Literature

भाद्रपद वद्य अमावस्या

उत्पन्न होऊन नाहीसा होणारा आनंद कोणाला सुख देऊ शकेल ? नष्ट होणारे सर्व काही दु:खास
कारणीभूत असते म्हणजेच नष्ट होणाऱ्या सुखाचा विरह दु:खच निर्माण करील की नाही ? असा आनंद नष्ट
झाल्यावर तेथे काय रहाणार ? दु:खच ! अशा प्रकारच्या आनंदाचे, आनंदाच्या प्राप्तीचे पर्यवसान दु:खातच
झाल्यास आनंदापासून दु:खच प्राप्त झाले असे ठरून ते संयुक्तिक होणार नाही. कारण दु:खाच्या
निवृत्तिकरतांच आनंदाची प्राप्ती, असे असल्यामुळे त्या आनंदापासून दु:ख होणार नाही तर दु:खाची
निवृत्तिच होईल. दु:खाची निवृत्ती आनंदाच्या प्राप्तीनेच होत असते. आनंद म्हणजे दु:ख असे कोणीही म्हणू
शकणार नाही आणि जर कोणी असे म्हणालाच तर ते कोणीही कबूल करणार नाही. आनंद म्हणजे दु:ख
नव्हे. दु:खरहित असणाराच आनंद होय. दु:खाची अत्यंतिक निवृत्ती करणारा जेथे थोडेही दु:ख नसणारा,
शाश्वत असणारा आनंद उत्पन्न करणारा असा हा आनंद आहे असे आपण गृहीत धरले तर जगात उत्पन्न
होणारे पदार्थच त्याने भरलेले असून त्या सर्वांना उत्पन्न करणारा कोणीतरी असलाच पाहिजे ना ? उत्पत्ती ,
जन्म, म्हटले की ते कोणापासून तरी जन्म पावलेले , उत्पन्न झालेले असते, ते जन्मलेले असते असाच त्याचा
अर्थ नाही का? उत्पन्न झालेले हे जग कोणापासून तरी निर्माण झालेले आहे असे म्हटल्यानंतर त्या
निर्माणकर्त्याला उत्पत्ती नसणार !!

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img