Literature

माघ शुद्ध चतुर्थी

आपले मन ताब्यात न आणता कह्यात न ठेवतां, मानेल तसे भटकण्यास त्याला मोकळीक दिली तर ते बेलगाम होईल. केवळ असुखी व असमाधानीपणाने ते आपले आयुष्य घालवतील आणि विषयसुखभिलाषी अशा सुखोपभोगानी त्यांना कधीही तृप्ती मिळणार नाही.

अग्नीत आहुती अर्पण केल्यावर तो अधिक प्रज्वलीत होतो. तशी उपभोगामुळे विषयवासना कमी न होता वाढतच जाते. असे होता होताच तो मनुष्य एके दिवशी मृत्युमूखी पडतो. मृत्युमूखी जात असतांनाही त्याची विषयकामना कमी होत नाही. त्यामुळे या शेष दोषामुळे तो पुन्हा जन्माला येतो व अशारितीने तो जन्ममरणाच्या फेऱ्यात चकरा मारीत रहातो.

*’ यत्तु चञ्चलताहीनं तन्मनो मृतमुच्यते | ‘* विषयवासनेतून उद्भवणारे चांचल्य नाहीसे करून आत्मसुखानुभवाने उत्पन्न होणारी निश्चलता ज्या मनाला प्राप्त होते ते मन मृत होय. ज्ञानी या नश्वर जगतांत व विषयीजनाच्या सहवासात असलातरी तो स्वतः कमलदलावरील जलबिंदुप्रमाणे निर्लेप रहाते, हे निवृत्तिमार्गात दृढता प्राप्त झालेल्या विरक्तांचे लक्षण आहे. *’ सुख-दुःखे समकृत्वा ‘* या म्हणीप्रमाणे तो सुखात किंवा दुःखात आस्था किंवा अनास्था दाखवितो.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img