Literature

विधवाविवाह निषेध

नान्यस्मिन्विधवा नारी नियोक्तव्या द्विजातिभिःअन्यस्मिन्दि नियुंजाना धर्मे इन्युः सनातनम् ॥ ६४ ॥ नोद्वाहिकेषु नियोगः कीर्त्यते क्वचित् । न विवाहविधावुक्तं विधवावेदनं पुनः ।। ( मनु. ९ । ६५ ) — ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या त्रैवर्णिकांनी तरी दुसऱ्या पुरुषाशीं विधवांचा विवाह करून देऊं नये. विधवांचा अन्य पुरुषाशी विवाह करून दिल्यास सनातन धर्माचा नाश केल्यासारखें होतें. अर्थमणं नुदेवम् । ( अश्व लायन गृ. सू. १-७) इत्यादि कोणत्याहि विवाहमंत्रांत कुठेहि विधवाविवाह सांगितला नाहीं. कोणत्याहि शाखेतल्या विवाहपद्धतीतहि विधवाविवाह आढळून येत नाही. त्यामुळे अन्य पुरुषाशी कोणत्याहि विधवेचा विवाह करून देणे युक्त नाहीं. यानें व्यक्तीची आणि समाजाची नीति नष्ट होते. ऐहिक, पारलौकिक उत्कर्षाची आशा मावळते. पारमार्थिक, व्यावहारिक, सामाजिक, नैतिक अशा कोणत्याहि दृष्टीनें अथवा भावी पिढीच्या दृष्टीनेहि पुनर्विवाह केव्हांहि निषिद्धच आहे. वरील मनूच्या सांगण्याला तात्विक जीवनाची जितकी पुष्टिं आहे तितकी सामाजिक, नैतिक, व्यावहारिक जीवनाची पुष्ट आहे. एका पुरुषाचें अर्धांग असणारी स्त्री दुसऱ्या पुरुषाचे अर्धांग कधीहि होऊं शकत नाहीं. आपलें विध्युक्त पाणिग्रहण करणाऱ्या पुरुषाशी त्याचें जीवित असेतोपर्यंत व मरणानंतरहि ती स्त्री अनन्यच असली पाहिजे. अद्वितीय स्वरूप प्राप्तीचा हा मोक्षधर्म होय. पुरुषाचे अर्धांग असणाऱ्या स्त्रीला त्या पुरुषाशिवाय दुसरी गती नाहीं. त्याची शक्ति त्याच्यांतच लीन होणार, राहिली तरी ती त्याच्याशीच एकरूप असणार, ही तात्विक दृष्टि आहे. आणखी अन्य दृष्टीनेंहि ‘प्रकृतिर्जडा’ प्रकृति ही पुरुषाकडूनच चैतन्ययुक्त होते, असे झाले तर प्रकृतिरूप उपाधीचा अभिमान घेऊन असणाऱ्या स्त्रीला आपल्या औपाधिक स्वभावाप्रमाणे कांहीहि स्वातंत्र्य नसते, हे सहज सिद्ध होते. न स्त्री स्वातंत्र्यमर्हति । या मनूच्या वाक्यांत हा तात्विक विचारच भरून आहे. ज्यांना तात्त्विक विचार व माणुसकी नको त्यांच्याकरितां हा पशु स्वतंत्र आहे हें आतांपर्यंतच्या विवेचनानें स्पष्ट होण्यासारखे आहे !

home-last-sec-img