Literature

माघ शुद्ध पौर्णिमा

‘संकटकाली व्यंकटरमण ‘ असे आपण संकट येते तेव्हा म्हणतो व नंतर ते विसरूनही जातो. पतिपत्नीचे प्रेम, मुलावरील माया याप्रमाणेच सर्व गोष्टी परमात्मनिष्ठेने केल्यास मानव हा खरोखरच देवतास्वरूप होईल.

‘ जीवनामध्ये सुख नसून ते दुःखमय आहे हे समजून उमजूनही दुःखगर्तेत गुरफटणाऱ्या मला मुक्त कर ‘ अशी प्रार्थना वेदामधून ऋषीमुनींनी केली आहे.

‘ या सृष्टीतील नाशिवंत अशा वस्तुंत अविनाशी असलेल्या परमात्मस्वरूपास पाहू शकणाराच योग्य दृष्टी असलेला मानव होय व अशा दृष्टीनेच मानवजन्माची सार्थकता होते असे उपनिषदामध्ये म्हटले आहे. पण आपण त्याकडे मुळीच लक्ष्य देत नाही. ‘

*यथा सुनिपुणः कश्चित्परदोषेक्षणे रतः |*

*तथाचेत्सवीयदोषेषु को न मुच्येत बन्धनात् ||*

‘ दुसऱ्याचे दोष शोधुन काढण्यासाठी आपण जितकी बुध्दी खर्च करतो तेवढी बुध्दी आपले स्वतःचे दोष शोधण्यासाठी खर्च केल्यास तो दुःखदौर्बल्यादि बंधनापासून मुक्त होईल असे उपनिषद सांगते. आपले दोष आपल्याला दिसत नाहीत व समजतही नाहीत. पण दुसऱ्याचे दोष मात्र अचूकपणे शोधले जातात. आपले दोष जो जाणतो तोच विवेकी होय.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img