Literature

मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी

*’ न देवानां प्रतिव्रतं शतात्मा च न जीवति | ‘*

देवतांचे नियमांचे उल्लंघन केल्यास कोणीही शंभर वर्षे जिवंत राहू शकत नाही. विश्वनियामक भगवान प्रसन्न झाल्यावर तो अत्यंतच उदार असल्याने न मागताच सर्व सुख देत असतो. मग त्या भक्तवत्सल, भक्तकामल्पद्रुम, सर्वेश्वर आणि सर्वज्ञ परमात्म्यापाशी मागण्याची काय आवश्यकता आहे ? निष्काम कर्म करणेच भगवंताला यथार्थरूपात जाणणे आणि त्याची प्रेमाने सेवा करणे होय.

पैशासाठी सावकाराची स्तुती केली जाते. तितक्याच आदराने परमात्म्याची अनन्यस्तुती केली तर सर्व प्रकारच्या बंधनातून कोण मुक्त होणार नाही ? याचनाच करावयाची तर ती परमेश्वराकडेच करावी. यथार्थ विचार केला तर मागणे हा सुध्दा परमात्म्याचा संकल्प पूर्ण करणे होय.
हे जे सर्वकाही आहे ते परमात्म्याचेच आहे व तो आपले काम आपल्याच कर्माद्वारे चालवित असतो. आपल्या देहाचेही पोषण तोच करतो. तो एकमेव सर्वत्र व्यापक आहे या परमार्थीक दृष्टीने स्व:परसुखासाठी, जीवनासाठी, फलाशाविरहित कर्म करणे हेही निष्काम कर्म होय.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img