Literature

ब्राह्मण, त्याचे महत्त्व व कर्तव्य

चातुर्वर्ण्यं चातुराश्रम्यधर्माः । सर्वे न स्युर्ब्राह्मणानां विनाशात् ॥ असें महाभारताचें वाक्यहि पण आहे. आतापर्यंतच्या ब्राह्मणांनी वैदिक धर्माचा उपदेश करीत वर्णाश्रमाची स्थिति सुधारीत, त्यांचे स्वास्थ्य वाढवीत, समाजांत निष्कंटक सुखशांति राखीत, इहपर निर्दुष्ट सुखसाधनांचे रक्षण करीत स्वपरउद्धाराचे जीवन आंखलें. अध्ययन अध्यापनाच्या योगानें या विश्वमान्य वेदांचेंहि आतांपर्यंत त्यांनीच अतिपरिश्रम सोसून रक्षण केलें.

ब्राह्मणं तु स्वधर्मस्थं दृष्ट्वा विभ्यन्ति चेतरे । स्वधर्म चानुतिष्ठन्ति कृत्यं सर्वे च कुर्वते ॥ (शुकनीति )

—स्वधर्मानुष्ठानपर असून सर्व जनहिताची कामे मोठ्या दक्षतेनें करणाऱ्या सत्पात्र ब्राह्मणाचा समाजावर हटकून परिणाम होतो. त्याच्याविरुद्ध समाज जात नाहीं; इतकेंच नव्हे तर त्याच्या उपदेशानुसार चालतो. स्वधर्माच्या व सद्वर्तनाच्या तपोमूर्ति ब्राह्मणाला भिऊन सर्वहि आपापल्या धर्मा प्रमाणे बिनबोभाट वागू लागतात. समाजांत सद्वृत्ति वाढते.

ब्राह्मणेषु प्रभूदेषु धर्मो विप्रणशेद्भुवम् । धर्मप्रणाशे भूतानामभावः स्यादसंशयः ॥ ( महाभारत )

—ब्राह्मण स्वधर्मापासून चेवले, किंकर्तव्यमूढ झाले, त्यांचे पथप्रदर्श नाचें काम थांबलें, बेदशास्त्रांचा अभ्यास राहिला म्हणजे धर्माचाच म्हणजे समाजांतल्या धर्मबुद्धीचाच नाश होतो. धर्मच जीवन असल्यामुळे धर्मनाशानें ते राष्ट्र अथवा समाजच नष्ट होतो, जगांतून नतिची धर्मतत्त्वे नष्ट झाली म्हणजे जगाचा नाश निःसंशय जवळ ओढवला आहे असे समजावें. धर्म प्रचाराचे काम ब्राह्मणांचे असतें. धर्मग्रंथाच्या अध्ययनानें व तपानें धर्मतत्त्व समजून घेऊन त्याचा उपदेश करण्याकरितांच ब्राह्मण जात वेगळी ठेवली आहे. ती तशीच राखून ठेवणे समाजाच्या हिताचे आहे. परमात्मप्राति सत्य सुखाचा लाभ, तत्त्वज्ञान, धर्मविचरण, धर्माचरण, मनोनिग्रह, इंद्रियनिग्रह, तप, पावित्र्य शांति, उदात्त सरळ स्वभाव, ज्ञान विज्ञानसंपन्नता या लक्षणांनीच ब्राह्मणजात ओळखली जाते. अशा ब्राह्मणाकडूनच खरें जनहित साधतें व राष्ट्राचे इहपर कल्याण होते. अशा परिशुद्ध आत्म्यांच्या संमतीनेंच पूर्वी सामाजिक, राजकीय व धार्मिक इत्यादि जनहिताचे सर्व कायदे होत होते. राजाचे हे मुख्य सल्लागार असत. कृष्णार्जुनांच्या जोडीप्रमाणे वेदवेदांगपारंगत, तपोनिष्ठ, साक्षात्कारी, ज्ञानविज्ञानसंपन्न ब्राह्मण आणि नीतिमान, धर्मनिष्ट, उच्च ध्येयाचे, राज्यधुरंधर विद्वान मुत्सद्दी हे दोघे म्हणजे ब्राह्म- क्षात्र शक्ति एकवटल्या म्हणजे तेथे ऐहिक आणि पारलौकिक उत्कृष्ट वैभव, सकळ दैवी व ऐहिक संपत्ति, संपूर्ण धर्म, उन्नत नीति, उत्कट समाधान, नितांत शांति व अत्युच्च आनंद आपोआपच नांदतो. परिस्थिति ओळवून ब्राह्मणांनी धर्मकारणाबरोबर प्रजेच्या क्षमाकरितां राजकारणहि आपल्या हातांत घेऊन अपघातापासून किती वेळां तरी समाजाचे रक्षण केले आहे. ‘ कर्तव्यत्वेन ‘ हा ब्राह्मणांचा धर्मच होतो.

