Literature

विषय विवेचन १५

‘देहोऽहमिति सङकल्पः सत्य जीवः स एव हि । (ते. वि.) चित्स्वरूपाची विस्मृतींच अज्ञान याच्यापासूनच जड भावना म्हणजे नानारूपात्मकाचे भान उत्पन्न झाले आहे. या अशा जड नामरूपात्मक ‘मी’ या भावाने युक्त असणाऱ्या जाणिवेला ‘जीव’ हें नांव. केवल ज्ञानमात्रतेची स्मृति म्हणजे ज्ञान. या ठिकाणी दृश्यास मुळी ठावच नसतो. या अशा केवल ज्ञानमात्र स्वरूपतेच्या भानानें युक्त असणारी जाणीव म्हणजेच ‘ईश्वर’.

‘स्वदेहा शुचिगन्धेन न विरज्येतयः पुमान् विराग कारणं तस्य किमन्यदुपदिश्यते ||

स्वदेहाच्या अपवित्रतेने आणि दुर्गंधींने सर्व देहाचा आणि देह सुखालाच साधन असणाऱ्या या अविचारसुंदर जगाचा ज्याला म्हणून वीट येत नाही, या देहाच्या किळसवाण्या यथार्थ स्वरूपाच्या जाणिवेने या देहाला आणि या देहाच्या सुखस्वर्गाला ज्याचे म्हणून मन कंटाळत नाही, त्याला या देहाच्या निसर्गसिद्ध अशा याच्या या स्वरूपाच्या विवेचनाहून कोणचा दुसरा उपदेश जास्ती परि णामकारक ठरून त्याच्या विरक्तिला कारण होईल. ‘हातच्या कंकणाला आरसा कशाला ? म्हणतात त्यातली ही स्थिति, या देहाच्या एका वस्तुस्थितीसच पुढे ठेवून जरी विचार करूं लागलों तरी पुरे. तो विचार पिंड ब्रह्मांडाच्या निराकरणानें याच्या ठिकाणीं असणाऱ्या सुखाची कल्पनाच पुसून टाकून याच्या या पकडीतून आपल्याला सोडवून अशा त्या दिव्य आनंदाकडे आपली दृष्टी फिरवील.

‘येरेव जायतें रागो मूर्खस्याधिकतांगतैः तैरेव भोगःप्राज्ञस्य विरागमुपजायतें

महोप. देहाभिमानी अशा अज्ञान मूढजीवाला जगांत ज्या काही वस्तू मोहक वाटतात ज्यांत तो अतिप्रीतीने आसक्त असतो त्याच वस्तु त्यांचा यथार्थ विचाराने विवेकी माण साला त्याच्या वैराग्यासच कारणीभूत होतात, थोडक्यांत विवेक्याला जगाचा आणि देहाचा हा संबंध आपल्या यथार्थ दिग्दर्शनाने आसक्ति सोडवितो आणि आत्मीय सत्य सुखाच्या मार्गाला लावतो. अविवेक्याला मात्र अगदीच याच्या उलट जास्ती जास्तीच तो त्याच्या मोहांत रुतून त्या आत्मसुखाला आंचवतो. तमैवेकं

जानथ आत्मानअन्यावम्यो अतिश्रेष्ठ, निरंकुश अशा त्या अद्वितीय अनंत सच्चित्सुखासाठी तद्रूप असणाऱ्या अशा तुम्हाला तुम्ही जाणा! याहून इतर गोष्टी वर्ज्य संसार समुद्र ओलांडून अविनाशी आत्मीय सुखाच्या त्या परतीरावर जर तुम्हाला पोहोंचावयाचे असेल तर याला हाच एक सेतु आहे. याहून दुसरा मार्ग नाही, असे श्रुतींचे सांगणे आहे.

