Literature

ब्राह्मणांचा आचारधर्म

स्नान संध्या जपो होमः स्वाध्यायाभ्यसनं तथा माध्यान्हिकी क्रिया पंचयज्ञाद्यतिथिपूजनम्दानशिष्टप्रतिग्राहौ पोष्यवर्गैः सहाशनम्सत्कथाश्रवणं सायंसंध्या होमादिकं च हिशयनं च यथाकाले धर्मपत्न्या सह गृही। यजनं याजनं चैव वेदस्याध्ययनं च हिअध्यापनं तथा दान प्रतिग्रहमिहोच्यते । एतानि ब्राह्मणः कुर्यात् षट्कर्माणि दिने दिने । ( लघु. आ. स्मृ. ११७ ) असाच कम समयौनी दिला आहे. (दा. बो. द. ११ स. ३ )

प्रातःकाळी उठावें । कांही पाठांतर करावें ॥ येथानशक्ति आठवायें। सर्वोत्तमासी ॥१५॥ मग दिशेकडे जायें। जे कोणासि च नव्हे ठावें ॥ शौच्य आचमन करावें | निर्मळ जळें ॥ १६ ॥ मुखमार्जन प्रातःस्नान । संध्या तर्पण देवतार्चन || पुढे वैश्वदेव उपासन । येथासांग ||१७|| कोही फळाहार घ्यावा । मग संसार धंदा करावा । सुशब्दे राजी राखावा । सकळ लोक ॥ १८ ॥ ज्या ज्याचा जो व्यापार तेथे असावें खबर्दार || दुश्चितपणे तरी पोर | वेढा लावी ||१९|| चुके ठके बिसरे सांडी | आठवण झालियां चडी || दुश्चित आळसाची रोकडी । प्रचीत पहा ॥ २० ॥ या कारणे साबधान । येकाग्र असावें मन॥ तरी मग जेवितां भोजन | गोड बाटे ॥२१॥ पुढे भोजन झालियावरी । कांहीं वाची चर्चा करी ॥ येकांती जाऊन विवरी । नाना ग्रंथ ||२२|| तरीच प्राणी शाहाणा होतो नाहीतरी मूर्खचि राहातो ॥ लोक खाती आपण पाहातो । दैन्यवाणा ||२३|| ऐक सदेवपणाचे लक्षण | रिकामा जाऊं नेदी एक क्षण | प्रपंच व्यवसायाचे ज्ञान । बरें पाहे ||२४|| कांही मेळवी मग जेबी | गुंतल्या लोकांस उगवी ॥ शरीर कारणी लावी । कांहींतरी ॥ २५॥ कांहीं धर्मचर्चा पुराण । हरिकथा निरूपण || बा जाऊं नेदी क्षण | दोहींकडे ॥ २६ ॥ ऐसा जो सर्वसाबध | त्यास ऊँचा असेल खेद || विवेकें तुटला संबंध | देहबुद्धीचा ॥ २७ ॥ आहे तितुके देवाचें । ऐसें वर्तणें निश्चयाचें ॥ मूळ तुटे उद्वेगाचें । येणें रीतीं ॥२८॥ प्रपंची पाहिजे सुबर्ण। परमार्थी पंचीकरण | महावाक्याचे विवरण | करितां सुटे ॥ २९ ॥ कर्म उपासना आणि ज्ञान । येणे राहे समाधान | परमार्थाचें जें साबन । तेंचि ऐकत जावें ॥ ३० ॥

देवैश्चैव मनुष्यैश्च तिर्यग्भिश्चोपजीव्यते । गृहस्थः प्रत्यहं यस्मात्त हमाच्छ्रेष्ठो गृहाश्रमी || (दक्ष स्मृ. २५७). त्रयाणामाश्रमाणां च गृहस्थो योनिरुच्यते । सीदमानेन तेनैव सीदन्तीहेतरे त्रयः ॥ ५८ ।। मूलं प्राणो धनंस्कंधस्तस्माच्छाखाश्च पल्लवाः । मूलेनैकेन नष्टेन सर्वमेव विनश्यति ॥ ५९ ॥ तस्मात्सर्वप्रयत्नेन रक्षणीयो गृहाश्रमी ॥ ६० ॥ या दक्षस्मृती चाच भाव श्रीसमर्थांच्या दासबोधांतून उतरला आहे.

नाना वेश नाना आश्रम सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम ॥ जेथें पावती विश्राम । त्रैलोक्यवासी ॥ (दा. बो. १४-७-१) देव ऋषी मुनी योगी | नाना तापसी वीतरागी | पितृ आदि करून विभागी। अतीत अभ्यागत ॥२॥ गृहस्थाश्रमी निर्माण झाले आपला आश्रम टाकून गेले | परंतु गृहस्था गृहीं हिंडों लागले । ( त्यांच्या रक्षणार्थ, उद्धारार्थ) कीर्तिरूपें ॥ ३ ॥ या कारणे गृहस्थाश्रम | सकळांमध्ये उत्तमोत्तम ।। परंतु पाहिजे स्वधर्म । आणि भूतदया ॥ ४ ॥ जेथें षड्कर्मे चालती । विध्योक्त क्रिया आचरती । वाग्माधुर्ये बोलती । प्राणिमात्रासी ॥ ५ ॥

