Literature

भाद्रपद शुद्ध दशमी

पिपीलिका, विहंगम असे प्रवृत्ति-निवअत्त्यात्मक मोक्षाचे दोन वैदिक मार्ग आहेत. प्रवृत्तिमार्ग अनेक मोहक
वस्तूनी नटलेल्या अशा प्रपंचप्रवर्तक परमेश्वराच्या संसार नावाच्या राजधानीतून गेलेला असल्यामुळे हा
अनेक ऐहिक सुखसोयींनी युक्त असा, जनसामान्यांना जाण्यास सोयीस्कर होणारा मोठा थोरला राजमार्ग

आहे. यातून मुक्तिक्षेत्रास पोहोचण्यासाठी वाटचाल करणाऱ्यास मध्येच गुरफटून टाकणाऱ्या अनेक
नात्यातील विभिन्न शररीराच्या व विविध मोहक पदार्थाच्या आकर्षणातून रमतगमत जावे लागत असल्यामुळे
बराच दीर्घकाल लागतो. त्यामुळे त्या प्रवृत्तीमार्गाला ' पिपीलिका मार्ग ' अशी संज्ञा आहे. या मार्गातील
जीवांचा चालून जाण्याचा वेग पिपीलिका म्हणजे मुंगीसारखा असतो.

देव, पितृ, ऋषी यांचे ऋण फेडून गृहस्थाला पुढे मोक्षमार्गाचे प्रत्यक्ष अवलंबन करण्यास मोकळीक असते. '

ऋणत्रयमुपाकृत्य मनो मोक्षे निवेशयेत् | ' अशी गृहस्थांना धर्मशास्त्राची आज्ञा आहे. विधियुक्त
विषयोभोगांच्या मार्गातून सत्कर्म, सदुपासना, गुरूसेवा, ज्ञानविचार इत्यादिकांनी विरक्तीचे ध्येय गाठून अंती
गुरूकृपेने मोक्ष मिळविण्याचा आहे म्हणजेच प्रवत्तिमार्ग. दानधर्म, भूतदया हे गृहस्थाश्रमाचे घटकावयव होत. '

प्रपंची असोन परमार्थ पाहे | तोहि ये स्थितीते लाहे | प्रारब्धयोगे राहे | लोकामध्ये || ' जगदीशशपरता लाभ
नाहीं | कार्याकारण सर्व कांही | संसार करीत असतांही | समाधान राहे || ' हे श्रीसमर्थांचे मार्गदर्शन
डोळ्यासमोर ठेवून कृतकृत्य व्हा !!

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img