जगत्रयमिदं सर्वचिन्मात्रं विचारतः| आपला विचार झाला की भिन्नपणे वाटणारे सारे लोकत्रय वेगळे नसून ज्ञान मात्र असणारे केवळ आपणच आहोत असा निश्चय होतो. आत्मज्ञानाच्या हाती अशी विचित्र यक्षिणीची कांडी आहे. बाहेर दिसणारे पदार्थ सुखाला कारणीभूत आहेत असा सामान्यःलोकांचा समज. जगातल्या नामरूपात्मक पदार्थाची जाणीव होणें म्हणजेच ‘ज्ञान’ ही अशी ज्ञान या शब्दाची सामान्य जनांची व्याख्या बहुजनसमाजांत या अशा समजुती जरी सामान्य रूढ असल्या तरी विचारी लोकांना त्या अंती कोत्या वाटतात. नाम रुपात्मक पदार्थाना पहाणारे डोळे हे जरी स्पष्ट असले तरी त्या डोळयांना प्रकाशविणारा कोणता प्रकाश याचा शोध केला पाहिजे आंतच दिसून येणाऱ्या मनातल्या अनुभवाला आंतच असून प्रकाशीत करणारा तो देहांतर्वति प्रकाश कोणाचा बरें असेल ?

माझे घर म्हटल्याप्रमाणे माझी इंद्रिय, माझे मन माझे संस्कार माझी वासना, माझे कर्म, माझा जन्म, माझा मृत्यु, माझा अहंकार म्हणून म्हटले जाणारे आपल्याहून वेगळेच ठरणार. आपल्याहून जे वेगळे तेच बाहेर दिसून येते. दिसून येणाऱ्या पदार्थाला पहाणाऱ्याचीच सत्ता कारणी असून पहाणाऱ्याच्या जाणिवेनेच बघितले जाणारे पदार्थ आहे तसे वाटतात. दृश्य पदार्थांना स्वतंत्र अस्तित्व नाहीं. जे दुसऱ्याकडून प्रकाशिले जाते म्हणजे जे दुसऱ्याचे अस्तित्व आपल्या अस्तित्वाचे कारण म्हणून दाखवितें तें स्वतः नसून त्याला भासविणाऱ्याच्यामुळेच तेंअसतें असें ठरलें की या पदार्थातून भासणारे ज्ञान, अस्तित्व, सुख हे सारें याचे नसून. ज्यामुळे यांचे अस्तित्व, त्या आपलेच ज्ञान, अस्तित्व आणि सुख या साऱ्या दृश्यांतून आहे असे विचारांती कोणालाहि कळून येईल. दुसरे म्हणून स्वव्यतिरिक्त पदार्थांचे भान याच्या पूर्वीच्या ‘मी’ या भानामुळेच होत असल्यामुळे, दिसून येणाऱ्या स्वव्यतिरिक्त पदार्थाच्या भाना स्वास्तिवाद्योतक ‘मी’ हें स्फुरण पावतें व यांतून दिसून येणाऱ्या अस्ति, भाति, प्रियरुपाने याच्या पूर्वीचे ‘सच्चिदानंद’ असे आपणच स्वप्रकाशाने प्रकाशतो आहो. असे हैं प्रत्येकाचे अद्वितीय सत्यस्वरूप प्रत्येकाला विचारांती कळून येईल व पटेल. ‘मी’ या आपल्या भानाने भासत असलेल्या अखिल कार्य जातापेक्षा ‘मी’ हे आपल्या अस्तित्वाचे द्योतक या सर्वांचे जे कारण ते यामुळे भासणाऱ्या साऱ्या भावनांना भावनेत दिसून येणाऱ्या साच्या अनुभवाला, विषय होणाऱ्या साऱ्या बाह्यपदार्थाना पदार्थात दिसून येणाऱ्या साऱ्या गुणदोषांना, या गुणदोषांच्या संस्कारामुळे होणाऱ्या साऱ्या कर्तृत्व-भोक्तृत्वाला या कर्तृत्व भोक्तृत्वभावनेमुळे अभुक्त कर्मफल भोगण्यास लागणाऱ्या जन्म परंपरेला, त्या एकेक जन्मातून होणाऱ्या सुखदुःखात्मक अनुभवाच्या भासाला, यामुळे उत्पन्न होणाऱ्या ‘मी सुखी, दुःखी, पापी, पुण्यवान’ इत्यादि कल्पनांच्या सांखळीला प्रकाशित करीत, या कशाकडूनहि प्रकाशले न जातां या साऱ्याना एकवटून अस णाऱ्या अभिमानासहि असंग असे राहून याला उजळीत, आपल्या अद्वितीय संविन्मात्र स्वरुपाची जाणीव देत, हें सारें कांहीं नसून आपणच एक स्वयंप्रकाशरूप आहों असे पटवून देते.

