श्रीसमर्थावताराच्या पुर्वकाली अखिल भारतीय जनतेचे जीवन चिंतेने व भयाने व्यथित झाले होते. केव्हा कोणते संकट ओढवले जाईल हे सांगणे कठीण होते. विहिरीवर पाणी आणावयास गेलेली स्त्री-पाणी घेऊन घरी येईल किंवा नाही याचा भरवसा नव्हता. तसेच कामासाठी घराबाहेर गेलेला तरूण घरी परत येईलच याची खात्री देणे शक्य नव्हते. मोठमोठ्या श्रीमंतांना आपली संपत्ती केव्हा लुटली जाईल हेही सांगणे कठीण होते. कोणतेही धार्मिक कृत्य व विवाहादी मंगलसमारंभ निर्विघ्नपणे पार पडणे महाकठीण झाले होते. सकाळी दर्शन घेतलेली देवतामूर्ती पुन्हा त्याठिकाणी असेलच याचीही खात्री नव्हती. अशा भयानक परिस्थितीत अविवेकी व मूर्ख यवनांच्या दुष्कृत्यांनी भारतीय जनता भयग्रस्त होती. आपण आपल्या या राक्षसी कृत्यांनी सर्वांना नमवू, वाकवू शकू अशी घमेंड बाळगणाऱ्या यवनांना वठणीवर आणण्यासाठी अति सामर्थ्यवान, बलिष्ट अशा श्रीसमर्थांसारख्या अवताराचीच आवश्यकता होती.
यवनांनी केलेल्या राक्षसी व कृष्णकृत्यांनी *’ त्राहिभगवान ‘* झालेल्या भारतदेशातील भीती, अंधःकार, दुर्बलता समूल नाहीशी, नष्ट करण्यासाठी सामर्थ्यवान व्यक्ती कोणती ? अशी देवसभेत चर्चा चालू असता श्रीमारूतीरायच या कार्यास योग्य आहेत असे ठरून त्यांना भूतलावर अवतार घेण्यासाठी पाठविले गेले तेच श्रीसमर्थ रामदास होत.
*श्रीसद्गुरू समर्थ रामदासस्वामी महाराज की जय !*
*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*