे जीवन दिव्य व मंगलमय होवो !!

*श्री.प.प.सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img