Literature

भाद्रपद शुद्ध षष्ठी

आपण आपले दोष झाकण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते इतरांच्या नजरेस आल्याशिवाय रहात
नाहीत, आपण ते कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी निसर्गशक्तीही तुमच्या यथार्थ योग्यतेचे मुल्यमापन
करून त्याप्रमाणे फल देते. कदाचित लोक तोंडाने बोलत नसले तरी आपल्या वागणुकीने ते उघड होत
असते, त्यामुळे पुण्यक्षय होतो व दांभिकपणा, खोटेनाटे हे सर्वकाही उघडकीस येते. तेज, तपःशक्ती
असल्यास तीही नष्ट होते. म्हणूनच मन ताळ्यावर आणण्यासाठी आपले दोष आपण जाणून घेऊन
दुसऱ्यास सांगणे ही मोठीच साधना होय. आपला कोणताही दोष चारचौघांत सांगितल्याने पाप नष्ट होते
असे म्हणतात.

स्रियांनीही सर्व प्रकारच्या प्रायश्चित्ताच्या वेळी आपण केलेले सर्व अपराध उघडपणे सांगितले पाहिजेत.
त्यामुळे त्यांचे पाप नष्ट होते ही गोष्ट खोटी नाही. मी माझ्या लहानपणी असेच एक उदाहरण पाहिले आहे.
एका यज्ञाच्या वेळी कितीही प्रयत्न करून अरणी प्रज्वलित होईना, त्यावेळी यजमानपत्नीकडून कांही चूक
झाली की काय ? याबद्दल विचारणा करून तेथे उपस्थित असलेल्या ब्रह्मवृंदाने या गोष्टीचा छडा लावल्यावर
तिने आपली चुक कबुल केली व चुक कबुल करतांच अरणींत अग्नि उत्पन्न झाला. म्हणूनच मन
जिंकण्यासाठी आपल्या मनाची खरी स्थिती सांगितली पाहिजे.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img