Literature

माघ वद्य षष्ठी

*’ पृथ्वी तस्य प्रमावाद्वहति दिननिशं यौवने यो हि शान्तः | ‘*

भर यौवनावस्थेमध्ये विरक्त झालेल्या पुरुष श्रेष्ठांच्या पुण्यानेच पृथ्वी सर्व प्राण्यांना धारण करते असा या श्लोकपदाचा अर्थ होय. मोहाचे जाळे पसरीत स्ववश करून घेण्यासाठी हातात माळ घेऊन पुढे उभ्या राहिलेल्या मूर्तिमंत मायेच्या गुरफटून टाकणाऱ्या मोहजालांचे आवरण ताडकन पार झुगारून देऊन श्रीसमर्थांनी आपल्या केवळ बारा वर्षाच्या वयातच लग्नाच्या मंडपातून, लग्नातून पाय काढला. आपल्या ह्रदयाची साक्ष पटविली. आपली योग्यता जगाच्या निदर्शनास आणून दिली आणि पारमार्थिक उच्चतम संदेशाबरोबरच व्यक्ति-प्रपंचाने राष्ट्रप्रपंचाचा संकोच होत असल्यामुळे राष्ट्रप्रपंचासाठी व्यक्तिप्रपंचाचा त्यागच आवश्यक असतो हे तत्त्वही आपल्या जीवनात प्रगट केले. अल्पवयातच विरक्त झालेल्या व व्यक्तिप्रपंच त्यागून प्रकट केले. अल्पवयातच विरक्त झालेल्या व व्यक्तिप्रपंच त्यागुन राष्ट्रप्रपंच साधलेल्या श्रीमद्शंकरभगत्पादादिकांची अनेक उदाहरणे आहेत. पण आपल्या मोहजालांत अडकविण्याची प्रतिज्ञा करून पुढे उभ्या ठाकलेल्या मायारूप वधुच्या पाशातून, लग्न समारंभातुन त्यातुनही अंतर्पाटाच्या वेळी आपले विरक्त ह्रदय कसाला लावून पहाण्याचे उदाहरण मात्र आजपर्यंतच्या इतिहासात फक्त एकमेव असे श्रीसमर्थाचेच होय. *’ वैराग्य हे भाग्य आमुच्या समर्थ स्वामींचे | तेणे करतां तारक झालें भक्तिज्ञानाचें | ‘* असे गिरधारस्वामी म्हणतात.

श्रीसद्गुरू समर्थ रामदास स्वामी महाराज की जय !

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img