Literature

मनोबोध

“जयाचेनि नामें महादोष जाती । जयाचेनि नामें गती पाविजेती । जयाचेनि नामें घडे पुण्यठेवा। प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ७१ ॥ज्ञ

बहूनाम या रामनामी तुळेना । अभाग्या नरा पामरा हे कळेना । विषा औषध घेतलें पार्वतीरों । जिवा मानवा किंकरा कोण पूसे ॥ ८२ ॥ जेणे जाळिला काम तो राम ध्यातो । उमेशी अती आदरें गूण गातो । बहू ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथें । परी अंतरीं नाम विश्वास तेथें ॥ ८३ ॥ मुखीं राम विश्राम तेयोच आहे । सदानंद आनंद सेऊनि राहे । तयावीण तो शीण संदेहकारी । निजधाम हें नाम शोकापहारी ॥ ८६ || मुख राम त्या काम बाधूं शकेना । गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना। हरीभक्त तो शक्त कामासी मारी। जगीं धन्य तो मारुती ब्रह्मचारी ॥ ८७ ॥ बहू चांगले नाम या राघवाचे । अती साजिरें स्वल्प सोपें फुकाचें। करी मूळ निर्मूळ घेतां भवाचें । जिवा मानवा हेंचि कैवल्य साचें ॥ ८८ ॥ हरीनाम नेमस्त पाषाण तारी। बहू तारिले मानवदेहधारी तथा रामनामी सदा जो विकल्पी । वदेना कदा जीव तो पापरूपी ॥ ९८ ॥ जगीं धन्य वाराणशी पुण्यराशी । तयेमाजी जातां गती पूर्वजांसी । मुर्खे रामनामावळी नित्यकाळीं । जिवा हीत सांगे सदा चंद्रमौळी ॥ ९९ ॥ हरीकीर्तनें प्रीति रामी धरावी । देहेबुद्धि निरूपणे वीसरावी । परद्रव्य आणीक कांता परावी । यदर्थी मना सांडि जीवीं करावी ॥ १०३ ।।

home-last-sec-img