विभागशीलसंपन्नः क्षमायुक्तो दयालुकः । स्वकर्मणि सदा युक्तो गृहस्थः स्वर्गभाग्भवेत् ।। ६६ ।। दया लजा क्षमा श्रद्धा प्रज्ञा त्यागः कृतज्ञता । एते यस्य गुणाः सन्ति गृहस्थो मुख्य उच्यते ।। ६७ ।। द्रव्य अन्न-विभागशील संपन्न, क्षमायुक्त, दयाळु, स्वकर्मनिरत गृहस्थ स्वर्ग-भागी दार होतो. दया, लज्जा, क्षमा, श्रद्धा, आत्मनिष्ठा, त्याग, कृतज्ञता इतके ज्याचे गुण आहेत तो ‘गृहस्थ’ म्हणवून घेतो. स्नानसंध्या जपो होमो देवतानां च पूजनम् । आतिथ्यं वैश्वदेवश्च षट्कर्माणि दिने दिने || -स्नान, संध्या, जप, होम, देवपूजा, अतिथिसत्कार, वैश्वदेव ही ब्राह्मणांची नित्य षट्कर्मे होत. दक्षस्मृतीत लीलप्रमाणे त्याज्यात्याज्य कर्मे सांगितली आहेत. संध्यास्त्रानं जपो होमः स्वाध्यायो देवतार्चनम् । वैश्वदेवस्तथाऽऽतिथ्यमुद्घृतं चापि शक्तितः ॥ ९ ॥ अनृतं पारदार्य च तथाऽभक्ष्यस्य भक्षणम् । अगम्या गमनापेयं हिंसास्तेयं तथैव च ॥ ११ ॥ अश्रौतधर्माचरणं कर्मधर्मवहि स्कृतम् । नवैतानि विकर्माणि सततं तानि वर्जयेत् ॥ १२ ॥ पैशून्यमनृतं माया कामः क्रोधस्तथाऽप्रियम् । दोषो दम्भ: परदोहो विकर्माणीति वर्जयेत् ॥ १३ ॥ गीतनृत्ये कृषिः सेवा वाणिज्यं लवणक्रिया । द्यूत कर्मायुधान्यात्मप्रशंसा च विकर्म च ॥ १४ ॥ शौचे यत्नः सदा कार्य

