Literature

माघ शुद्ध सप्तमी

ज्याच्या त्याच्या भुमिकानुसार प्रवृत्तिमार्ग किंवा निवृत्तीमार्ग हे साधनानुकूल असतात. प्रत्येकाला आपापल्या अधिकाराप्रमाणे ते साधनरूप होतात. प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही एकमेकांपासून दूर आहेत. हे दोन्ही जो साधतो तोच धैर्यवान होय.

जगामधील सर्व कर्मे वगळून आत्मनिष्ठ होऊन कामक्रोधादींच्या आहारी न जाता मोक्ष साधण्याची इच्छा बाळगणे म्हणजेच निवृत्तीमार्ग होय.

संसारात राहून, मनावर जय मिळवुन, कामक्रोधादींना काबुत ठेवून वर्णाश्रमधर्म शास्त्रोक्त पध्दतीने आचरीत, उपासना मार्गात पुढे पुढे गेल्यास जे ज्ञान साध्य होते ते साधण्यासाठी प्रयत्न करणे हाच प्रवृत्तीमार्ग होय.

*’ ऋणत्रयमुपाकृत्य मनो मोक्षे निवेशयेत् | ‘* मानवजन्म मिळवुनही आवश्यक असणारी विरक्ती नसल्यास जन्म सार्थकतेसाठी प्रथम ऋणत्रयातून मुक्त होणे आवश्यक आहे. ती तीन ऋणें म्हणजे देवऋण, पितृऋण व ऋषीऋण. यज्ञ यागादींच्या योगाने देवऋणाचा परिहार होतो, सत्संगतीने पितृऋण समाप्त होते व वेदपठण, जपतपादींनी ऋषीऋण पूर्ण होते. ब्रह्मचर्याश्रमाचे विधियुक्तमार्गाने पालन करून नंतर गृहस्थाश्रमी होऊन एक दोन सुपुत्र झाल्यानंतर वैराग्यमार्गाकडे जाणे शक्य असते.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img