Literature

यज्ञाचे महत्त्व

यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् । 

ते हनाकं महिमानः सचन्ते यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ॥

– परमात्म्याची सेवा या दृष्टीनें भक्तिपुरःसर स्वस्वधर्मोचित यज्ञ करून त्या यज्ञाच्या बळानें पूर्वजांनी स्वर्गाची प्राप्ति करून घेतली व तिथलें वैभव अनुभविलें. ज्या देवत्वाकरितां अनुष्ठान केले ते देव ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी जाऊन तेहि आपापल्या अनुष्ठित कर्माच्या तारतम्यानें ते ते देव आले. इतका महिमा संपादन केला. अमुक यज्ञ अशा इतक्या वेळां केला म्हणजे त्याला अमुक पदाची प्राप्ति होते असे धर्म, पूर्वीच वेदांनी सांगितले आहेत. शंभर अश्वमेध यज्ञ केले, तर प्रत्यक्ष तो इंद्रच होतो, हें सर्वांनाहि ऐकून माहीत आहे. स्वर्गाची इच्छा असणाऱ्यानें ज्योतिष्टोम नांवाचा यज्ञ करावा अशा अर्थाचें “ स्वर्गकामो ज्योतिष्टोमेन यजेत ” असें एक श्रुति वाक्य आहे, द्रव्ययज्ञ व ज्ञानयज्ञ असे यज्ञांत दोन प्रकार आहेत. द्रव्ययज्ञा दिव्य भोगाच्या स्वर्गादिलोकांची प्राप्ति होते व ज्ञानयज्ञानें मोक्षाची प्राप्ति होते. लोकांतरप्राप्तीची व दिव्य भोगांची इच्छा न बाळगतां निष्कामा यज्ञानुष्ठान केल्यास तें चित्तशुद्धीस म्हणजे वासनाक्षयास कारण होऊन तें क्रमानें ज्ञानद्वारां मोक्षास कारणीभूत होतें.


यज्ञेना हि देवा दिवंगता यज्ञेनासुरानुपानुदन्त यज्ञेन द्विषन्तो मित्रा भवन्ति यज्ञे सर्व प्रतिष्ठितं तस्माद्यज्ञं परमं वदन्ति
॥ ( म. ना. उ. ७९) – यज्ञाच्या योगानेंच मनुष्य देवरूप होऊन स्वर्गास गेले. देवांनी यज्ञाच्या बलानेंच असुरांचा नाश केला. यज्ञानें शत्रु असणारे देखील मित्र होतात. या यज्ञानेंच देव जगाचे अधिकारी झाले. यज्ञरूप सत्कर्मानेंच सुख लाभतें, दुःख नष्ट होतें व दुष्टांचा संहार होतो. त्यामुळे यज्ञ श्रेष्ठ म्हणून सांगतात. काम्य यज्ञानें स्वर्ग, निष्काम यज्ञानें चित्तशुद्धि आणि ज्ञानयज्ञानें मुक्ति मिळते.

शतं ऋतूनामाहत्य देवराट् त्रिदिवं गतः । 

तपांस्युग्राणि चास्थाय दिवं प्राप्ता महर्षयः ॥ ( वा. रा. सा. ११०-२९ )

— शंभर अश्वमेध यज्ञ करून मनुष्य इंद्र झाला आणि त्यानें स्वर्गाचे आधिपत्य मिळविलें. इंद्राला ‘शतऋतु’ असेंहि नांव आहे. ऋतुः म्हणजे यज्ञ. शंभर यज्ञ ज्यानें केले तो ‘शतक्रतु’ उम्र तप आचरून कांहीं महर्षि स्वर्गाला तर कांहीं ब्रह्मलोकालाच गेले. हा या श्लोकाचा अर्थ. शंभर अश्वमेध यज्ञांनी इंद्र होतां येतें व केलेल्या सकाम निष्काम उग्र तपानें स्वर्गापासून ब्रह्मलोकापर्यंत जातां येतें, याला हा रामायणाचाहि श्लोक प्रमाण आहे.

home-last-sec-img