ब्राह्मणायावगूर्येव द्विजातिर्वधकाम्यया । शतं वर्षाणि तामिस्रनरके परिवर्तते ॥ ( मनु. ४|१६५)

— शुद्र तर राहोच, त्याच्याहून खालच्या जाताचा प्रश्नच नाही. क्षत्रिय वैश्यांपैकीहि जर कोणी ब्राह्मणाला मारण्याकरितां नुसती लाठी उचलील तर तेवढ्यानेंच तो क्षत्रिय-वैश्यहि, उच्च वर्णातलाहि मनुष्य गाढ काळोखीच्या नरकांत शंभर वर्षेः खितपत पडतो, असे क्षत्रियकुलावतंस मनु महाराजांचे वाक्य आहे. मेल्यानंतर तें तसे होईलच, पण इथेच त्याला असें कांहीं तरी प्रत्ययाला आल्याशिवाय राहात नाही.

अत्युत्कटैः पुण्यपापैरिदैव फालमश्रुते । त्रिभिषैस्त्रिभिर्मासैस्त्रिाभि: पक्षैस्त्रिभिर्दिनैः ।।—अत्यधिक पुण्यपापांची चांगली व वाईट फळे इथेच तीन वर्षांच्या, तीन महिन्यांच्या, तीन पक्षांच्या व तीन दिवसांच्या अवधीत भोगाव लागतात, असे शास्त्रबचन आहे. न कदाचिद्द्विजे तस्माद्विद्वानवगुरेदपि। न ताडयेत्तृणेनापि न गात्रात्स्त्रावयेदसृक्॥ ( मनु. ४|१६) जाणत्यानें केव्हांहि ब्राह्मणावर रागावूं नये. त्याला भेडसावू नये. कसल्या गवताने देखील मारूं नये. मग लाठी, शस्त्र इत्यादिकांच्या प्रहाराने त्याचे रक्त निघेल असें करणे बाजूलाच राहिले. हेंहि मनूचेच वाक्य आहे. असे विधान करावयाचे म्हणजे ब्राह्मणांच्या हातून दोष होणेंच अशक्य म्हणून सांगणे आहे. ब्राह्मणांची अशी परिशुद्ध जात होती व तशी ती अजूनहि असावयास हवी. यज्ञोऽ नृतेन क्षरति तपः क्षरति विस्मयात् । आयुर्विप्रापवादेन दानं च परि कीर्तनात् ॥ ( मनु. ४२३७ ) असत्याने यज्ञ नष्ट होतो. विस्मयः स्यादाश्चर्यगर्वयोः ।—गर्वानें तप नष्ट होतें. ब्राह्मणनिंदेनें आयुष्य नष्ट होते. बोलून दाखविण्यानें दानाचें पुण्य नष्ट होतें. अनभ्यासेन वेदानामाचारस्य च वर्जनात् । आलस्यादन्नदोषाच्च मृत्युर्विप्राञ्जिघांसति । (मनु.स्मृ. ५१४) वेदांच्या अनभ्यासानें, ब्राह्मणाचाराच्या परित्यागानें, अनुष्ठानाच्या ठिकाणी आळस बाळगल्याने, अन्नदोषानें मृत्यूचा यांच्यावर घाला पडतो. नाहीतर ते मरणाचीच इच्छा करतात अथवा ते अपमृत्यूने पछाडतात अथवा मरणप्राय अपमान सहन करतात. न लोकवृत्तं वर्तेत वृत्तिहेतोः कथंचन । अजि हामशठां शुद्धां जीवेद्ब्राह्मणजीविकाम् ।। (मनु. ४-११) – उपजीविकेच्या हेतूनें सामान्य लोक जसा वागतो त्याप्रमाणें वागूं नये. कनिष्ठ, हीन जातीया कडे नौकरीस राहू नये. कनिष्ठ व हीन लोकांचें आचरण ठेवू नये. परधर्माचे व परजातीचे अनुकरण करूं नये. पापरहित शुद्ध आणि सरळ असा ब्राह्म णांचा शास्त्रीय तपःप्रधान जीवनक्रम असावा. श्रुतिस्मृत्युदितं सम्यनिषिद्धं स्वेषु कर्मसु । धर्ममूलं निषेवेत सदाचारमतंद्रितः ।। (मनु. ४–१५ )– श्रुतिस्मृत्युक्त अध्ययनाध्यापनादि स्वकर्मानें संबद्ध असलेल्या धर्ममूळ सदा चरणाचें जीवन ब्राह्मणानें पत्करावें. वेदाभ्यासस्तपो ज्ञानमिंद्रियाणां च संयमः । अहिंसा गुरुसेवा च निःश्रेयसकरं परम् ॥— संहिता, आरण्यक, ब्राह्मण, उपनिषत् आदि वेदग्रंयांचा अर्थासहित तत्त्वजिज्ञासापूर्वक अभ्यास, तप म्हणजे नियमबद्ध आचरण, कृच्छ्रचांद्रायणादि देहदंड, आत्मज्ञानविषयक श्रवणादिक, इंद्रियजय, अहिंसा, गुरुसेवा हीं इहपरसाधक ब्राह्मणांची जीवनसाधने होत.