‘जाग्रत्स्वप्नसुषुप्तिषु स्फुटतरा या संविदुज्जृम्भते । या ब्रह्मादि पिपीलिकान्ततनुषु प्रोता जगन्साक्षिणी ॥ सैवाहं न च दृश्यवस्तु( मनिषा पचक)

ज्ञान जाग्रत् स्वप्न- सुषुप्तीतून प्रकाशतें व ते ब्रह्मादि पिपीलिकांच्या शरीरांतून व्यापून असून साऱ्या जगास साक्षीभूत आहे तेंच मी असे ‘मी’ या स्फुरणाचे स्वरूप कोणचे याचा शोध करणे निरंकुशतृप्तीला अत्यंत आवश्यक आहे. किंबहुना त्या निरंकुश तृप्तीला दुसरें साधनच नाही. प्रत्येकाला ‘मी’ या स्फुरणाचे भान जाग्रत आणि स्वप्न या दोन्ही अवस्थेतून असतें. गाढ झोपेत म्हणजे सुषुप्तीत मात्र ते तितके स्पष्ट भासत नाही पण असते ‘मी इतका वेळ सुखानें झोपलो होतो. मला काही समजले नाही

पण काय आनंद झाला!’ हा अनुभव याचा निदर्शक आहे. “मी हे भान त्या सुषुप्तीत जर अजिबात नसतें तर जाग्रतीत अशा प्रकारची पूर्वानुभूत स्मृति म्हणजे प्रत्यभिज्ञा दिसून आली असती का? कोणाला हा अनुभव आला तर ‘मला’ असे उत्तर देता आलें तेंव्हा ‘मी’ हे भान सुषुप्तींत देखील असते हे स्पष्ट आहे. ‘मी’ या भानाविरहिन कोणचाहि अनुभव येणे शक्य नाही, फरक झाले तर सुषुप्तस्थितींत ‘मी’ हे भान अतिसूक्ष्म असते असे म्हणता येईल. इतका वेळ ती भावना सुप्त होती, आता ती प्रगट झाली, या आपल्या बोलण्याच्या सरणीत देखील सुप्त याचा अर्थ गूढ असा होतो. गूढ म्हणजे अस्पष्ट अथवा सूक्ष्म कोणच्याहि अनूभवाला ‘मी’ हे आपले भान आवश्यक असतें; असे झालें की हे भान ज्याचें तें आपण सुषुप्तीत नसू काय ? एकंदरीत आपल्यातच आपल्या ‘मी’ या भानाच्या कमी अधिक स्पष्टतेमुळे भासणाऱ्या या साऱ्या जाग्रदादि अवस्था ‘मी’ हे भान ज्याचे ते आपण या आपल्या भानापूर्वीचेच असणार!’ ‘मी’ या आपल्या सुषुप्तीच्या ठिकाणी असणाच्या सूक्ष्म भानाला दृश्य सारे मावळून गेल्यामुळे जे कांहीं समजले नाही म्हणून अनुभवाला भयेते तेंहि अर्थात आपल्या. कडूनच प्रकाशले जाते. ‘मी’ हे भान मावळून गेल्यानंतर या भानाचे जे ते आपणच अद्वितीय ज्ञानरूपाने सुषुप्तींत उरतो. ‘मी’ या आपल्या भानांतच जर आपली अद्वितीय स्थिति प्रगटते तर हें भानहि नस तांना जे आपण उरतो, त्या आपल्यांत द्वितीय कोठून असणार? सुषुप्तीची अज्ञातता अद्वितीयज्ञानस्वरूपी अशा आपल्याकडूनच प्रकाशली जाते म्हणून कां एकदां ठरले की, आपण ‘अज्ञान किंवा आवरण असे होऊं काय?जें हें जाग्रत् स्वप्न सुषुप्तीतून भासणाऱ्या दृश्याच्या अनुभ वाला अतिस्पष्ट प्रकाशित असतें तें हें स्वयंप्रकाश अद्वितीय ज्ञानस्वरूप या तीन अवस्था असोत वा नसोत, तसेंच असणार. जाग्र दादि अवस्था आपण न होता त्यांना स्वप्रकाशाने प्रकाशण्याचेच या ज्ञानाचे शील, तर मग त्या अवस्था पिडाच्या असोत कां ब्रह्मांडाच्या असोत, या जीवेश्वराच्या अवस्थेतूनहि ते सारखेच अविकारी आहे. ‘मीं, ही स्फूर्ति, इच्याकडूनच प्रकाशिल्या जाणाऱ्या कशाकडूनहि प्रकाशिली न जातां इच्या पूर्वीच्या ज्ञानाकडूनच प्रकाशिली जाऊन ‘मी’ हे त्या ज्ञानाचेच अपरोक्ष भान आहे असे विचारांती कळून येईल. प्रत्येकाच्या ठिकाणी असलेले ‘मी’ हे भान म्हणजे अद्वितीय ज्ञानच हे संविन्मात्र अद्वितीय स्वरूपच प्रत्येक शरीरांतील ‘मी’ या आपल्या स्मृतींतून प्रगटून अभिन्नतेने त्याचें मूळरूप होऊन आहे. ‘मी’ ही स्फूति अशा तऱ्हेने कोणचीहि दृश्य वस्तु न होतां ती आब्रह्मादि पिपीलिकान्त देहांतून एकसारखे व्यापून असणारे जगत्साक्षी ज्ञानच, ते अद्वितीय स्वप्रकाश स्वरूपच असे पटल्यानंतर निरंकुशतृप्तिसुखार्थ कां कोठे खोळंबावे लागेल? निरंकुशतृप्तिसुख तें आपणच, याप्रमाणे कांहीं न समजे जेथे, अशा त्या सुषुप्ति अवस्थेलासुद्धा प्रकाशविणारे ज्ञानच आपण असतां, ‘मी’ हें आपले भाव या ज्ञानस्वरुपाच्या विस्मृतीस कारण होणाऱ्या नामरूपात्मक जडदेहालाच ‘आपण म्हणून मानत अस लेलें पाहिजे म्हणजे या जड देहाभिमानाने तुच्छ अशा दृश्य पदार्थातच सुखाची भावना ठेवित असलेले बघितले की, वाहत्या पाण्याला जागेचा गुण लागल्याप्रमाणे अथवा आंत दिसत असलेल्या प्रकाशांत कांचेचा रंग भासत असल्याप्रमाणे सुषुप्तींच्या त्या आव रक स्थितींतून आल्यामुळे हा स्वविस्मृतिरूप दोष यांतून दिसून येतो हे विचारांती कळुन येईल, ज्या ‘मी’ या आपल्या भान स्वविस्मृतीनें जड भावना दिसून येते त्या ‘मी’ या आपल्या भानालाच ‘जीव’ म्हणावयाचें. जाग्रत् स्वप्नांत भासणाऱ्याया विपरीत भावनेला कारण म्हणून जें सुषुप्तींत आहेसे वाटते. त्यालाच ‘अविद्या’ म्हणतात.

