Literature

लोकनायकांची जबाबदारी

यद्यदाचरति श्रेष्ठः तत्तदेवेतरो जनः । स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥ ( भ.गी. ३१२१) 

—राज्यसूत्रे धारण करून अधिकारपदावर असणाऱ्यांनी व सर्व प्रकारांनी समाजाच्या इहपर हिताहितास कारणीभूत होणाऱ्या प्रमुख व्यक्तींनी आप अनुकरण करणारा समाजहि आपल्याप्रमाणेच उन्नत अथवा अवनत होतो व आपल्या विचाराचा बनतो हे चांगलें लक्षांत ठेवलें, पाहिजे

राज्ञि धर्मिणि धर्मिष्ठाः पापे पापाः समे समाः । राजानमनुवर्तन्ते यथा राजा तथा प्रजा ॥ ( महाभारत )

—‘यथा राजा तथा प्रजा’ या वचनाचा म्हणीप्रमाणेच उपयोग होतो. सर्वांनाहि ही म्हण तोंडपाठ आहे. राजा अथवा मंत्री धार्मिक असतील तर त्या राज्यांतील प्रजाहि धार्मिक होते; व तेच ते पापचरणाचे असतील तर या राज्यांतली प्रजाहि तशीच पापाचरणी होते. पुढाऱ्यांनी वर्णसंकराला पुष्टि दिली, अथवा तसा धडा घालून दिला म्हणजे प्रजाहि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालू लागते व वर्णसंकर करते. राजा बोले दळ हाले, नेत्याप्रमाणेंच अनुयायी, जसे घर तसे वासे, बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा, घराची कळा अंगण दाखविते, गुरु तसा चेला या सर्व म्हणी ध्यानांत घेण्यासारख्या आहेत. गतानुगतिको लोकः । या न्यायाने प्रजा ही केव्हांहि राजा, मंत्री, महंत, ..पुढारी यांचे अनुकरण करते, हे स्वाभाविक आहे. आपले आचरणच समाजाला अनुकरणीय होऊन, आपले विचारच त्यास प्रमाणभूत होतात, हें तत्त्व न विसरतां कोणत्याहि तऱ्हेनें आपल्या आचारविचारांनी समाजाच्या उन्नतसि कोणताहि अपाय न होईल असा खोल विचार करून, दीर्घदृष्टीने व वेदशास्त्रांच्या योग्य पर्यालोचनानें, राजानें अथवा मंत्र्यांनी राज्यकारभार चाल बिला पाहिजे व तदनुषंगानें शासन नियम आंखले पाहिजेत.

आधिव्याधिपरीताय अद्य श्वो वा विनाशिने । को हि राजा शरीराय धर्मपितं समाचरेत् ॥ ( अ. पु. २३।२१)

आधिव्याधींनी ग्रस्त आणि त्रस्त झालेल्या, आज ना उद्यां नष्ट होणाऱ्या या शरीराच्या सुखाकरितां कोणता राजा, मंत्री, महंत किंवा पुढारी धर्माविरुद्ध आचरण करील असा या श्लोकाचा भावार्थ आहे. राजा आदि प्रमुख व्यक्तींनींच तेवढा याचा विचार करावा आणि इतरांनी सोडून द्यावा असे नाही. प्रत्येकानेंच याचा विचार करण्यासारखा आहे.

आर्यद्वामी य चक्षसा मित्रवयंच सूरयः । व्यचिष्टे बहुपाय्ये यतेमहि स्वराज्ये ।। (ऋ. ५-५६-६)

