Literature

माघ वद्य द्वादशी

आपणांस इतर सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष्य करता येईल किंवा इतर सर्व सोडून देता येईल. पण आत्मोध्दार मात्र टाळता येत नाही जोपर्यंत इंद्रिय कार्यक्षम आहेत, देह सुदृढ आहे. विचारशक्ती शाबूत आहे. कार्यक्षमता आहे तोपर्यंतच आत्मोध्दारासाठी झटणे हे मानवाचे कर्तव्य होय
.
आपल्या जीवनाचे मुख्य ध्येय आत्मोध्दारच होय असे असतांना ‘ माझे विशिष्ट वय होऊ दे ‘ असे म्हणण्यात काहीच अर्थ नाही. गेलेले आयुष्य फुकटच गेलेले असते. म्हातारपणी कोणतीच गोष्ट होत नाही. कारण त्यावेळी विषयात एकसारखे गुंतून राहिल्यामुळे व तापत्रयरूपी त्रासाने जडत्व आल्याने अंतःकरण दुर्बळ झालेले असते. ही अवस्था आत्मोध्दारासाठी योग्य नाही. पण एखाद्यास म्हातारपणीच आत्भोध्दाराची स्फूर्ती आली तर त्याचीही प्रगती होते. परंतु आत्मोध्दारासाठीच हा मानवी जन्म असल्याने शरीर आणि मन यांची वाढ होत असतांनाच म्हणजे तारूण्यातच आत्म्यांच्या विचाराचा व आत्मोध्दाराचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. परम भगवद़्भक्त व महाज्ञानी प्रल्हादाने आपल्या सवंगड्यांना हीच गोष्ट सांगितले होती.

*’ पूर्वे वयसि यः शान्तः स शान्त इति कथ्यते | ‘* उत्तम शांति प्राप्त करून घेण्याची वेळ म्हणजे बाल्यावस्थाच होय.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img