Literature

मार्गशीर्ष वद्य तृतीया

अज्ञानाच्या योगाने मनुष्यास भ्रम उत्पन्न झाल्याने विषयसुखच आपल्या जीवनाचा आधार असे वाटते. ज्या प्रमाणामध्ये विवेक वृध्दिंगत होईल त्या प्रमाणांत विषयसुखवासना कमी कमी होणे शक्य आहे. पण विवेकरूपी झरा सापडण्यापूर्वीच जर मानव पतीत झाला तर त्याला कोणाचा आधार मिळणार ? या प्रश्नाचे उत्तर ‘ धर्म ‘ हेच आहे. पूर्ण विवेकी बनण्यासाठी धर्मप्रवचनांची आवश्यकता आहे. जे कोणाचेही मत्सर करत नाहीत, ज्यांना लेशमात्रही विषयेच्छा नाही, ज्यांच्या ह्रदयात रागद्वेषाचा संपर्कही नाही अशा मनुष्यांना परमात्मसुख मिळू शकते. ज्यांना परमात्मसुख प्राप्त झाले आहे त्यांच्याकडून धर्माचे यथार्थस्वरूप तुम्हास कळू शकेल. अविनाशी अशा सत्याला योग्य असा मार्ग सनातन धर्माने सांगितला आहे. या धर्माचा आश्रय घेऊन क्षणोक्षणी परमात्म्याच्या ध्यानांत मग्न होणे हे आपले जीवन रहस्य होय.

आज आपल्या देशात परकीय संस्कृतीचा ‘ उदो उदो ‘ चालला आहे. पाश्चिमात्य संस्कृतीच्या भपक्याने भुललेली मनुष्ये ‘ ती संस्कृती चांगली आहे ‘ असे समजून बिनदिक्कतपणे तिचा पुरस्कार करीत असलेली आढळतात. हल्लीचे राजकीय वातावरणात, शिक्षण पध्दती,ही या गोष्टींना प्रोत्साहन देत आहेत असे दिसून येते ही अत्यंत वाईट गोष्ट आहे.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img