Literature

माघ वद्य चतुर्दशी

श्रीगुरू किती मोठे आहेत ? समुद्राएवढे मोठे आहेत काय ? असे जर विचारले तर त्याचे उत्तर ‘ नाही ‘ हेच येईल. ते आकाशाएवढे आहेत काय ? त्याचेही उत्तर तेच. श्रीगुरू आकाशाएवढे मोठे आहेत, आकाशासारखे सर्वव्यापी व नित्यही आहेत. पण हे दृष्टांत योग्य नाहीत. गुरू आकाशाप्रमाणे आहेत असे म्हटले तर काय बिघडेल ? ‘ नित्य ‘ या विशेषणामुळे ते आकाशापेक्षा श्रेष्ठ ठरतात. आकाश अनित्य आहे. *’ आत्मनः आकाशः सम्भूतः | ‘* आत्म्यापासून आकाशाची उत्पत्ती आहे व उत्पन्न होणारी वस्तु नाशिवंत. म्हणजेच आकाशही नाशवंतच. नाश पावणारी, नासणारी, विकारी अशी वस्तु,क्षुल्लक होय. ज्यात चारही लोक सामावले असेल व जे आपल्या स्वस्वरूपातच रहात असले तरी ते निर्मित असल्याने नाशवंतच होय. नाश होणारी वस्तु श्रेष्ठ असूच शकत नाही. वस्तुनिर्माता श्रेष्ठ असतो, निर्मितवस्तु श्रेष्ठ नव्हे. गुरूस आकाशाची उपमा दिली तर ते अनित्य असल्याने ती उपमा शोभुन दिसत नाही.

श्रीमत् दासबोधाच्या पहिल्या दशकाच्या चवथ्या समासामध्ये *’ सद्गुरू कोणत्याही उपमेपेक्षा श्रेष्ठ आहेत म्हणजेच अनुपमेय आहेत ‘* असे सद्गुरूंचे श्रीसमर्थांनी रसभरित वर्णन केले आहे.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img