शनकैस्तु क्रियालोपादिमाः क्षत्रियजातयः । वृषलत्वं गता लोके ब्राह्मणादर्शनेन च || पौंड्रकाश्चौड्रद्रविडाः कांबोजा यवनाः शकाः । पारदाः पल्हवाचीनाः किराता दरदाः खशाः || मुखबारुपज्जानां या लोके जातयो बहिः । म्लेंच्छ्वाचश्चार्यवाचः सर्वे ते दस्यवः स्मृताः ॥ (मनु. १०|४३, ४४, ४५) ब्राह्मणांचा उपमर्द केल्यानें, क्रियालोपानें, संस्कारहीन त्यानें व ब्राह्मणांच्या नंतर आपोआप झालेल्या अदर्शनानें क्षत्रिय जाति धर्महीन व दुष्ट झाल्या. या अशा क्षत्रिय जातींचीच नावें वरच्या लोकांत आहेत. पाँड्रादि ही ती नांवे ब्राह्मणांचे शिक्षण आणि रक्षण सुटल्यामुळे वाटेल तसे वागून, त्यांनी त्या त्या देशाला अनुसरून ती ती नांवें धारण केली आणि ते केवळ पशुवृत्तीचे बनले. भारतवर्षांतूनच ज्या जाती भारताच्या बाहेर गेल्या त्यांचे धर्माचे शिक्षण सुटलें व ते मग क्रमेण रानटी लुटारूंप्रमाणे पूर्वी झाले असावेत. म्लेच्छ अथवा आर्य अशा भाषेनेंहि ओळखल्या जाणल्या त्या जाती संस्कारशून्य समजाव्यात, असा या श्लोकांचा भावार्थ वाटतो. एखाद्या देशांतन हद्दपार झालेल्या गुन्हेगारांचे जसे कालांतराने दुसरें राष्ट्रच बनावें, तशीच भारतवर्षांतील हद्दपार झालेल्या चारहि वर्षांच्या गुन्हेगारांची भारतेतर राष्ट्र झाली असे अनुमान यांतून निघते काय ? त्या दृष्टीने कांहीं मर्यादेपर्यंत अमेरिकाचा विचार करता येईल असे वाटतें. ‘निवासवेत् ‘, ‘प्रवासनम् ‘ असे शब्द अपराध्यांच्या बाबतींत दिसून येतात. एखादा श्लोक उदाहरणार्थ घेऊं. आगःसु ब्राह्मणस्यैव कार्यो मध्यमसाहसः । विवास्यो वा भवेद्राष्ट्रात्सद्रव्यः सपरिच्छदः ॥ (मनु. ९।२४१) या श्लोकांत ब्राह्मणाने अपराध केल्यास सव्यसहकुटुंब त्याला देशाच्या बाहेर घालवावे म्हणून या श्लोकांत सांगितले आहे. परमात्म्याच्या मुख, बाहु, मांड्या व पाय यांपासून जी मानवांची प्रथमसृष्टि झाली ती एकच असणार. कोणतें तरी नियत स्थानच त्या मनुष्यांना दिले असले पाहिजे. मनुष्यजातीचा आदिपुरुष मनु हा आर्यावतांतच होता. याच्यापासूनच सूर्यवंश पुढे चालला. ऋषिमुनींचे आश्रम, तपोभूमि, यागभूमि, कर्मभूमि हा भारतवर्षच आहे, हे त्या त्या ऐतिहासिक स्थलमहात्म्यावरून, पुराणांवरून सिद्ध होते. प्रथम मानवांची उत्पत्ति येथें होऊन (इथेच ते होते) पुढें अपराध्यांना हृद्दपारीची शिक्षा म्हणून इतर देशांत पाठविण्याचा क्रम सुरू झाला. उपजीविकेच्या दृष्टीनेहि पुढे कांही तिकडे गेले असतील. पुढे पुढे त्या दोषी लोकांच्या शूद्राचाराचाच परिणाम तिथल्या इथून उपजीविके करितां गेलेल्या अशा लोकांवरहि झाला. पुढे इकडचे दळणवळण कांहीं कारणानें तुटून गेलें आणि तेहि ‘संगदोपेण’ तसेच बनले. बराच काळ असा मध्ये जाऊन तिकडच्यांची रानटी संस्कृति बनली. पुढे प्रवासी लोकांनी इकडून कांहीतरी तिकडे नेऊन, कांहीं इकडचें, कांहीं मनाचे, कांही त्या देशाच्या व त्या माणसांच्या अनुकूलतेचें सर्व गोळा करून कांहीं धर्माची, नीतीची, भक्तीची, तत्त्वज्ञानाची गोळाबेरीज तिकडच्यांना सांगितली. अनेक मतप्रचारक. झाले. असे सर्व होऊन तिकडच्या राष्ट्राचे आजचें असें एकरूप दिसून येत आहे, असें म्हणतां येईल. यानें वैदिक सृष्टिक्रम सुटत नाहीं. एक देव,एक सृष्टि, एक धर्म व एक धर्मग्रंथ या ठोकळ विचारालाहि समंजस होते. एतद्देशप्रसूतस्य सकाशादग्रजन्मनःस्वं त्वं चरित्रं शिक्षेरन पृथिव्यां सर्वमानवाः || ( मनु. २ | २० ) या श्लोकाचाहि निर्वाह होतो. ‘ स्वं स्त्रं — आपले आपले मूळ आचार पृथ्वीतल्या सर्व मानवांनी या भारतांत जन्माला आलेल्या व इथेच वाढून शास्त्रीय शिक्षण घेतलेल्या सर्वतोपरि आदर्श ब्राह्मणांकडूनच शिकावेत असे मनूनें सांगितलें आहे. ब्राह्मणांचे गुरुत्व विदेशीयांवरहि या मागच्या प्राचीन धाग्यानें संबंधित होतें. इतर देशांतून धर्माचा प्रचार ब्राह्मणांनी करावा, पूर्वी केला होता असेहि यांतून ध्वनित होतें. इंद्रवर्धन्तोऽत्पुरः कृण्वन्तो विश्वमार्यम् । अपघ्नन्तोऽराव्णः ।। (ऋ. ९ । ६ । ३५) राक्षसी अथवा पशुवृत्तीच्या अनीतला घालवून परमात्म्याचे तत्त्वज्ञान जगभर प्रसत होईल, वृद्धिंगत होईल असें करून संबंध जगालाच उच्च आचारविचारांचे आदर्श आर्य बनवा. पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकराट् । —संबंध समुद्रवलयांकित पृथ्वीचा एकच एक सम्राट असावा, अशी यांची महत्त्वाकांक्षा होती. वसुधैव कुटुंबकम् । – यांचे विश्वच एक कुटुंब, हे विश्वकुटुंबी. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु । आणि म्हणूनच संबंध विश्वन्त सुखी असो अशी यांची वासना. ब्राह्मणांचे हैं। लक्ष्य. उत्पत्तिरेव विप्रस्य मूर्तिर्धर्मस्य शाश्वती । स हि धर्मार्थ उत्पन्नो ब्रह्मभूयाय कल्पते ॥ ( मनु. १ । ९८ ) धर्माच्या रूपानेच ब्राह्मण जन्माला येतो. धर्ममूर्तीच असून धर्माकरितांच उत्पन्न झालेला ब्राह्मण स्वधर्माच्या आचरणाने स्वतः ब्रह्मरूप होतो व दुसऱ्यालाहि ब्रह्मरूप करतो. मोठेपणाच्या आचार-विचार उच्चारांनीच मोठ्यांचा मोठेपणा कायम राहातो हे तत्त्व ब्राह्मणांनी ओळवून असावे म्हणून व तशा काही ब्राह्मणांत तसे कांही सामर्थ्य का दिसून येत नाही, या प्रश्नालाहि आपोआप उत्तर मिळावे म्हणून मनूनें हा पुढचा लोक लिहिला असावा. आचाराद्विच्युतो विप्रो न वेदफलमनुते आचारेण तु संयुक्तः संपूर्णफलभाग्भवेत् । ( मनु. १११०९) ब्राह्मणांच्या कुलांत जन्मून सांग वेदाध्ययन जरी केले असले