— हे व्यापक दृष्टीच्या व परस्परांशी मित्रभावानें वागणाऱ्या पुढाऱ्यांनो, आम्ही सर्वहि विद्वान् मिळून स्वराज्यांतील सर्व प्रजेच्या अभ्युदय-निःश्रेयसा करितां तुमच्यासह उपाययोजना करतों व स्वराज्याच्या भरभराटीकरितां परो परीने झटतों अशा अर्थाचा यांतून बोध होतो. पुढाऱ्यांच्या संबोधनांत आलेली विशेषणें पुढाऱ्यांची लक्षणें दाखवितात. इंजिन रुळावरून चाललें म्हणजे डबेहि त्याच्या पाठीमागून व्यवस्थितपणे जातात व सुरक्षित असतात. इंजिन रुळावरून बाहेर गेलें कीं, त्याबरोबर सर्व डबे सळतात. मंत्र्यांनी, नेत्यांनी, पुढाऱ्यांनी हें उदाहरण नीट लक्षांत ठेवावें. त्यांच्यावर इंजिनाची व इंजिन चालावणाऱ्यांची अशा दोन्ही जवाबदाऱ्या आहेत. सत्तेपुढें शहाणपण चालत नाही म्हणून म्हणतात. त्याप्रमाणेच अधिकाऱ्यापुढे विद्वानांचे कांहीं चलत नाही. विद्वान् व अधिकारी हे कृष्ण अर्जुनाप्रमाणे मिळत जुळत असले तर तेथें भाग्य आहे, नीति आहे, कीर्ति आहे आणि विजयहि आहे. हा या मंत्रांतला गर्भितार्थ आहे. अखिल मानवजातीच्या ऐहिक आणि पारलौकिक अशा श्रेष्ठ उन्नतीकरितां अभ्युदय- निःश्रेयसाकरितां सर्वतोपरि अनुकूल अशा आचार विचारांनी युक्त अशी वैदिक संस्कृति आहे, हें विश्वांतल्या विवेकी पंडितांनी नुसतें मानलें, इतकेच नव्हे तर न राहवतां मुक्त कंठांनीं तें सभेत बोहनहि दाखविले. त्याचा खोल अभ्यास केला व अभ्यासानंतरची अचल समाधानाची व नितांत शांतीची बाणलेली दिव्य स्थितीहि उघड व्यक्त केली व विश्वकल्याणा करितां त्याचा लिखाण-प्रवचनद्वारां भरपूर प्रचारहि केला. ते ते धर्मग्रंथच त्या त्या संस्कृतीला कारण होतात. त्या धर्मग्रंथाचे विचार पुढे ठेवूनच त्या संस्कृतीच्या दृढीकरणार्थ प्रयत्न केला पाहिजे. विश्वमान्य अशा आर्य संस्कृतीला विश्वबंध अशीं वेदशाबेंच प्रमाणग्रंथ होत, हे आपल्याला माहीत आहेच. समाजाला या शिक्षणाचेच बाळकडू पाजविले पाहिजे. सरकारी कायदेहि त्याला अनुकूलच असावयाला पाहिजेत. पोषणानें व प्रचारानेच कोणतीहि संस्कृति दृढमूल होते. ज्याच्या प्रचाराचे आम्ही आटोकाटीचे प्रयत्न करतों त्यावरचे प्रेम त्या प्रयत्नानें व्यक्त होते. उत्कट प्रेमाची अभिव्यक्ति त्याच्या उत्कट आचार-प्रचारांतूनच होते.

श्रुतिस्मृत्युदितं सम्यङ् निवद्धं स्वेषु कर्मसु । धर्ममूलं निषेवेत सदाचारमतन्द्रितः ॥ (मनु. ४।१५५)

– श्रुतिस्मृतींनी सांगितलेल्या आपआपल्या कुलजातींतील धर्माला मूल असणाऱ्या सदाचाराचे निरलसपणें अनुष्ठान केले पाहिजे, असे मनूचे सांगणे आहे. आर्य संस्कृतीत अथवा वैदिक संस्कृतीत सदाचाराला फार महत्त्व आहे.

आचाराल्लभते ह्यायुराचारादीप्सिताः प्रजाः । आचाराद्धनमक्षय्यमाचारो हन्त्यलक्षणम् ॥ १५६ ।। 

-सदाचरणानें पूर्णायु होतो, अभीप्सित सत्प्रजा उत्पन्न होते, यथेच्छ धन मिळते; आणि अवलक्षण नष्ट होतें.

दुराचारो हि पुरुषो लोके भवति निंदितः । दुःखभागी च सततं व्याधितोऽल्पायुरेव च ॥ १५७ ।। 

– दुराचारी पुरुष लोकनिंदित, दुःखी, रोगी व अल्पायुपी होतो.

सर्वलक्षणहीनोऽपि यः सदाचारवान्नरः । श्रद्दधानोऽनसूयश्च शतं वर्षाणि जीवति ॥ १५८ ॥

–दिसावयाला अवलक्षणीहि जरी असला तरीहि जर तो श्रद्धाळू, पर दोषदृष्टिशून्य, सदाचारी असेल तर तो त्यानेंच शंभर वर्षे जगतो.

आचार्य च प्रवक्तारं पितरं मातरं गुरुम् । न हिंस्याद्ब्राह्मणान्गाश्च सर्वाश्चैव तपस्विनः || १६२ ॥

नास्तिक्यं वेदनिंदां च देवतानां च कुत्सनम् । द्वेषं दंभं च मानं च क्रोधं तैक्ष्ण्यं च वर्जयेत् ॥ १६३ ॥

वेदाध्यापक, वेदार्थ-व्याख्याता, मोक्षगुरु, आईवडील, ब्राह्मण, गाय तपस्वी यांना प्रतिकूल होईल असें आचरूं नये. देव, धर्म, गुरु, स्वर्गनरका लोक इत्यादिकांचें निराकरण, गुरु, वेद व देव यांची निंदा, द्वेष, दंभ, ताट उद्धटपणा, फाजील अहंकार, अकारण अधिक क्रोध आणि कठोर वृत्ति यांचा त्याग करावा.

सर्व परवशं दुःखं सर्वमात्मवशं सुखम् ।एतद्विद्यासमासेन लक्षणं सुखदुःखयोः || १६० ॥

—आत्मव्यतिरिक्त पदार्थापासून लाभणारें जें सर्व विषयसुख तें दु:ख आत्माधीन असणारें जें निर्विषय सुख तें सुख अशी थोडक्यांत सुखदुःख व्याख्या आहे.

home-last-sec-img