अहंकाराभिधानेन जीवस्याद्वी सदाशिवः

स चा विवेकप्रकृतिसङगत्या तत्र मुह्यते ॥ ‘जुष्टं यदा पश्यत्ययमीशमस्य महिमानमिति वीतशोकः ।

( मुंड. शश२ ) या श्रुतीच्या आधाराने पिडाभिमानास कारण होणाऱ्या अविद्येच्या निराकरणानें जीवाच्या ठिकाणचे हे एकदेशीय भा जाऊन, ब्रह्मांडोपाधिक ईशाचा भाव उपटून भासतो हे सिद्ध होते. ‘मी’तून पिंडाचे कारण असणारी अविद्या नष्ट झाली की, त्या ‘मी’त पिंडाचा अभिमान नष्ट होऊन ब्रह्मांडोपाधी प्रकाशुं लागते. या ब्रह्मांडोपाधीचा अभिमान ईशाला ! यास कारण म्हणजे माया. अविद्येच्या निरासाने पिडातील भयावस्था नाहिशा होऊन पुढच्या पायरीवरही जीव आपले पाऊल ठेवतो.

त्याला मग समष्टयात्मक ब्रह्मांडाश्रित त्रयावस्थांचे भान ‘हे’ विश्वचि माझे घर । ऐशीं जयाची मती स्थिर किंबहुना चरा चर। आपणचि ॥’ अशा त-हेनें होऊं लागते.

‘मैत्रेयात्मनि खत्वरे दृष्ट श्रुते मते विज्ञात इद् ९ सर्व विदितम् (बृहदा. ४।५।६ )

मैत्रेयात्मनो वा अरे दर्शनेन श्रवणेंन मत्या विज्ञानेनेद सर्व विदितम्(हदा २|४|५)

home-last-sec-img