Literature

रामराज्याचा ध्यास

विषम असणा-या जगांत तशाच प्रसंगी सर्वत्र समवस्थित परमात्म्याचा साक्षात्कार करून दिला तरी ‘व्यावहारिक विषमता’ हा जगाचा प्राण असल्यामुळे ती तशीच आपल्या आचरणांत ठेवली होती तसेंच इतरानांहि त्याचे सांगणे आहे. ‘ज्ञानोहया दूर्ध्व भवसु शास्त्ररक्षणम् ‘ ज्ञानोदयानंतर शास्त्र रक्षण झाले पाहिजे. ‘स्वधर्माचा सांभाळ करी। तो विवेक ॥’ असें श्रीनारदाप्रमाणे श्रीसमर्थानाहि सांगितले आहे. मागच्या आर्याप्रमाणेच श्रीसमर्थांचे ‘एकंकार गोलकार। करुंच नये ॥’ असें निक्षून सांगणे आहे.

‘शब्दि सर्व आत्मा म्हणावें। आचार सांडून भलतेच करावें । ते एक पाषांडमत जाणावें। विवेकी असेल तेणे॥

भेद तुटावयाचे स्थळ । तें एक स्वरूपचि निर्मळ । तेणे मायेचा खेळ। समूळ मिथ्या॥‘ स्वरूपाच्या दृष्टीने अभेद व व्यवहाराच्या दृष्टीने तात्पुरता भेद जीवनांत बाळगुन सुखासमाधानाच्या दिव्य जीवनाचा लाभ अनुभवा!’ असे श्रुतीचे सांगणे असल्याप्रमाणेच अखिल ऋषिमुनी, मनु, आचार्य, संतमहंत ह्यांचे सांगणे आहे. ‘स्ववर्णाश्रमधर्मेण तपसा हरितोषणात् । साधनं प्रभवेत् पुंसां वैराग्यादिचतुष्टयम् ॥’

कठोर न्याय पद्धतीपेक्षा, अमानुष देहदंडापेक्षां चीतीच्या व धर्माच्या शिक्षणपद्धतीने हृदयाचें परिवर्तन करणे ही शाश्वत टिकणारी धार्मिक राज्यपद्धती होय. भारतवर्षाची आधुनिक राज्यपद्धती ‘रामराज्य’ म्हणून आपल्या विश्वोद्धारक अशा मंगलमय नावाने प्रकाशत आहे. नावाप्रमाणेच प्रभाव, कृतीसुद्धा झाली पाहिजे म्हणून आम्हा भारतीयांची अपेक्षा आहे.

‘प्रहृष्ट मुदितो लोकस्तुष्टः पुष्ट: सधार्मिकः । निरामयो ह्यशोकश्च दुभिक्ष्यभयवजितम् ॥ न पुत्रमरणं केचिद्रक्ष्यन्ति पुरुषा क्वचित् । नार्यश्चविधया नित्यं भविष्यन्ति पतिव्रताः। न चाग्निजभयं किंचिन्नाप्सु मज्जन्ति जन्तवः। न वातज भयं किञ्चिन्नापिदकरकृतं तथा ॥ न चापि क्षुद्भयं तत्र न तस्करभयं तथा । नगराणिच राष्ट्रानि धनधान्य युतानिच ॥’ असे हे रामराज्य आमचे स्वराज्य होवो. रामराज्याचे हे वर्णन वाल्मीकी ऋषीनी केले आहे. श्रीसमर्थांनी केलेलेंहि रामराज्याचे वर्णन बघु. ‘राम विश्राम देवाचा । राम भक्तासि आश्रयो ॥ राम योगिमुनिध्यानी । राम रक्षी ऋषिकुला ॥ कीति ही रघुनाथाची । पाहता तुळणा नसे ॥ एकबाणी एकवचनी । एकपत्नीत्व धार्मिकु॥ राज्य या रघुनाथाचें। कळीकाळासि नातुडे ॥ बहुवृष्टि अनावृष्टि । हे कदा न घडे जनी ॥ उद्वेग पाहतां नाही । चिता मात्र नसे जनी ॥ व्याधी नाही रोग नाहीं। लोक आरोग्य नांदति ॥ कुरूपी पाहतां नाही। जरामत्य असेचिना। आदरूं सकळे लोका । सख्य प्रीती परस्परें ॥ बोलणे सत्य न्यायाचे । अन्याय सहसा नसे॥ अनेक वर्तति काया ॥ एकजीव परस्परें ॥ दरिद्री धुंडितां नाही । मूर्ख हा तो असेचि ना ॥ परोपकार तो मोठा । सर्वत्र लोकसंग्रही ॥ अद्भुत पिकती भूमी। वृक्ष देतो सदा फळें ॥ अखंड दुभती धेनु । आरोग्य वाहती जळें। नद्या, सरोवरें बाबी । डोलती नुतनें वनें ॥ फलती फुलती झाडें । सुगंधवन वाटिका । उदंड वसति ग्रामे । नगरें पुरेंचि पट्टणें ॥ तीर्थक्षेत्रे नानास्थाने । शिवालय गोपुरें वरी ॥ मठ मठ्या पर्णशाळा। ऋषिआश्रम साजिरे ॥ वेदशास्त्रधर्मचर्चा । रामराज्य भमंडळी॥’ आमच्या ह्या स्वराज्याचे नांव ‘रामराज्य’ आहे. संत तुकोबारायांनी म्हटल्याप्रमाणे आम्ही सर्व म्हणूं. ‘झाले रामराज्य आतां काय उणे आम्हासी ॥’

ते धर्मपालका श्रीरामा! लीला मानुषरूप धारण करून तूं ज्या भारत वर्षाचे राज्य केलेस त्या भारतवर्षांचे राज्य निधर्मीयापासून तुझ्या कृपेने आम्हास मिळाले. तुझ्याच अनुग्रहाने प्राप्त झालेल्या स्वराज्यास तुझेच राज्य म्हणन रामराज्य’ नांव ठेवले आहे. ह्याचा अभिमान ठेऊन तुझ्या राज्याच्या वर्तनाप्रमाणे भारतवर्षाचे स्वराज्य होवो. हे दीनबंधो ! आम्ही सर्वजण तुझ्या दिव्य पदारविदाची प्रार्थना करीत आहोत. ‘अस्माकं सन्त्वाशिषः ।’ आम्हाला तुझा आशीवाद असावा.

महात्मा गांधीजींची राष्ट्रभक्ति प्रसिद्ध आहे. त्यांनी सर्वांच्या मुखांत रघुपति राघव राजाराम। पतितपावन सीताराम ।। हे भजनामृत आपल्या स्मारकरूपाने ठेवले आहे. देवाचे गुणच भक्ताच्या ठिकाणी प्रगट होतात असे वर्णिले आहे. श्रीरामाला धर्ममूर्ति, मर्यादा पुरुषोत्तम, सुधार्मिक अशी नांवे आहेत. श्रीनारदानीं श्रीवाल्मीकींना रामराज्याचे लक्षण सांगून श्रीरामाचे कार्य समजावून सांगण्याच्यावेळी ‘चातुर्वण्यं च लोकस्मिन् स्वे स्वे कार्य नियोक्ष्यति ॥’ चातुर्वर्णाच्या लोकांना आपापल्या वर्णधर्माप्रमाणे राम योजील’ म्हणून सांगितले आहे.

देवाप्रमाणे भक्त आणि त्याप्रमाणे त्यांचे अनुयायी व्हावयास नकोत कां? भारतवर्षाच्या स्वराज्याला ठेवलेले ‘रामराज्य’ नांव एकल्याबरोबर कोणाचे मन त्या दिव्य वातावरणाच्या उन्नत विचारांत देहभाव विसरून आनंदपरवश होणार नाही?

स च सर्वगुणोपेतः कौसल्यानन्दवर्धनः । समुद्र इव गांभीर्यधैर्येण हिमवानिव॥विष्णुना सदृशो वीर्ये सोमवत् प्रियदर्शनः । कालाग्निसदृश: क्रोधे क्षमया पृथिवीसमा॥ धनदेन समात्यागे सत्ये धर्म इवापरः॥’ ह्या श्लोकातल्या वर्णनाने विश्वाच्या सर्व मानवापुढे श्रीवाल्मीकी मुनींनी अनुकरणीय असा एक आदर्श ठेवला नाही का? राम म्हणजे जगाचा आत्मा. त्याला ‘आत्माराम’ म्हणून नांव नाही का? त्याच्या स्मरणाने मनुष्यांना भक्ति, भुक्ति, मुक्ती ह्या तिहींचा लाभ होतो. त्याच्या स्मरणाने सर्व पाप नष्ट होते. ‘रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् । नरो न लिप्यते पापैर्भुक्ति मुक्ति च विन्दति ॥’ हा श्लोक न ऐकलेले फार कमी. रामरक्षा सामान्यपणे सगळीकडे म्हटली जाते. रामनामाचा अधिकार सर्वांना आहे. पूर्वी धन्याला नमस्कार करतेवेळी ‘जोहार मायबाप’ असे म्हणत. श्रीसमर्थ रामदासस्वामींनी ती पद्धत काढून टाकून ‘राम राम’ असे म्हणावयास सांगितले व त्यांच्या उद्धाराकरिता रामनामाचा तारक उपदेश केला ह्या रामनामाच्या उच्चारास कोणत्याहि जातीचा, आचाराचा, सोवळयाओवळ्याचा कसलाहि निर्बंध नाही. दास म्हणे रघूनाथाचा। गुण घ्यावा॥’ श्रीरामाचा गुण घ्या! त्याच्या स्वरूपानें, सद्गुणानें, देह-अंतःकरण भरून टाका! असे सर्वांनाच अनुलक्षून श्रीसमर्थांनी सांगितले आहे.

सदा रामोऽहमस्मीती तत्वतः प्रवदन्ति ये। न ते संसारिणोननं राम एव न संशयः॥ (रामोत्तर तापिनी) आपल्या अत्यंत परिशुद्ध अशा तात्त्विक स्वरूपाचे ध्येय अखंड आपल्या दृष्टीपुढे दृढ ठेवून जे ‘यन्मतामनुते तद्वाचा वदति ।’ ह्या वचनाप्रमाणे ‘मी तत्त्वत: रामच आहे’ म्हणून आपला निश्चय प्रकट करतात ते केव्हाही संसारी होत नाहीत. ते खरोखरच रामरूप होतात ह्यांत संशय नाही.

home-last-sec-img