Literature

या जन्मींच मुक्ति

इह चेदवेदीदथ सत्यमस्ति न चेदिहावेदीन्महती विनष्टिः ।(केन. खंड. २५)

इह चेदशकद्वोद्धं प्राक् शरीरस्य विस्स्रसः । ततः सर्गेषु लोकेषु शरीरत्वाय कल्पते

(कठ. २-६-४)

इथेंच आत्मरूप जाणले तर मोक्षाचा लाभ झाला, सत्य आत्मसात् केलें, ओळखलें असें होतें; न जाणल्यास मोठे नुकसान होतें, पुन्हां जन्म घ्यावा लागतो. जोपर्यंत हे ब्रह्मात्मरूप जाणून मुक्त होत नाही तोपर्यंत तो पुनः पुनः अनेक लोकांत जन्म घेतो. असे या मंत्रावरून स्पष्ट कळून येईल. या ठिकाण संदर्भानें “ याचि देही एणेची काळे संसारी होईजे निराळें । मोक्ष पाविजे निश्चळे । स्वरूपाकार ॥ ” ही श्री समर्थांची ओवी आठवते.

तमेव विदित्वातिमृत्युमेति । तमेवं विद्वानमृत इह भवति ॥ इत्यादि श्रुति ज्ञानानेंच मोक्ष होतो हे सिद्ध करतात. या ठिकाणी “ज्ञानान्मुक्तिः” या सूत्राची आठवण होते.

home-last-sec-img