Literature

विश्व भाग्योदय

या विश्र्वधर्मरूपी सूर्याचा हा उदय म्हणजेच खरोखरी विश्र्वभाग्योदय– विश्र्वसुखोदय. किती मंगलमय पवित्र सुमुहूर्त हा! या समयीं उत्कट भवितव्यतेची झडत असलेली हीं मंगलवाद्ये आपल्या चित्तवेधक अशा या मंजुळ ध्वनीने अंतःकरणांत दिव्य सुखाचे अनंत तरंग वरवर उचंबळवीत आहेत ! चोहींकडे निनादत असलेला याचा हा मंगल जयध्वनि ज्या दिव्य आनंदाच्या ठिकाणी देहभान विसरवीत आहे तो आनंद खरोखरीच अवर्णनीय आहे.

home-last-sec-img