आणि आचरण मात्र तसे नसले तर त्या आचार भ्रष्टाला वेदाध्ययनाचें तें तसे उज्ज्वल फळ मिळत नाही. आचारहीनं न पुनन्ति वेदाः । आचार-अनुष्ठानच मुख्य ब्राह्मणकुलांत जन्माला येऊन ज्यानें सांग वेदाध्ययन केले आहे व जो तशा आचार-विचार उच्चारानेंहि युक्त आहे त्यालाच मात्र वेदाध्ययनाचे संपूर्ण फळ मिळतें. तोच वेदमूर्ति ब्राह्मण. त्याच्या ठिकाणी वेदहि आपले पूर्ण सामर्थ्य प्रगट करतात. विद्वद्भिः सेवितः सद्भिः नित्यमद्वेषरागिभिः । हृदयेनाभ्यनुज्ञातो यो धर्मस्तं निबोधत ॥ ( मनु. २ । १) वेदवेदांगपारंगत असणाऱ्या सज्जनांनी रागद्वेषशून्य अशा आपल्या हत्पूर्वक जो धर्म म्हणून सांगितला असेल तोच तुम्ही जाणा. तोच धर्म मी तुम्हांला सांगत आहे. त्याची ओळख चांगली पटवून घ्या, म्हणून मनूने सांगितलें जाहे. वेदाचाररतो विप्रो वेदवेदांगपारगः । तैरप्यनुष्ठितो धर्म उक्तश्चैव विशेषतः ॥ बृहद्यम स्मृतीच्या पांचव्या अध्यायाचा हा चौथा श्लोक आहे. यांतहि तसेंच सांगितले आहे. यत्तु आर्याः क्रियमाणं प्रशंसन्ति स धर्मः । ( आपस्तंबसूत्र ) असे हे आर्य ज्या आचाराची प्रशंसा करतात तोच धर्म असें आपस्तंबसूत्रांत सांगितलें आहे. आर्यांच्या आचरित, कथित, प्रतिपादित धर्मालाच ‘धर्म’ म्हणावयाचे. महाजनो येन गतः स पन्थाः । महाजन ज्या मार्गानें जातात तोच उन्नतीचा राजमार्ग, धर्म अशा महाजनांनाच विचारावयाचा असतो. अशांनाच धर्म निर्णयाचा अधिकार असतो. चत्वारो वेदधर्मज्ञाः परिषत् त्रयमेव वा । सा ब्रूते यत्स धर्मः स्यादेको वाऽध्यात्मवित्तमः ।। ( याज्ञ. स्मृ. १।९ ) – वेदधर्म उत्तम प्रकारें जाणणारे चार अथवा तीन असले तरी पुरे. ती एक धर्मसभा व्हावयास हरकत नाही. त्यांनी दिलेला तो धर्मनिर्णय होय. अथवा पूर्ण अध्यात्मनिष्ठ एक असला तरी पुरे. त्याने सांगितलेला धर्मनिर्णय सर्वांनीहि मानावा. जो आपल्यांत सर्वांना व सर्वांत आपल्याला बघतो तो समष्टीचा आत्मज्ञानी स्वराज्याची म्हणजे आत्मराज्याची प्राप्ति करून घेतो, अशा तऱ्हेचे मनूचे वाक्य आपण मागें बघितलें आहे. पुन्हां पाहिजे व त्याचे स्मरण करूं. सर्वभूतेषु चात्मानं सर्वभूतानि चात्मनि समं पश्यन्नात्मयाजी स्वाराज्यमधिगच्छति || ( मनु. १२/९१ ) अशा या स्वाराज्याची ज्याला प्राप्ति झाली त्याचे प्रतिअणुरेण प्राणिपदार्थांतूनच त्वराज्य असते. जगाच्या सर्व प्राण्यांना स्वरूपानेच पाहात त्या सर्वांच्या विषयीं निष्काम प्रेम, निरपेक्ष दयाबुद्धि ठेवून प्रतिफळाची इच्छा न करतां त्यावर परोपकार ते करतात. त्यांची क्षमा, अहिंसा, सहिष्णुता, सभ्यता, सौजन्य हें सर्वच कांहीं अवर्णनीय असतें. यांचे स्वाहित सारें प्रत्येकांच्या परहितांत सामावून गेलेलें असतें.

