Literature

भाद्रपद शुद्ध नवमी

महात्म्यांना स्वतःसाठी कशाचीहि आवश्यकता नसते. त्यांची तपस्या जनहितासाठीच असते. दुराचारी
लोकांचा संपूर्ण नाश करून सत्कर्मप्रवृत्त लोकांचे रक्षण करण्यासाठीच त्यांचे जीवन असते. अधर्मप्रवृत्ती नष्ट
करून धर्ममार्गाप्रमाणें वागणाऱ्या लोकांना सहाय्य करणे हेच त्यांच्या तपाचे कारण. आपला प्रत्येक क्षण
जगदोध्दारासाठीच ते खर्च करीत असतात. ज्ञानी व महात्मे यांना स्वतःसाठी तपस्येचे मुळीच प्रयोजन नसले
तरी जगदोध्दारासाठी त्याची अत्यंत आवश्यकता असते.

ज्ञानी कशाची इच्छा धरून तप करतो ? ज्यांना आत्मानंद प्राप्त झाला आहे, ज्यांनी ' ज्ञानी ' ही पदवी प्राप्त
केली आहे अशांना नवीन असे काय मिळवायचे आहे ? शहाळ्यातील पाणी पिऊन आपण ज्याप्रमाणे
करवंटी फेकून देतो त्याप्रमाणे आनंदाचा अनुभव घेऊन निःसार अशा जगाचा ते तिरस्कार करतात व
जगातील वासना, नाम, रूप वगैरे करवंटीप्रमाणेच फेकून देतात. आत्मानंदप्राप्तीनंतर जगाची मुळीच गरज
नाही. अशावेळी जग निःसार भासते. महात्म्यांच्या आनंदाला पारावार नसतो. त्या आनंदाला कोणतीही
उपमा देता येत नाही. त्याचे वर्णन शब्दांनी करणे अशक्य आहे. असे असूनही इतरांचे कष्ट पाहून संतमहंताना
अपार दुःख होते. कशासाठी हे दुःख होते ? जनहितासाठीच की नाही !!

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img