Literature

मूर्खलक्षण

जन्मला जयांचे उदरीं । तयांसी जो विरोध करी । सखी मानिली अंतुरी । तो एक मूर्ख || २|११८. सांडून सर्वहि गोत। स्त्री आधेन जीवित । सांगे अंतरींची मात । तो एक मूर्ख ॥ ९॥ परस्त्रीसी प्रेमा धरी । शुरगृहीं वास करी। कुळेविण कन्या वरी। तो एक मूर्ख ॥ १० ॥ धरून परावी आस । प्रेत्न सांडी सावकाश | निसुगाईचा संतोष । मानौ तो एक मूर्ख ॥ १७ ॥ एकाएकी एकसरा झाला विषयीं निलाजरा | मर्यादा सांडून सैरा। वर्ते तो एक मूर्ख ||२१|| नीच यातीसी सांगात । परांगनेसी एकांत । मागें जाय खात खात । तो एक मूर्ख ||२२|| स्वये नेणें परोपकार । उपकाराचा अनुपकार । करी थोडें बोले फार । तो एक मूर्ख ॥ ३० ॥ विद्या वैभव ना धन | पुरुषार्थ सामर्थ्य ना मान । कोरडाच बाहे अभिमान | तो एक मूर्ख ॥ ३२ ॥ जिवलगांस परम वेदी।। सुखाचा शब्द तोहि नेदी । नीच जनांस बंदी । तो एक मूर्ख ॥ ३८॥ पुत्र कळ आणि दारा । इतुकाचि मानुनिया थारा विसरोनि गेला ईश्वरा । तो एक मूर्ख ॥ ४० ॥ जैसे जैसे करावें । तैसे तैसे पावावें । हें जयास नेणवे । तो एक मूर्ख ॥ ४१ ॥ देवद्रोही गुरुद्रोही मातृद्रोही पितृद्रोही । ब्रह्मद्रोही स्वामीद्रोही । तो एक मूर्ख ॥ १४ ॥ परपीडेचें मानी सुख । परसंतोषाचे मानी दुःख । गेले वस्तूचा करी शोक | तो एक मूर्ख ||१५|| आदरेंविण बोलणें । न पुसतां साक्ष देणें । निंद्य वस्तु अंगिकारणें । तो एक मूर्ख ॥ ४६ ॥ तुक तोडून बोले । मार्ग सांडून चाले । कुकर्मी मित्र केले । तो एक मूर्ख ॥ ४७ ॥ तस्करासी ओळखी सांगे। देखिली वस्तु तेचि मागे । आपलें अन्हींत करी रागें । तो एक मूर्ख ॥ ५१ ॥ सांडुनिया जगदीशा । मनुष्याचा मानी भसा सार्वण वेंची वयसा । तो एक मूर्ख ॥ ५४ ॥ अनीतीनें द्रव्य जोडी । धर्म नीती न्याय सोडी । संगतीचें मनुष्य तोडी । तो एक मूर्ख ॥ ५९ ॥ लक्ष्मी आलियावरी । जो ओळखीं न धरीं । देवीं ब्राह्मण सत्ता करी । तो एक मूर्ख ॥ ६८ ॥ आपुलें काज होये तोंवरी । बहुसाल नम्रता धरी । पुढिलांचे कार्य न करी । तो एक मूर्ख ॥ ६९ ॥

home-last-sec-img