व्यक्तिगत सुखाची मुळीं कल्पनाच यांना कधीं शिवत नाहीं. आपल्या करितां परहिंसा करणें, स्वार्थीकरितां दुसऱ्याचा द्वेष करणें, दुसऱ्याची उर्जित अवस्था पाहून मनांतच असूया बाळगणें, दुसऱ्यांचा तिरस्कार करणे, स्वतः स्वैर वर्तन ठेवून उलट सज्जनांची निंदा करणें, धर्माविरुद्ध वर्तन ठेवणें, नीतीच्या निर्बंधाचें उल्लंघन करणें, दुसऱ्याचें धनधान्य, स्त्रीपुत्र, पशुपक्षी, जमीन एवंच परस्व स्वसुखासाठीं बलात्कारानें हिरावून घेणें आदि आसुरी प्रवृत्ति व कृति ज्यांच्या वाऱ्यालाहि उभी राहत नाहीं; किंवा अगोदरच कोठें घर करून असल्यास त्या ठिकाणींच ती ज्यांच्या कृपामात्रें नष्ट होते तेच हे महासत्वशील आर्य. इंद्रियमनांना स्वाधीन ठेवून, शुद्ध अतःकरण करून, स्वपर उद्धाराकरितां तात्त्विक, वेदविहित कर्मे करीत, त्या मोक्षधर्माच्या प्रचारार्थ जीवन बाळगणारे तेच आर्य. मनुष्याच्या ठिकाणीं असणारी पशुवृत्ति घालवून, मनुष्यधर्माचा बोध करून, त्यांना सद्धर्मपरायण करून, उत्कृष्ट नीतिमान् करून, परोपकारी करून, निष्कामतेच्या राजमार्गानें सर्वांना जे आनंदघन परमात्मस्वरूपाकडे घेऊन जातात तेच आर्य. वैदिक मतानुसार उत्तम सदाचार ठेवून मानवजातींत त्याचा प्रचार करणें, वैदिक तत्त्वांचा अभ्यास करून त्यांना दुसऱ्यांच्याहि आंगवळणीं पाडणें हीं आयांचीं मुख्य कार्ये होत. वैदिक वर्णाश्रम धर्मकर्माचें स्वतः चोख आचरण ठेवून अद्वितीय परमात्म्याचें आनंद घन स्वरूप एक आहे अशी आस्तिक्यबुद्धि स्वतः बाळगून तिला दुसऱ्याच्या ठिकाण रुजू करणे; परमात्म्याच्याच कृपने इहपरसुखाची साधने लाभतात हा विश्वास बाळगणे व इतरांतून त्याचा पूर्ण प्रसार करणे; परमात्मप्रीत्यर्थं

