Literature

माघ शुद्ध अष्टमी

*आदो स्ववर्णाश्रमवर्णिताः क्रियाः |*
*कृत्वा समासादित शुद्ध मानसः ||*
*समाप्य तत्पूर्वमुपात्तसाधनः |*
*समाश्रयेत्सदगुरूमात्मलब्धये ||* ( रामगीता )

प्रथम आपल्या वर्णाश्रमात सांगितलेली सर्व कर्मे, कर्तव्ये योग्यप्रकारे पालन करून, त्याद्वारे चित्तशुध्दी करून घेऊन साधन चतुष्ट्य संपन्न होऊन आत्मसाक्षात्कारासाठी ब्रह्मनिष्ठ अशा सद्गुरूस शरण गेले पाहिजे.

वर्णाश्रमधर्माचे पालन करीत असता स्वतःचा स्वार्थ, परस्त्रीगमन, परद्रव्यापहरण हे सर्व विषाप्रमाणे अत्यंत त्याज्य आहेत अशी दृष्टी असली पाहिजे. परस्त्रीगमनामुळे तीनशे वर्ष आयुष्य असणारी पिशाच्चयोनि प्राप्त होते अथवा तो तपस्वी असल्यास एक हजार वर्षे ब्रह्मराक्षस होतो. परद्रव्यापहाराने एक हजार वर्षाचे आयुष्य असलेल्या सर्पयोनित तो जन्म घेतो.

मानवी जन्म प्राप्त झालेल्यास वैराग्यसंपन्न होऊन अत्युन्नत अशी अवस्था प्राप्त करून घेणे शक्य असते, वैराग्यपंथात, निवृत्तीमार्गात पुढे पुढे जाऊन मुक्ती प्राप्त करून घेणे शक्य आहे. त्याचप्रमाणे वर्णाश्रमधर्मपालनपर प्रवृत्तीमार्गातही आपला उध्दार करून घेता येणे शक्य आहे.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img