शौचमूलो द्विजः स्मृतः । शौचाचारविहीनस्य समस्ता निष्फलाः क्रियाः ।। ५१२ ।। शौचं च द्विविधं प्रोक्तं बाह्यमाभ्यंतरं तथा। मृज्जलाभ्यां स्मृतं बाह्यं भावशुद्धिस्तथाऽ ऽन्तरम् ॥ ३ ॥ स्नान, संध्या, जप, होम वेदाध्ययन, देवतार्चन, वैश्वदेव, आतिथ्य व वेदार्थविवरण ही ब्राह्मणांची कर्मे नित्याची आहेत. असत्य, व्यभिचार, मांसादि अभक्ष्यभक्षण, अगम्यागमन, मयादि अपेयपान, हिंसा, चोरी, वेदविरुद्ध कर्म, धर्मबहिष्कृत कर्म, मग ने स्वतःच्या बुद्धीने असो की परप्रेरणेने असो, कधीहि करूं नये. ही विकमें होत. दुष्टपणा, लबाडी, कपट-कारस्थान, गोड बोलून गळा कापणे, काम, क्रोध, जन अप्रिय, प्रमाद, दम्भ, परद्रोह इत्यादि विकर्मे होत. यांचा त्याग करावा. गाणे, नाचणे, नांगरणे, नौकरी करणे, व्यापार करणे, लोखंड, मीठ, दूध व अन विकर्णे, जुगार खेळणे, शस्त्र धारण करणे, आत्मस्तुति करणे, हे सर्व मित मोडते. याचा ब्राह्मणांनी त्याग करावा. शुद्धता असावी. शुद्धतेनेच ‘ब्राह्मण’ म्हणवून घेतो. शुद्धता नसलेल्यांची सर्व कर्मे निष्फळ होतात. अंतर्बाध असे दोन प्रकारचे शौच असते. जलमृत्तिकादिकानें बाढ शुद्धता पाहून आत्मनिष्ठेने संपादिलेल्या चित्तशुद्धीनें, भावशुद्धीने आंतरंगिक शुद्धता संपादावी. ऋषयः पितरो देवा भूतान्यतिथयस्तथा । आशासते कुटुंबिभ्यस्तेभ्यः कार्ये विजानताः ॥ (मनु ३३८०) ऋषी, पितर, देव, गाय, म्हैस, कुत्रे आदि सर्व प्राणी अतिथि म्हणून कुटुंबी माणसाकडे येतात. शहाण्यानें त्यांना अन्न पानादिकानें संतुष्ट करावें. सद्यः पतति मासेन लाक्षया लवणेन च । व्यहेण शूद्रो भवति ब्राह्मणः क्षीरविक्रयात् ॥ (अत्रिस्मृति ). शौचं मंगलमायासा अनसूया स्पृहा दमः लक्षणानि तु विप्रस्य तथा दानं दयाऽपि च ॥ (अत्रि स्मृ. ३३) असे अत्रिस्मृतीत सांगितले आहे. इष्टापूर्ती तु कर्मण्यो ब्राह्मणेन विशेषतः । इष्टेन लभते स्वर्गे मोक्षं पूर्तेन विन्दति || (लघुशंख स्पृ. १) वापीकृपतडागानि देवतायतानानि च । पतितान्युद्धरेद्यस्तु सपूर्तफल मश्नते ।। ४ ।। ब्राह्मणानें इष्टापूर्त कर्मे करावीत. इष्ट कमौनी स्वर्ग व पूर्त कमनीं मोक्ष मिळतो. तळीं, विहिरी, देवालये बांधणे, उद्याने तयार करणे, फळझाडें लावणे, अन्नछत्र, पाणपोई ठेवणें याला पूर्त कर्म म्हणतात. अनि होत्र, तप, सत्य, वेदाचे पालन, आतिथ्य, वैश्वदेव ही इष्ट कर्मे होत. ब्राह्मणाचे हे पंचमहायज्ञ आहेत. अध्यापनं ब्रह्मयज्ञः पितृयज्ञस्तु तर्पणम् । होमो • देवो वलिर्भीतो नृयज्ञोऽतिथिपूजनम् । अध्ययन अध्यापन हा अन्नोदकानें तर्पण पितृयज्ञ, वैश्वदेव होमादि देवयज्ञ, भूतबलि भूतयज्ञ, अतिथि पूजन मनुष्ययज्ञ हे पंचमहायज्ञ गृहस्थानें करावेत. ही ब्राह्मणांची नित्य कर्मे होत. यथा वायुं समाश्रित्य सर्वे जीवन्ति जन्तवः । तथा गृहस्थ माश्रित्य वर्तन्ते सर्व आश्रमाः ।। (मनु. ३।७७ ) प्राणवायूच्या आधारानें प्राणी जसे जगतात त्याप्रमाणेच गृहस्थांच्या आश्रयानें मनुष्य, देव, पितर, कीट, पशुपक्ष्यादि सर्व जगतात. स्वाध्याये नित्ययुक्तः स्यादैवे चैवेद्द कर्मणि ॥ दैवकर्मणि युक्तो हि बिभर्तीदं चराचरम् ॥ अध्ययन, अध्यापन आणि वैश्वदेवादि देवकार्यांत ब्राह्मण निरत असला म्हणजे त्यानें चराचर विश्वाचे धारण, पोषण होते. अकृत्वा वैश्वदेवं तु ये भुजंत्यत्यधार्मिकाः । वृथा तेनान्नपाकेन काकयोनि व्रजन्ति ते ॥ (लघुशातातप स्मृ. ५२ ) वैश्वदेव न करतां जे अति अधार्मिक ब्राह्मण जेवतात त्यांना मरणोत्तर काकयोनि प्राप्त होते. वैश्वदेवाचा विधि कांही माहीत नसला आणि शिकण्याचीहि इच्छा नसल्यास निदान केशवादि नांवानी तरी चोवीस आहुती घातल्या म्हणजे न केल्यापेक्षां काहीतरी केल्यासारखे होईल. यज्ञो विष्णुः । विष्णुमुखा वै देवाः । एको विष्णुर्महद्भूतं पृथग्भूतान्यनेकशः । श्रीन्लोकान्व्याप्य भूतात्मा भुंक्ते विश्व मुगव्ययः || इत्यादि आधारांनी विष्णूच्या चोवीस नांवांनी आहुत्या घातल्या म्हणजे सर्व देवांना मिळतील. विश्वं व्याप्नोतीति विष्णुः । या व्युत्पत्तीनेंहि हाच अर्थ निघतो. अजिबात कांहीं न केल्यापेक्षां एवढे तरी करावें. ज्यांना विधीप्रमाणे करतां येणेंच शक्य नाहीं त्यांच्याचकरितां हा विधि सांगितला आहे. वैश्वदेव पुरा कृत्वा नित्ये चाभ्युदये तथा । स्वाभीष्टदेवतादिभ्यो नैवेद्यं विनिवेदयेत् । ( लघु आश्वलायन स्मृ. १४४) अकृत्वा देवयज्ञं च नैवेद्यं यो निवेदयेत् । तदनं नैव गृण्हन्ति देवताश्चापि सर्वथा ॥ १४५ ॥ या लघु आश्वलायन स्मृतीच्या आधारें प्रथम वैश्वदेव व नंतर नैवेद्य दाखवावा हें सिद्ध होतें. वैश्वदेवेन ये भीता आतिथ्याच्च बहिष्कृताः । सर्वे ते वृषला द्य्नेययाः प्राप्तवेदा अपि द्विजाः ।। (लघुशातातप स्मृ. ५०) येषामध्ययनं नास्ति ये च केचिदनम्नयः । न कुलं श्रोत्रियं येषां सर्वे ते शूद्रधर्मिणः ॥ ५१ ॥ 

home-last-sec-img