देवपितृकार्ये करणे व करविणें; श्रुतिस्मृतिपुराणोक्त कर्माचे अनुष्ठान करणे करविणें; ऐहिक पारलौकिक विषयसुखांत त्याज्यवुद्धि बाळगून यांच्या ठिकाणीहि उत्पन्न करणे; कर्मभक्तिज्ञानयोगांनी परमात्मैक्य संपादण्याची प्रवृत्ति आपल्यांत ठेवून, ती दुसऱ्यांतहि निर्माण करणें; वेद, स्मृति, पुराणग्रंथ हे अखिल विश्वाचेच धर्मग्रंथ आहेत, असे निश्चित करणें व करविणे; कर्तृत्व भोक्तवादि अहंकाराने जन्म येतो व त्याच्या राहिल्याने मोक्ष मिळतो ही भावना आपल्यांत दृढमूल करून घेऊन दुसऱ्यांच्या हृदयांतहि त्यांच्या मुळ्या खोलवर रुजतील असे करणे; वेदविहित प्रवृत्ति-निवृत्तिमार्गात त्या त्या अधिकारी जनांना ठेवणेच ठेवावयाला लावणे; आदर्शात्मक साऱ्याच परिशुद्ध आचरणा तत्त्वग्राही वैदिक, उपदेशाने जगदुद्धाराची दृष्टि ठेवून बागणे व बागावयास लावणे; ही इत्यादि अशी आर्यांची कार्ये होत. हीच आर्याची लक्षणेंहि पण होत. आर्य संस्कृतींचें थोडक्यांत लक्षणहि पण असेच आहे. वैदिक धर्माची ठोकळ तत्वे तीं ह्रींच. हीच विश्वोत्कर्षाची, विश्वोद्धाराचीं उच्चतम सिद्धान्तरलें!

home-last-sec-img