Literature

भाद्रपद वद्य अष्टमी

आनंद म्हणजे ब्रह्म. परब्रह्माची प्राप्ती म्हणजेच आनंदाची प्राप्ती. हाच सिध्दांत सांगावयास श्रुति प्रवृत्त
झाली आहे. त्यासाठी तात्विक उपदेश म्हणून तिचे असे सांगणे आहे की, ' हे सारे विश्व आनंदरूप आहे. ' या
जगात आनंदाशिवाय खरोखरच दुसरी वस्तूच नाही, ही वस्तुस्थिती आहे. आपण याची खरोखरच प्रचिती
घेतली तर हे जग म्हणजे एक आनंदाचा गाभा आहे. हे जग म्हणजे आनंदरूपच, असा जेव्हा अनुभव येईल
तेव्हाच ' तत्वसाक्षात्कार ' झाला असे होईल. आनंद हेच आपले खरे स्वरूप, आनंद हेच जगाचे रूप हे तत्व
अनुभवणे म्हणजेच ' तत्वसाक्षात्कार ' आनंद हेच परमात्म्याचे खरे स्वरूप. तेथे दु:ख, शोक, विकार हे काही
सुध्दा नाहीत. *' आनंन्देन खल्विमानि भूतानि जायन्ते | '* हे जग आनंदानेच उत्पन्न झाले असे तयाचे स्वरूप.
आनंद हेच त्याचे स्वरूप. आनंद हेच जीवन आहे. आनंदासाठीच प्रयत्न करून, आनंदासाठी जगून आनंदरूप
होऊन रहावे, आपला देहही आनंदरूपच म्हणून रहावे, समजून न समजताच आनंदासाठीच प्रयत्न करून
आनंदरूप होऊन रहावे हीच मुक्तता.

आनंदामुळे जे उत्पन्न झाले, आनंदामुळे जगत आहे, त्याच्याकडेच ज्याची धाव आहे व ज्याच्यामुळेच
ज्याच्यातील जीव शांत होतात, आनंदरूप होतात तेच हे जग, असे श्रुति म्हणते.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img